(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health : तुमच्या किचनमध्येच आहे वजन कमी करण्याचे रहस्य! वेट लॉसचा प्रवास होईल सोपा, जाणून घ्या..
Health : वजन कमी करायचे आहे? तुमच्या स्वयंपाकघरातच इलाज दडलेला आहे. काही पदार्थ तुम्हाला वजन कमी करण्यात खूप मदत करू शकतात
Health : आजकालच्या धकाधकीच्या जीवनात स्वत:साठी वेळ द्यायला अनेकांना जमत नाही. बदलती जीवनशैली, कामाचा ताण, जबाबदाऱ्यांचं ओझं, व्यायामाचा अभाव अशा अनेक गोष्टींमुळे अनेकांना विविध आजारांनी ग्रासलंय, तर काहींना झपाट्याने वाढणार वजन ही समस्या अधिक प्रमाणात दिसून येतेय. आज आम्ही तुम्हाला अशा एका उपायाबद्दल सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचं वजनही कमी होईल, आणि तो उपाय तुमच्याच किचनमध्ये उपलब्ध आहे. जाणून घ्या..
आरोग्यासाठी अमृत
भारतीय खाद्यसंस्कृतीत मसाल्यांशिवाय जेवण अपू्र्ण समजले जाते. कारण मसाले केवळ जेवणाची चवच वाढवत नाहीत तर ते तुमच्या आरोग्यासाठी अमृतही ठरू शकतात. त्यामध्ये अनेक पौष्टिक आणि औषधी गुणधर्म लपलेले आहेत, जे तुमच्या शरीराला आतून पोषण देतात आणि ते चांगले कार्य करण्यास मदत करतात. म्हणूनच मसाले हे आपल्या अन्नाचा अविभाज्य भाग आहेत. जलद चयापचय आणि वजन कमी करणे हे मसाले अनेक मार्गांनी फायदेशीर आहेत. आज आपण अशा काही मसाल्यांबद्दल जाणून घेणार आहोत, जे चयापचय म्हणजेच मेटाबॉलिज्म जलद होण्यास मदत करू शकतात.
चयापचय म्हणजे काय?
त्या मसाल्यांबद्दल जाणून घेण्यापूर्वी चयापचय म्हणजे काय ते जाणून घेऊया. ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये शरीर अन्नाचे उर्जेमध्ये रूपांतर करते. जेव्हा तुमचा चयापचय वेगवान असतो, तेव्हा तुमचे शरीर अधिक कॅलरी बर्न करते, ज्यामुळे वजन कमी करणे सोपे होते. ज्याला मेटाबॉलिज्म असेही म्हणतात.
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर मसाले
काळी मिरी- काळी मिरीमध्ये पाइपरिन नावाचे एक संयुग असते, जे तुमच्या शरीराचा चयापचय जलग गतीने वाढवू शकते, ज्यामुळे जास्त कॅलरी बर्न करण्यात आणि वजन कमी करण्यास मदत होते.
हळद- हळदीमध्ये कर्क्यूमिन नावाचे संयुग असते. हळद चयापचय गतिमान करते, ज्यामुळे कॅलरी बर्न करणे सोपे होते. जास्त कॅलरीज जमा न झाल्यामुळे वजन कमी करणे सोपे होते.
याव्यतिरिक्त, कर्क्यूमिन शरीरातील जळजळ कमी करण्यासाठी देखील प्रभावी आहे, जे अनेक रोगांना प्रतिबंधित करण्यात मदत करते. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते.
आले- आल्यामध्ये जिंजरॉल असते, जे मेटाबॉलिक रेट वाढवते. हे तुमच्या शरीराला अधिक कॅलरी बर्न करण्यास मदत करते आणि पचन देखील सुधारते. यात दाहक-विरोधी गुणधर्म देखील आहेत, ज्यामुळे सूज कमी होते.
लवंग- लवंगमध्ये युजेनॉल नावाचे संयुग असते, जे तुमच्या शरीरातील चयापचय गती वाढवू शकते. हे तुमच्या शरीराला अधिक कॅलरी बर्न करण्यास मदत करते आणि तोंडी आरोग्यास देखील प्रोत्साहन देते.
दालचिनी- दालचिनीमध्ये सिनामल्डीहाइड असते, ज्यामुळे तुमची चयापचय जलद होते. याशिवाय रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासही मदत होते.
जिरे- जिऱ्यामध्ये थायमॉल आढळते, ज्यामुळे तुमची चयापचय जलद होते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी जिऱ्याचे पाणी पिणे खूप फायदेशीर मानले जाते. याशिवाय पचनक्रिया सुधारते.
लक्षात ठेवा...
हे मसाले तुमचे चयापचय वाढवण्यास आणि वजन कमी करण्यात मदत करू शकतात, परंतु ते चमत्कारिक उपचार नाहीत. वजन कमी करण्यासाठी, निरोगी आहार आणि नियमित व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे.
हेही वाचा>>>
Women Safety : महिलांनो..आता आवाज उठवण्याची वेळ आलीय, हिंसाचाराबद्दल गप्प बसू नका, 'या' नंबरवर कॉल करा, काही मिनिटांत पोलिस पोहोचतील
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )