एक्स्प्लोर

Women Safety : महिलांनो..आता आवाज उठवण्याची वेळ आलीय, हिंसाचाराबद्दल गप्प बसू नका, 'या' नंबरवर कॉल करा, काही मिनिटांत पोलिस पोहोचतील

Women Safety : महिलांनी असंच गप्प राहिल्यास त्यांच्यावर होणारे अत्याचार कधीच थांबवता येणार नाहीत. आज एक स्त्री गप्प राहिली तर उद्या इतर स्त्रियांनाही असाच त्रास सहन करावा लागेल. 

Women Safety : तुम्ही कधी विचार केला आहे का? की स्त्रिया अनेकदा कौटुंबिक हिंसाचाराला का बळी पडतात? बहुतांश घटनांमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या का वाढतायत? महिलांना कौटुंबिक हिंसाचारापासून वाचवण्यासाठी सरकारकडून वेगळे कायदे करण्यात तर आले, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. जर तुम्हाला कौटुंबिक हिंसाचार किंवा कोणत्याही गैरवर्तनाचा सामना करावा लागत असेल, तर तुम्ही त्याबद्दल गप्प बसू नये. कारण, आज एक स्त्री गप्प राहिली तर उद्या इतर स्त्रियांनाही हा त्रास भोगावा लागेल.

 

आजही महिला स्वत:च्या घरात सुरक्षित आहेत का? 

महिलांवर होत असलेल्या गुन्ह्यांच्या यादीवरून आजही महिला स्वत:च्या घरात सुरक्षित नसल्याचे स्पष्ट होते. कधी महिलांना त्यांच्याच पतीकडून शोषणाला सामोरे जावे लागते, तर कधी त्यांच्याच पालकांकडून त्यांना अत्याचार सहन करावे लागतात. महिलांवर अनेक प्रकारे घरगुती हिंसाचार घडतो आणि कुटुंब फक्त शांतपणे बघत उभे असते. पण आता आवाज उठवण्याची वेळ आली आहे. कारण, महिलांनी असेच गप्प राहिल्यास त्यांच्यावर होणारे अत्याचार कधीच थांबवता येणार नाहीत. आज एक स्त्री गप्प राहिली तर उद्या इतर स्त्रियांनाही असाच त्रास सहन करावा लागेल. जेव्हा आपण दोष सहन करतो तेव्हा समोरच्या व्यक्तीला अधिक बळ मिळते की स्त्री काहीही करू शकत नाही. त्यामुळे स्वत:साठी आवाज उठवावा लागेल. आज जर तुम्ही स्वतःसाठी उभे राहिले नाही तर उद्या कदाचित तुमच्या मुलीलाही तुमच्यासारखेच हे सर्व सहन करावे लागेल. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेसाठी आणि कौटुंबिक हिंसाचारामुळे त्रासलेल्या महिलांसाठी सरकारने टोल फ्री क्रमांकही जारी केले आहेत. या नंबरवर कॉल करून तुम्ही तुमच्या समस्या तर सांगू शकताच पण त्या नरकातूनही सुटू शकता. पण त्यासाठी आधी फोन करण्याची हिंमत दाखवावी लागेल.


महिलांनो... आवाज उठवण्याची वेळ आलीय 

अनेकदा स्त्रिया आपल्या कुटुंबाशी संबंध टिकवून समाजात आपले नाव खराब करण्याच्या भीतीने गप्प राहतात. यामुळे स्त्रिया आयुष्यभर घरातच घरगुती हिंसाचाराला बळी पडतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही टोल फ्री नंबरची माहिती देणार आहोत, जे तुम्ही तुमच्या फोनमध्ये नेहमी सेव्ह करून ठेवावेत. तुम्ही कोणत्याही हिंसाचाराला किंवा अत्याचाराला बळी पडल्यास, तुम्ही या नंबरवर ताबडतोब कॉल करू शकता.

 

महिलांनो.. फोनमध्ये हे नंबर सेव्ह करून ठेवा

  • घरात होत असलेल्या अत्याचारामुळे तुम्हाला त्रास होत असेल, 
  • तर तुम्ही 181/1091 या टोल फ्री हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करून तुमची समस्या मांडू शकता. 
  • यासाठी कोणतीही कालमर्यादा नाही हे लक्षात ठेवा. 
  • ही लाईन महिलांसाठी 24 तास खुली असते. 
  • महिलांवरील गुन्हे थांबवण्यासाठी हा क्रमांक जारी करण्यात आला आहे. 
  • पण असे असूनही महिला फोन करायला घाबरतात. 

 

तुमचे नाव गुप्त ठेवले जाईल

तुम्हीही हिंसेला बळी पडत असाल, पण स्वत:साठी पावले उचलू शकत नसाल, तर लैंगिक छळाच्या या घटनांवरून हेच ​​दिसून येते की, आज महिलांना घरातही हिंसेचा सामना करावा लागतो सुरक्षित म्हणूनच, सर्वप्रथम, आपण आपल्यासाठी आवाज उठवणे महत्वाचे आहे. एखादी महिला कौटुंबिक हिंसाचाराची बळी ठरत आहे हे माहीत असूनही पोलिसांकडे तक्रार करत नसल्यास, तुम्ही या क्रमांकावर कॉल करून तक्रार करू शकता. असे केल्याने तुमचे नाव गुप्त ठेवले जाईल. 181/1091 टोल फ्री हेल्पलाइन क्रमांकाचे वैशिष्ट्य म्हणजे तक्रार दाखल करणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवले जाईल.


