(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : अशक्तपणा आणि थकवापासून आराम मिळेल; दररोज फक्त 'ही' 3 जीवनसत्त्वं घ्या!
Health Tips : कोणत्याही शारीरिक प्रयत्नाशिवाय किंवा अशक्तपणाशिवाय हे घडणे सामान्य मानले जात नाही.
Health Tips : दिवसभर सतत काम केल्यानंतर शरीरात थकवा जाणवणं ही स्वाभाविक गोष्ट आहे. पण, जर तुम्हाला दिवसभरात वारंवार थकवा जाणवत असेल तर मात्र, ही गंभीर समस्या आहे. सतत थकवा आणि अशक्त वाटणे किंवा झोपल्यानंतरही झोप न लागणे हे शरीरातील अनेक प्रकारचे जीवनसत्त्व (Vitamin) कमी होत असल्याचे लक्षण आहे. तुम्हाला जर असं वारंवार होत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या असं आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
कोणत्याही शारीरिक प्रयत्नाशिवाय किंवा अशक्तपणाशिवाय हे घडणे सामान्य मानले जात नाही. अनेक वेळा केवळ शारीरिकच नाही तर मानसिक तणावामुळेही शरीर थकते. त्यामुळे तुमच्या कामाच्या क्षमतेवरही परिणाम होतो. शारीरिक आणि मानसिक थकवा दूर करण्यासाठी आहारात कोणत्या जीवनसत्त्वांचा समावेश करावा? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
व्हिटॅमिन डी (Vitamin D)
शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. त्याची कमतरता शरीर आणि मन दोन्हीच्या कार्यक्षमतेवर परिणाम करते. थकवा, अशक्तपणा आणि शरीर दुखणे ही या जीवनसत्त्वाच्या कमतरतेची लक्षणे आहेत. याच्या कमतरतेमुळे झोप पूर्ण झाल्यानंतरही जडपणा किंवा झोप येण्याची समस्या उद्भवते. संत्र्याचा रस, गाईचे दूध आणि दही हे व्हिटॅमिन डीचे उत्कृष्ट स्रोत आहेत.
व्हिटॅमिन सी (Vitamin C)
व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे आपल्या शरीराला नेहमीच आजारांनी घेरलेले असते. हे जीवनसत्व शरीरात रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याचे काम करते. याच्या कमतरतेमुळे शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता कमी होते. शरीराची प्रतिकारशक्ती कमी असल्याने शरीरात थकवा आणि अशक्तपणा राहतो. त्वचा आणि केस निर्जीव दिसू शकतात. अशा वेळी मोसंबी, आवळा, लिंबू, किवी, अननस, स्ट्रॉबेरी, संत्री आणि आंबा खा. यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते.
व्हिटॅमिन बी 12 (Vitamin B12)
व्हिटॅमिन बी 12 आपल्या शरीरासाठी खूप गरजेचं आहे. शरीरातील रक्तपेशी आणि डीएनए तयार करण्यासाठी व्हिटॅमिन बी12 आवश्यक असते. व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे देखील नैराश्य येते. व्हिटॅमिन बी 12 चेतासंस्थेसाठी देखील आवश्यक आहे. व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते. व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही आहारात मासे, अंडी, संपूर्ण धान्य आणि मांस यांचा समावेश करू शकता.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :