Pushpa 2 Third Part Hint : पार्ट 2 मध्येच संपणार 'पुष्पा'ची कहाणी? सेटवरुन काढलेला शुटिंगदरम्यानचा शेवटचा फोटो व्हायरल
Pushpa 2 Third Part Hint : अल्लू अर्जुन पुष्पाराजच्या भूमिकेत दमदार पुनरागमन करण्यास तयार आहे. त्याचवेळी, त्यानं चाहत्यांना या बहुप्रतिक्षित ब्लॉकबस्टरच्या शेवटच्या क्षणांची खास झलक दिली आहे.

Srivalli Rashmika Mandana Pushpa 2 Third Part Hint : साऊथ सुपरस्टार (South Superstar) अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) 'पुष्पा 2: द रुल' (Pushpa 2 ) हा यंदाच्या वर्षातला मोस्ट अवेटेड चित्रपट. या चित्रपटाबद्दल प्रेक्षक उत्सुक आहेत. टीझर आला, ट्रेलर आला... आता चाहते चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत आहे. पण चित्रपटाच्या रिलीजपूर्वीच श्रीवल्ली आणि खुद्द पुष्पानं इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. दोघांनी शेअर केलेला हा फोटो काही वेळातच व्हायरल झाला आणि चर्चांना उधाण आलं.
अल्लू अर्जुन पुष्पाराजच्या भूमिकेत दमदार पुनरागमन करण्यास तयार आहे. त्याचवेळी, त्यानं चाहत्यांना या बहुप्रतिक्षित ब्लॉकबस्टरच्या शेवटच्या क्षणांची खास झलक दिली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्यानं त्याच्या इन्स्टा हँडलवर 'पुष्पा 2: द रुल'च्या शुटिंगवेळच्या शेवटच्या दिवसाचा आणि अंतिम शॉटचा फोटो शेअर केला आहे.
View this post on Instagram
फोटोमध्ये, बॅकग्राउंडमध्ये टीमसोबत कॅमेरा ट्रॉली दिसत आहे. अल्लू अर्जुननं फोटोसोबत एक हृदयस्पर्शी कॅप्शनही लिहिलं आहे. फोटो शेअर करताना त्यानं लिहिलंय की, "शेवटच्या दिवशी 'पुष्पा'चा शेवटचा शॉट. पुष्पाचा 50 वर्षांचा प्रवास पूर्ण झाला. किती प्रवास होता तो." अल्लूच्या या पोस्टनंतर आता पुष्पाची कथा 'भाग 2' मध्येच संपणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
अल्लू अर्जुनच्या पोस्टनंतर चाहते भावूक झाले आहेत. कमेंट करताना चाहते लिहितात की, 'पुष्पा 2' पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 200 कोटींची कमाई करेल. तसेच, 9 दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरची मोहिनीही चाहत्यांवर कायम आहे. आतापर्यंत या चित्रपटाचा ट्रेलर 7 कोटी 91 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.
दरम्यान, 5 डिसेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणारा 'पुष्पा 2: द रुल' प्रसिद्ध दिग्दर्शक सुकुमार यांनी दिग्दर्शित केला आहे आणि सुकुमार रायटिंग्जच्या सहकार्यानं Mythri Movie Makers द्वारे निर्मित आहे. चित्रपटाचं संगीत टी-सीरीजनं दिलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
