एक्स्प्लोर

Foot Massage: दररोज पायांची मालिश करण्याचे अनेक फायदे; मेंदू आणि हृदयासाठीही लाभदायक

Foot Massage Health Benefits : दररोज पायांना आणि तळव्यांना रोज मसाज केल्याने शारीरिक आणि मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते. यामुळे तणाव दूर होऊन चांगली झोप येते.

Foot Massage Health Benefits : दिवसभर धावपळ करुन आपल्याला मानसिक (Mental Health) आणि शारीरिक (Physical Health) थकवा येतो. बहुतेक वेळेस अंगदुखी (Body Pain) जाणवते, विशेषत: पाय जास्त दुखतात. पायाच्या तळव्यामध्ये देखील वेदना जाणवतात. अशावेळी अनेकदा लोक कोमट पाण्याने पाय शेकतात किंवा हिटिंग पॅड वापरतात. यामुळे काही वेळ आराम मिळतो. पाय दुखीमुळे थकवा जाणवतो आणि तणावामुळे निद्रानाशाचीही समस्या जाणवते. जर तुम्हालाही ही समस्या असेल तर पायाच्या तळव्याला मसाज करणे फायदेशीर ठरू शकते. 

पायांना आणि तळव्यांना रोज मसाज केल्याने शारीरिक आणि मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते. यामुळे तणाव दूर होऊन चांगली झोप येते आणि अनेक आजारांपासूनही बचाव होतो. पायांच्या तळव्याला मसाज करणे देखील आयुर्वेदात फायदेशीर मानले गेले आहे. 

पायांची मालिश करण्याचे फायदे

चांगली झोप

जर तुम्हाला निद्रानाशाची तक्रार असेल आणि रात्री नीट झोप येत नसेल तर पायाच्या तळव्याला मसाज करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. दररोज रात्री झोपण्यापूर्वी पायाच्या तळव्यांना मसाज करा. यामुळे थकवा दूर होईल आणि तणाव कमी होईल. यामुळे चांगली झोप येईल. 

ताण कमी होईल

सध्या अनेकांना नैराश्य आणि तणावाची तक्रार असते. दीर्घकाळ तणावामुळे नैराश्य येऊ शकते. मन शांत ठेवण्यासाठी पायाच्या तळव्याची मालिश करावी. त्यामुळे तणाव कमी होऊन मानसिक शांती मिळते.

त्वचा होईल चमकदार

पायांना आणि तळव्यांना मसाज केल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. तळव्यांना मसाज केल्याने संपूर्ण शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. यामुळे त्वचेवर देखील तेज येते.

सांधेदुखीपासून आराम

सांधेदुखीचा त्रास असेल तर झोपताना नियमितपणे पायांना आणि तळव्यांना मालिश केल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो. मसाज केल्याने शरीरातील रक्ताभिसरण वाढते आणि नसांना आराम मिळतो. त्यामुळे सांधेदुखीपासून आराम मिळतो.

वजन कमी होण्यास मदत

दररोज पायाच्या मालिश केल्याने लठ्ठपणा कमी करण्यास मदत होते. मसाज केल्याने चयापचय सुधारते, यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Health Tips : गॅस, पोट फुगणे आणि अपचन... चुकीच्या वेळी फळे खाल्ल्याने होतात 'या' समस्या, फळे खाण्याची योग्य वेळ कोणती?

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad Beed Police: वाल्मिक कराडला ठेवलेल्या पोलीस स्टेशनमध्ये अचानक 5 पलंग का आणले? पोलिसांचं महत्त्वाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रिटमेंट, पोलीस ठाण्यात पलंगाची व्यवस्था? पोलिसांचं महत्त्वाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
संतोष देशमुखांच्या लेकीची आर्ह हाक, आता पुण्यात निघणार जनआक्रोश मोर्चा; तारीख अन् ठिकाणही ठरलं
संतोष देशमुखांच्या लेकीची आर्ह हाक, आता पुण्यात निघणार जनआक्रोश मोर्चा; तारीख अन् ठिकाणही ठरलं
धनंजय मुंडेंची विकेट पाडून भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश? विजय वडेट्टीवारांच्या दाव्याने भुवया उंचावल्या!
धनंजय मुंडेंची विकेट पाडून भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश? विजय वडेट्टीवारांच्या दाव्याने भुवया उंचावल्या!
Dhananjay Munde: वाल्मिक कराडचा एन्काऊंटर, राजीनामा, पालकमंत्री; मंत्री धनंजय मुंडे मीडियासमोर पहिल्यांदाच बोलले
Video: वाल्मिक कराडचा एन्काऊंटर, राजीनामा, पालकमंत्री; मंत्री धनंजय मुंडे मीडियासमोर पहिल्यांदाच बोलले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 02 PM : 02 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Cabinet meeting : सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आता मुंबई बँकेतून, कॅबिनेट बैठकीत 2 निर्णयDhananjay Munde: वाल्मिक कराडचा एन्काऊंटर, राजीनामा,पालकमंत्री; मंत्री धनंजय मुंडे पहिल्यांदाच बोललेTop 50 : टॉप 50 राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 January 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad Beed Police: वाल्मिक कराडला ठेवलेल्या पोलीस स्टेशनमध्ये अचानक 5 पलंग का आणले? पोलिसांचं महत्त्वाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रिटमेंट, पोलीस ठाण्यात पलंगाची व्यवस्था? पोलिसांचं महत्त्वाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
संतोष देशमुखांच्या लेकीची आर्ह हाक, आता पुण्यात निघणार जनआक्रोश मोर्चा; तारीख अन् ठिकाणही ठरलं
संतोष देशमुखांच्या लेकीची आर्ह हाक, आता पुण्यात निघणार जनआक्रोश मोर्चा; तारीख अन् ठिकाणही ठरलं
धनंजय मुंडेंची विकेट पाडून भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश? विजय वडेट्टीवारांच्या दाव्याने भुवया उंचावल्या!
धनंजय मुंडेंची विकेट पाडून भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश? विजय वडेट्टीवारांच्या दाव्याने भुवया उंचावल्या!
Dhananjay Munde: वाल्मिक कराडचा एन्काऊंटर, राजीनामा, पालकमंत्री; मंत्री धनंजय मुंडे मीडियासमोर पहिल्यांदाच बोलले
Video: वाल्मिक कराडचा एन्काऊंटर, राजीनामा, पालकमंत्री; मंत्री धनंजय मुंडे मीडियासमोर पहिल्यांदाच बोलले
Ambadas Danve on Walmik Karad : अंबादास दानवेंनी वाल्मिक कराडच्या बॉडी लँग्वेजमधील 'ती' गोष्ट हेरली, फडणवीस सरकारकडे केली मोठी मागणी
अंबादास दानवेंनी वाल्मिक कराडच्या बॉडी लँग्वेजमधील 'ती' गोष्ट हेरली, फडणवीस सरकारकडे केली मोठी मागणी
Fetisch Barbie : 'बार्बी डॉल'सारखं दिसण्यासाठी महिलेनं खर्च केले कोट्यवधी रुपये; बोटॉक्सचा अतिरेक, फुगलेले ओठ पाहुन नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
'बार्बी डॉल'सारखं दिसण्यासाठी महिलेनं खर्च केले कोट्यवधी रुपये; बोटॉक्सचा अतिरेक, फुगलेले ओठ पाहुन नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
सत्तारांची दादागिरी मोडून काढणार? सिल्लोडच्या जमिनी हडपण्यावरून शिरसाटांचा निशाणा, म्हणाले..
सत्तारांची दादागिरी मोडून काढणार? सिल्लोडच्या जमिनी हडपण्यावरून शिरसाटांचा निशाणा, म्हणाले..
Maharashtra government Cabinet meeting: सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आता मुंबई बँकेतून होणार, पहिल्या कॅबिनेट बैठकीत दोन मोठे निर्णय
सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आता मुंबई बँकेतून होणार, पहिल्या कॅबिनेट बैठकीत दोन मोठे निर्णय
Embed widget