एक्स्प्लोर

Health : ''तळलेले पदार्थ आवडतात ना? इथे लक्ष द्या.. मानवी शरीराला दररोज किती तेल आवश्यक? FDA ची महत्त्वाची माहिती

Health :   तेलामुळे जेवणाची चव वाढते.. नाही का?? मात्र मानवी शरीराला दररोज किती तेल आवश्यक आहे? याबाबत FDA कडून माहिती देण्यात आलीय.

Health : काहींना रोजच्या जेवणात पापड, भजी, वडा असे तळलेले पदार्थ असले की जेवणाचे दोन घास जास्त जातात.. नाही का?? स्वयंपाकघरातील महत्त्वाचा भाग म्हणजे खाद्यतेल (Food Oil).. जेवणाची चव वाढवणारे हे तेल पदार्थ शिजवण्यासाठी वापरले तर जाते, पण तुम्हाला माहित आहे का? तेलाचे सेवन शरीरासाठी किती हानीकारक आहे? तसेच मानवी शरीराला दररोज किती तेल आवश्यक आहे? FDA म्हणजेच अन्न व औषध प्रशासनाने यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिलीय... जाणून घ्या..

चांगल्या आरोग्यासाठी तेलाचे किती सेवन करावे? 

आपल्या स्वयंपाकघरात सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत जवळपास सर्व पदार्थ तेलाच्या मदतीने तयार केले जातात. आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, तेल तसे आरोग्यासाठी तितके चांगले नाही, पण हे कधी? जेव्हा तुम्ही जेवणात जास्त तेल वापरता. चांगल्या आरोग्यासाठी थोड्या आणि योग्य प्रमाणात तेलाचे सेवन करणे आवश्यक आहे.  कारण तेलामध्ये काही आवश्यक पोषक आणि चरबी असतात, जे शरीरासाठी आवश्यक असतात. दररोज किती तेल वापरावे? कोणते तेल चांगले आहे? शुद्ध तेल कोणते आहे? भाज्या शिजवण्यासाठी कोणते तेल चांगले आहे? असे प्रश्न तुमच्याही मनात येत असतील तर आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला जगातील सर्वात मोठी संस्था FDA म्हणजेच अन्न व औषध प्रशासन काय सांगते ते सांगणार आहोत.

दररोज किती तेलाचे सेवन करावे?

एफडीएच्या माहितीनुसार, मानवी शरीराला दररोज सरासरी दीड चमचे तेल लागते. याचा अर्थ असा की तुम्ही एका दिवसात 20 ग्रॅमपेक्षा जास्त तेल खाऊ नये. जर तुम्ही कोणत्याही आजाराशी झुंज देत असाल तर चांगल्या दर्जाचे तेल वापरणे किंवा तेलाचे प्रमाण कमी करणे चांगले.

रिफाइंड तेल चांगले आहे का?

एफडी सांगते की, अन्नात रिफाइंड तेलचा वापर विषापेक्षा कमी नाही, यासाठी आजपासूनच जेवणात हे 4 तेल वापरा

जास्त तेल खाण्याचे तोटे

जास्त तेलाचे सेवन केल्याने हृदयाशी संबंधित अनेक आजार होऊ शकतात. हार्ट अटॅक, धमन्यांमध्ये अडथळा किंवा कोलेस्ट्रॉल, यापैकी बहुतेक रोगांचे कारण एकच असते. ते म्हणजे तेल...

पोटात सूज, वेदना आणि अतिसार
आतड्यांमध्ये बिघाड होऊ शकतो
यामुळे वजन आणि लठ्ठपणा वाढू शकतो
तुम्हाला हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका असू शकतो
मधुमेहाची समस्या असू शकते
पुरळ होऊ शकते
मेंदूच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो

तेल कमी खाण्याचे उपाय

एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, पोषणतज्ज्ञ आणि आहारतज्ज्ञ शिखा अग्रवाल शर्मा यांच्या मते, तेल कमी खाण्याची पहिली पायरी म्हणजे तळलेले अन्न टाळणे. तळलेल्या अन्नामध्ये रोजच्या गरजेपेक्षा तिप्पट तेल असते, ज्यामुळे तुमचे कोलेस्ट्रॉल वाढते. तळलेले अन्न खाण्याऐवजी उकडलेले, भाजलेले किंवा वाफवलेले पदार्थ खा. फॅन्सी सॅलड्स देखील टाळा, जे चव वाढवण्यासाठी जास्त फॅट ड्रेसिंग वापरतात. पोळी बनवताना तेल किंवा तूप कमी वापरा.

कमी तेलात भाजी कशी शिजवायची?

डॉक्टर शिखाच्या म्हणण्यानुसार, डाळी किंवा भाज्या बनवताना तुम्ही जेवढे अन्न शिजवत आहात त्यानुसार तेल किंवा तुपाचे प्रमाण घ्या. एक चमचा तेल 2-3 लोकांसाठी पुरेसे आहे. कुटुंबात जास्त लोक असले तरी दोन टेबलस्पूनपेक्षा जास्त तेल वापरू नका. मंद किंवा मध्यम आचेवर अन्न शिजवा, यामुळे भांड्याच्या तळाशी अन्न जळू नये.

स्वयंपाक करण्यासाठी सर्वोत्तम तेल कोणते आहे?

तीळ आणि शेंगदाणा तेल

रिफाइंड तेलाऐवजी तुम्ही तीळ किंवा शेंगदाणा तेल वापरू शकता. हे तेल गरम केल्यावरही खराब होत नाही आणि भारतीय स्वयंपाकघरांसाठी अतिशय योग्य आहे.

नारळ आणि मोहरी तेल

हे थंड तेल आहेत आणि ते कोणत्याही प्रकारच्या स्वयंपाकासाठी वापरले जाऊ शकतात आणि दीर्घ शेल्फ लाइफ असू शकतात.

ऑलिव्ह तेल

भाज्या तळण्यासाठी किंवा भाजण्यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑईल वापरू शकता. पण हे लक्षात ठेवा की ऑलिव्ह ऑईल जास्त आचेवर वापरू नका, कारण ते जास्त गरम झाल्यास ते खराब होऊ शकते.

सूर्यफूल तेल

सूर्यफूल तेल हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, कर्करोग, लठ्ठपणा, मधुमेह, जुनाट जळजळ आणि संधिवात विरुद्ध उपयुक्त ठरू शकते. एफडीएनेही हे तेल आरोग्यासाठी चांगले मानले आहे.

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Women Health : भविष्यात आई बनण्यासाठी आत्ताच 'एग फ्रीझिंग' करायचंय? तज्ज्ञ काय सांगतात? ते जाणून घ्या 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navneet Rana Vs Yashomati Thakur | नवनीत राणांकडून यशोमती ठाकूर यांचा नणंदबाई असा उल्लेखTOP 25 | टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha 07.30 PMABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7 PM 07 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha 07 Nov ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
Embed widget