घरगुती हिंसा टोल फ्री नंबरवर कॉलचे उत्तर न आल्यास काय करावे?

महिलांसाठी घरगुती हिंसाचार हेल्पलाइन

राष्ट्रीय महिला आयोग हेल्पलाइन- 7827170170
केंद्रीय समाज कल्याण मंडळ -पोलिस हेल्पलाइन क्रमांक - 1091/1291, (011) 23317004
नारी रक्षा समिती – (011) 23973949
तुम्ही यापैकी कोणत्याही नंबरवर कॉल करून तुमची समस्या सांगितल्यास, पोलिस अधिकाऱ्यांकडून तुम्हाला तात्काळ मदत केली जाईल. लॉयर्स कलेक्टिव्ह वुमेन्स राइट्स एलसी डब्ल्यूआरआय घरगुती हिंसाचार प्रकरणांसाठी विनामूल्य कायदेशीर मदत कक्ष देखील चालवते. ते घरगुती हिंसाचार प्रकरणांमध्ये कायदेशीर सहाय्य प्रदान करेल. यासाठी तुम्ही (011) 24373993/ 24372923 वर कॉल करू शकता.

 

 

हेही वाचा>>>

Women Safety Travel : रात्रीचा प्रवास असो, की एकटीचा...भारतीय रेल्वे महिलांना देते 'या' विशेष सुविधा, माहित नसेल तर जाणून घ्या..

 

 

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

 

 

 

 

 

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्व. आनंद दिघेंच्या आश्रमात नोटा उधळल्या, शिंदेंना जिव्हारी; शिवसेना पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी
स्व. आनंद दिघेंच्या आश्रमात नोटा उधळल्या, शिंदेंना जिव्हारी; शिवसेना पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी
Mukhyamantri Yojanadoot गुडन्यूज! मुख्यमंत्री योजनादूतसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; लगेच पाहा, 10 हजार दरमहा
गुडन्यूज! मुख्यमंत्री योजनादूतसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; लगेच पाहा, 10 हजार दरमहा
महायुतीत शीतयुद्ध... सुनील तटकरे 288 जागा मागतीलच; शिवसेना शिंदेंच्या आमदाराने लगावला टोला
महायुतीत शीतयुद्ध... सुनील तटकरे 288 जागा मागतीलच; शिवसेना शिंदेंच्या आमदाराने लगावला टोला
कोकणातून मुंबईकडे निघालेली 60 प्रवाशांची बस भातशेतीत कोसळली; स्थानिक धावले
कोकणातून मुंबईकडे निघालेली 60 प्रवाशांची बस भातशेतीत कोसळली; स्थानिक धावले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NandKumar Gorule on Anand Dighe : लाज वाटली पाहिजे मुख्यमंत्र्यांना, माफी तर मागूच नकाBhigyan Kundu Under19 Cricket : अभिग्यान कुंडूची भारताच्या अंडर 19 संघात निवडRamdas Kadam : मोहम्मद पैगंबराबद्दल रामगिरी महाराजांनी केलेलं वक्तव्य निषेधार्ह : रामदास कदमKolkata Case : कोलकातामधील हत्याप्रकरणी आरजी कार काॅलेजचे प्राचार्य संदीप घोषला अटक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्व. आनंद दिघेंच्या आश्रमात नोटा उधळल्या, शिंदेंना जिव्हारी; शिवसेना पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी
स्व. आनंद दिघेंच्या आश्रमात नोटा उधळल्या, शिंदेंना जिव्हारी; शिवसेना पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी
Mukhyamantri Yojanadoot गुडन्यूज! मुख्यमंत्री योजनादूतसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; लगेच पाहा, 10 हजार दरमहा
गुडन्यूज! मुख्यमंत्री योजनादूतसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; लगेच पाहा, 10 हजार दरमहा
महायुतीत शीतयुद्ध... सुनील तटकरे 288 जागा मागतीलच; शिवसेना शिंदेंच्या आमदाराने लगावला टोला
महायुतीत शीतयुद्ध... सुनील तटकरे 288 जागा मागतीलच; शिवसेना शिंदेंच्या आमदाराने लगावला टोला
कोकणातून मुंबईकडे निघालेली 60 प्रवाशांची बस भातशेतीत कोसळली; स्थानिक धावले
कोकणातून मुंबईकडे निघालेली 60 प्रवाशांची बस भातशेतीत कोसळली; स्थानिक धावले
Dharashiv: मराठा आंदोलकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अडवत केली घोषणाबाजी, मराठा आरक्षणासाठी हैद्राबाद गॅझेटच्या मागणीला जोर
मराठा आंदोलकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अडवत केली घोषणाबाजी, मराठा आरक्षणासाठी हैद्राबाद गॅझेटच्या मागणीला जोर
Osama Bin Laden Son Hamza : लादेनचा मुलगा हमजा अजूनही जिवंत; करत असलेल्या तयारीने अमेरिकेपासून युरोपपर्यंत धडकी भरली!
लादेनचा मुलगा हमजा अजूनही जिवंत; करत असलेल्या तयारीने अमेरिकेपासून युरोपपर्यंत धडकी भरली!
Chandrakant Patil: सगेसोयरेचा कायदा 2017 सालीच लागू, देवेंद्रजींनी केला; मंत्री चंद्रकांत पाटलांचा बार्शीतून दावा
सगेसोयरेचा कायदा 2017 सालीच लागू, देवेंद्रजींनी केला; मंत्री चंद्रकांत पाटलांचा बार्शीतून दावा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget