Screen Time Guidelines For Children : तुमची मुलं तासनतास मोबाईल पाहतात का? मुलांचा Screen Time किती असावा? बालरोग तज्ज्ञ काय सांगतात?
सध्या लहान मुलांचा स्क्रीन टाइम वाढत आहे. त्यामुळे लहान मुलांच्या निरोगी आरोग्यासाठी डिजिटल माध्यमांचा मर्यादित वापर हवा, असा सल्ला बालरोग तज्ज्ञ सांगतात.
Screen Time Guidelines For Children : सध्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे (Screen Time) डिजिटल माध्यमांचा वाढता वापर होत असताना स्क्रीन टाइम वाढतो आहे. त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सर्वजण काही ना काही शिकत असतो. त्यामुळे आपण सातत्याने ऑनलाइन असल्याचे पहायला मिळते. मात्र, एककीडे डिजिटल माध्यमांचा वापर आपल्या आय़ुष्यात वाढत असला तरी त्याच्या वापरावर मर्यादा असणे आवश्यक आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत किती तास त्याचा दिवसात वापर व्हावा, याकडे वैद्यकीय तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे. त्यामुळे लहान मुलांच्या निरोगी आरोग्यासाठी डिजिटल माध्यमांचा मर्यादित वापर हवा, असा सल्ला बालरोग तज्ज्ञ सांगतात.
सू्र्या मदर अॅन्ड चाईल्ड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वरिष्ठ बालरोग तज्ज्ञ , डॉ. रोहिणी नगरकर सांगतात की, वर्गात शिक्षण घेत असताना डिजिटल माध्यमांद्वारे विविध समस्या सोडवण्यात येतात किंवा या समस्या सोडवण्यासाठी तंत्रज्ञानाचा त्याचा वापर केला जातो. तसेच त्यातून एखादी गोष्ट समजून घेणं शक्य होते. आव्हानात्मक गोष्टी शिकण्यासाठी डिजिटल माध्यमे उपयोगी ठरतात. शिक्षण घेताना पारंपरीक माध्यमे कमी पडत असताना डिजिटल माध्यमांमुळे त्यांची कमतरता भरून काढण्यास मदत होते. तसंच एखाद्या गोष्टीचे विविध दृष्टीकोन समजून घेण्यास मदत होते. तंत्रज्ञान आणि आरोग्याचे फायदे यांच्यातील समतोल साधण्यासाठी लहान मुलांमध्ये डिजिटल माध्यमांचा किती प्रमाणात कसा वापर करावा याबाबत जागृती असणे आवश्यक आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे.
स्क्रीन टाईम कमी करा...
मुलांचा शारिरीक आणि बौद्धिक विकास होत असताना त्यावेळी दोन वर्षापर्यंतच्या मुलांनी स्क्रीन टाळणे आवश्यक आहे. तर दुसरीकडे, 24 ते 59 महिन्यादरम्यानच्या मुलांनी स्क्रीनचा मर्यादित वापर करावा किंवा मोबाईल ठराविक काळापुरतीच वापरावी असा सल्ला देण्यात आला. पाच ते दहा वर्षाच्या मुलांनी दिवसातून किमान दोन तासच स्क्रीनच्या माध्यमांचा वापर करावा. स्क्रीन टाइम हा तात्पुरता असायला हवा. अन्यथा मैदानी खेळ, पुरेशी विश्रांती, कुटुंबातील वेळ, अभ्यास, तसेच कौशल्य विकासाच्या दृष्टीच्या गोष्टी बाजूला पडून त्यांची जागा स्क्रीन टाइमने घेता कामा नये. अन्यथा ते आरोग्याच्या दृष्टीने तोट्याचे आहे. अनेकदा डिजिटल माध्यमे वापरताना त्यातील कोणती गॅजेट्स हानीकारक आहे याची मुलांना ओळख झाली पाहिजे. शैक्षणिक कारणांच्या माध्यमातून चुकीच्या गोष्टींचा वापर होऊन त्यांचे नुकसान होऊ नये यासाठी मुलांमध्ये खेळते, शिक्षणासाठी पोषक वातावरण तयार करणे ही पालकांची मोठी जबाबदारी आहे, असं त्या सांगतात.
रिल्सपाहून मुलं तशीच वागतात...
अनेकदा डिजिटल माध्यमांवर पहायला मिळणाऱ्या विविध प्रकारचे व्हिडिओमुळे मुलांच्या संवादकौशल्यावरही परिणाम होऊ शकतो. परिणामी, त्यांची भाषाशैलीच बदलण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली. मजा म्हणून पाहण्यात येणाऱ्या विविध अॅक्शनच्या रिल्स कधी कधी त्या मुलांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा गोष्टींचे लहान मुले अनुकरण करत असतात. त्यामुळे अशा गोष्टींपासून लहान मुले दूर राहणेच योग्य आहे.
डोळ्यांचा त्रास सुरु होतो...
मुलांचा टिव्ही असो की मोबाईलचा स्क्रीन टाइम वाढला की त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती किंवा आजूबाजूच्या व्यक्तींकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो. त्यांच्यात फारसा रस नसतो. लहान वयात मुलांच्या कौटुंबिक संवादातून सामाजिक दृष्टी विकसित होत असते. मात्र, माध्यमांच्या अतिवापरामुळे लहान वयांपासून ही दृष्टी खुंटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे निरोगी आयुष्यासाठी आता मुलांच्या डिजिटल माध्यमांच्या वापरावर मर्यादा असणे आवश्यक आहे, असाही सल्ला देण्यात आला आहे.
इतर महत्वाची बातमी-
Health Tips : अशक्तपणा आणि थकवापासून आराम मिळेल; दररोज फक्त 'ही' 3 जीवनसत्त्वं घ्या!
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )