(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Weight Loss : झटपट वजन कसं कमी करू? लठ्ठपणाचा शत्रू आहे हे 'वेट लॉस ड्रिंक' पोटाची चरबी वितळलीच म्हणून समजा!
Weight Loss : जर तुम्हीही तुमच्या वाढत्या आणि जास्त वजनामुळे हैराण असाल तर आता काळजी करू नका, कारण आम्ही तुमच्यासाठी असा रामबाण उपाय आलो आहोत. जे कमी वेळेत तुमचे वजन कमी करण्यास मदत करतील.
Weight Loss : वजन कमी करायचंय, हे बोलायला सोप्पं आहे. पण खरं सांगायचं तर, वजन कमी करणे हे काही सोपे काम नाही, कारण ज्यांना खायला आवडते, त्यांच्यासाठी वजन कमी करणं अधिक कठीण होते. कितीही वर्कआउट केलं, आणि कोणतेही परिणाम मिळत नसतील, तर आम्ही तुमच्यासाठी असा रामबाण उपाय घेऊन आलो आहोत. जे कमी वेळेत तुमचे वजन कमी करण्यास मदत करतात.
घरच्या घरी वजन कमी करायचंय?
जर तुमचे वजन जास्त असेल आणि तुम्ही फिट नसाल, तर तुम्ही प्रत्येक वेळी वजन कमी करण्याच्या गोष्टी शोधत राहाल. वजन कमी करण्यासाठी अशा वेळी तुम्ही कोणताही उपाय करायला तयार असता, परंतु तरीही मनासारखे परिणाम मिळत नाहीत, तर घरच्या घरी वजन कमी करण्याच्या या सोप्या पद्धतीवर एक नजर टाका, ज्यामुळे तुमचे वजन कमी करण्यासोबतच शरीर तंदुरुस्त आणि निरोगी ठेवते. तुम्ही कोणतेही औषध घेत असाल तर हे पेय घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
वजन कमी करणारं ड्रिंक!
बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या बिघडलेल्या सवयींमुळे लोक लठ्ठपणाचे बळी ठरत आहेत. याशिवाय कामाच्या वाढत्या दबावामुळे लोक त्यांच्या शरीराकडे लक्ष देऊ शकत नाहीत त्यामुळे ते जाड होतात. रोज बदलणाऱ्या खाण्याच्या सवयी आणि धकाधकीचे जीवन लठ्ठपणा वाढवते. एकदा का शरीर लठ्ठपणाचे बळी ठरले की हे वाढलेले वजन कमी करणे कठीण काम होऊन बसते. अशा परिस्थितीत पोट बाहेर येणे ही देखील मोठी समस्या आहे. तुम्ही बाहेर पडलेल्या पोटाला बराच वेळ आत ठेवण्याचा प्रयत्न केला तरीही ते कमी होत नाही. जर तुम्हालाही पोटाच्या वाढत्या चरबीने त्रास होत असेल, तर मग येथे जाणून घ्या की तुम्ही आले लिंबू पेय कसे बनवू शकता आणि ते कसे प्यावे. हे पेय पोटाची चरबी नाहीशी करण्यासाठी आश्चर्यकारक प्रभाव दर्शवते. या पेयाचे फायदे आणि ते कसे बनवावे याबद्दल जाणून घ्या.
पोटाची चरबी वितळलीच म्हणून समजा!
भूक नियंत्रित करण्यासाठी आलं (Ginger) प्रभावी आहे. यामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण चांगले असते, ते फायबरचा एक चांगला स्रोत आहे आणि ते शरीराला दाहक-विरोधी गुणधर्म देखील प्रदान करते. आल्याचे ड्रिंक प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासही मदत होते. याशिवाय पोटदुखीच्या वेळीही आल्याचे सेवन करता येते. आल्यामध्ये लिंबाचा रस मिसळून चहा बनवला तर या चहाचा पोटावरील चरबी कमी करण्यासाठी चांगला परिणाम होतो. लिंबू व्हिटॅमिन सी साठी समृद्ध आहे आणि त्यात फायबर देखील चांगले आहे, जे पचन सुधारते, एलडीएल म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉल कमी करते आणि वजन कमी करण्यास देखील मदत करते.
रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या..
जर तुम्ही लिंबू आणि आल्याचा चहा तयार करून रोज सकाळी प्यायला तर तुमच्या पोटाची चरबी झपाट्याने कमी होण्याचा परिणाम दिसून येतो. हा चहा बनवण्यासाठी आल्याचे छोटे तुकडे करून एका भांड्यात पाणी भरून काही वेळ उकळवा. आता हे पाणी एका कपमध्ये गाळून घ्या आणि त्यात लिंबाचा रस घाला. तुमचे वजन कमी करणारे पेय तयार आहे. हे पेय रोज सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्यास पोटाची चरबी कमी करण्यासाठी आश्चर्यकारक परिणाम मिळू शकतात.
शरीराला इतरही अनेक फायदे
हा चहा प्यायल्याने पोटाची चरबी तर कमी होतेच पण त्याचबरोबर शरीराला इतरही अनेक फायदे मिळतात. हा चहा इन्सुलिन संवेदनशीलता वाढवण्याचे काम करतो. तुम्हाला अनेकदा पोटदुखी होत असेल तरीही तुम्ही हा चहा पिऊ शकता. हा चहा स्नायू, सांधे आणि हाडांच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी पिऊ शकतो.
(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Relationship Tips : रेशीमगाठ जुळत नाही? रिलेशनमध्ये तुमचा जोडीदार आनंदी नाही? हे संकेत वाचा आणि जाणून घ्या
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )