एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Health : पुन्हा नवं संकट? आफ्रिकन देशांमध्ये Mpox आजाराचा कहर, WHO चा इशारा, 'ही' लक्षणं तुम्हाला तर नाही ना?

Health : या आजारामुळे रुग्णांची वाढती संख्या पाहता WHO ने यावर चिंता व्यक्त केलीय. तसेच याला आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणी घोषित करण्याचाही विचार करत असल्याचं समजतंय

Health : आधी कोरोना महामारीने अवघ्या जगात कहर माजवला होता. ज्यामुळे संपूर्ण जगच थांबलं होतं. या आजारातून सुटका होते, तोच आता आणखी एका आजाराने आफ्रिकन देशांमध्ये कहर माजवलाय. युगांडा आणि केनियासह अनेक आफ्रिकन देशांमध्ये आजकाल Mpox या आजाराचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.  Mpox (Monkeypox virus Symptoms) आजारामुळे रुग्णांची वाढती संख्या पाहता जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) यावर चिंता व्यक्त केली आहे. या आजाराला आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणी घोषित करण्याचाही WHO विचार करत असल्याचं समजत आहे. या आजाराची लक्षणं काय? या आजारापासून बचाव कसा करायचा? यासंबंधीची माहिती जाणून घ्या

WHO कडून चिंता व्यक्त, आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणी घोषित होणार?

सायन्स या शैक्षणिक जर्नलने आफ्रिकन देशांमध्ये या विषाणूच्या प्रसाराबाबत चेतावणी दिली आहे. या विषाणूचा रुग्ण प्रथम काँगो (DRC) येथे नोंदवला गेला, त्यानंतर Mpox विषाणू हा युगांडा आणि केनियामध्ये पसरला. अशात आता संपूर्ण आफ्रिका खंडात Mpox पसरण्याची भीती आहे. अशा स्थितीत जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) त्याचा उद्रेक पाहता मोठ्या संकटाबाबत चिंता व्यक्त केली आहे. तर सध्याची परिस्थिती लक्षात घेता WHO याला आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणी घोषित करण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील एका पोस्टमध्ये डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस म्हणाले की, या संदर्भात ते आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमन आपत्कालीन समिती स्थापन करण्याचा विचार करत आहेत, जी आरोग्य आणीबाणी घोषित करायची आहे की नाही हे ठरवेल. जाणून घ्या आजाराशी संबंधित सर्व महत्त्वाच्या गोष्टी


MPOX म्हणजे काय?

क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते, Mpox, पूर्वी मंकीपॉक्स म्हणून ओळखला जात होता, हा एक दुर्मिळ आजार आहे जो कांजण्या सारखाच आहे. हा आजार विषाणूंमुळे पसरतो आणि बहुतेक आफ्रिकन भागात आढळतो. त्याचे रुग्ण जगाच्या इतर भागांमध्ये देखील दिसतात. MPOX साठी कोणताही विशिष्ट उपचार नाही, परंतु तो सहसा स्वतःच बरा देखील होतो.


MPOX ची लक्षणं काय आहेत?

या विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर त्याची लक्षणे दिसायला काही दिवस ते काही आठवडे लागू शकतात. 

पुरळ
ताप
थकवा
डोकेदुखी
थंडी जाणवणे
स्नायू दुखणे
याशिवाय, या आजारामध्ये सपाट, लाल ठिपके या स्वरूपात पुरळ उठणे देखील दिसू शकते, जे वेदनादायक असू शकते. हे पुरळ नंतर पू ने भरलेल्या फोडांमध्ये बदलतात. काही काळानंतर हे फोड खरुज बनतात आणि पडतात. या संपूर्ण प्रक्रियेला दोन ते चार आठवडे लागू शकतात. याशिवाय तुमच्या तोंडावर, चेहरा, हात, पाय, लिंग, योनी किंवा गुदद्वारावरही जखमा असू शकतात.


व्हायरस कसा पसरतो?

WHO च्या मते, Mpox एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये अनेक प्रकारे पसरू शकतो. व्हायरस संक्रमित त्वचा, तोंड किंवा जननेंद्रियाव्दारे थेट संपर्काद्वारे पसरू शकतो. त्याच्या प्रसाराच्या इतर मार्गांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो-

समोरासमोर बोलणे किंवा श्वास घेणे
त्वचेचा संपर्क
मौखिक लैंगिक संबध
ओठांवर किंवा त्वचेवर चुंबन घेणे
श्वसातून
याशिवाय, श्वसनमार्गाच्या संपर्कात येऊन शरीरात प्रवेश करू शकतो. तसेच, एकापेक्षा जास्त लैंगिक संबंध असल्यास त्याचा प्रसार होण्याचा धोका वाढतो.

 

MPOX टाळण्यासाठी काय करावे?

mpox ग्रस्त बहुतेक लोक 2-4 आठवड्यांत बरे होतात. या आजाराच्या लक्षणांपासून आराम मिळण्यासाठी आणि इतरांना संसर्ग होण्यापासून रोखण्यासाठी खालील गोष्टी केल्या पाहिजेत.

जोपर्यंत शक्य असेल तोपर्यंत घरी आणि तुमच्या खोलीत रहा.
साबण आणि पाण्याने किंवा हँड सॅनिटायझरने वारंवार हात स्वच्छ करा.
पुरळ बरे होईपर्यंत मास्क घाला आणि इतर लोकांच्या आसपास असताना पुरळ झाकून ठेवा.
जर तुम्ही एकटे असाल तर त्वचा कोरडी आणि ती उघडी ठेवा.
इतर कोणाच्या संपर्कात आलेल्या गोष्टींना स्पर्श करणे टाळा.
तोंडाच्या फोडांपासून आराम मिळवण्यासाठी मिठाच्या पाण्याचा वापर करा.
शरीराच्या जखमांसाठी, बेकिंग सोडा किंवा गरम शॉवर घ्या.

 

हेही वाचा>>>

Health : मळमळ..थंड घाम...थकवा..'अशी' लक्षणं तुम्हालाही असतील तर सावधान! हृदयाच्या रक्तवाहिन्यांत अडथळा असण्याची शक्यता 

 

 

 

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

 ...तर मी आमदारकीचा राजीनामा देईल,EVM चं समर्थन करत पहिल्यांदा आमदार झालेल्या भाजप नेत्याचं चॅलेंज
इव्हीएम अन् आयोगावर ठाम विश्वास, शंका निर्माण झाल्यास राजीनामा देत पुन्हा निवडणूक लढवेल, भाजप नेत्याचं चॅलेंज
आंबेडकरी समाज 6 डिसेंबरला दु:खात बुडालेला असतो, महायुतीचा 5 डिसेंबरचा शपथविधी पुढे ढकला, 'या' नेत्याची राज्यपालांकडे मागणी
आंबेडकरी समाज 6 डिसेंबरला दु:खात बुडालेला असतो, महायुतीचा 5 डिसेंबरचा शपथविधी पुढे ढकला, 'या' नेत्याची राज्यपालांकडे मागणी
Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  30 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaVikramsingh Pachpute on EVM : EVMमध्ये घोटाळा निघाल्यास आमदारकीचा राजीनामा देईन- पाचपुतेTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 30 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  30 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
 ...तर मी आमदारकीचा राजीनामा देईल,EVM चं समर्थन करत पहिल्यांदा आमदार झालेल्या भाजप नेत्याचं चॅलेंज
इव्हीएम अन् आयोगावर ठाम विश्वास, शंका निर्माण झाल्यास राजीनामा देत पुन्हा निवडणूक लढवेल, भाजप नेत्याचं चॅलेंज
आंबेडकरी समाज 6 डिसेंबरला दु:खात बुडालेला असतो, महायुतीचा 5 डिसेंबरचा शपथविधी पुढे ढकला, 'या' नेत्याची राज्यपालांकडे मागणी
आंबेडकरी समाज 6 डिसेंबरला दु:खात बुडालेला असतो, महायुतीचा 5 डिसेंबरचा शपथविधी पुढे ढकला, 'या' नेत्याची राज्यपालांकडे मागणी
Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Eknath Shinde: भाजपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता, एकनाथ शिंदेंची गृहखात्याची मागणी सरकार स्थापनेतील अडसर, आता काय घडणार?
भाजपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता, एकनाथ शिंदेंची गृहखात्याची मागणी सरकार स्थापनेतील अडसर, आता काय घडणार?
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
Waqf Board : काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
Embed widget