एक्स्प्लोर

Video: मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या मॅनेजरला शिवसेनेनं दाखवलं इंगा; हात जोडून मागितली माफी

मॅनेजरकडून होत असलेल्या अमराठी भाषेच्या जबरदस्तीविरोधात ठाकरेंच्या शिवसेना विभाग प्रमुखांनी शोरुममध्ये जाऊन मॅनेजरला समज दिली.

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या आणि महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत सर्व धर्म, पंथ, भाषा आणि प्रदेशातील व विदेशातीलही नागरिक गुण्यागोविंदाने राहतात. मात्र, येथे सातत्याने मराठी माणसांवरच जोरजबरदस्ती केल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी मराठी (Marathi) माणसांना त्रास दिला जात असल्याचे, तसेच मराठी बोलणार नसल्याचे सांगत ठणकावल्याचं पाहायला मिळालं होतं. आता, पुन्हा एकदा भाषिक वाद समोर आला असून एका शोरोममधील मॅनेजरकडून मराठी बोलण्यास नकार दिल्याची व ग्राहकाला मराठी न बोलण्याची अरेरावी केल्याची घटना उघडकीस आली आहे. मराठी गुजराती (Gujrati) वाद समोर आला असून, मराठीत नको तर हिंदी किंवा गुजरातीत बोला, अशी धमकीच रुपम शोरुममधील मॅनेजरने मराठमोळ्या ग्राहकाला दिली. त्यानंतर, स्थानिक शिवसेना (Shivsena) पदाधिकाऱ्यांनी त्याला शिवसेना स्टाईलने उत्तर दिल्याने त्याने माफी मागितली. 

मॅनेजरकडून होत असलेल्या अमराठी भाषेच्या जबरदस्तीविरोधात ठाकरेंच्या शिवसेना विभाग प्रमुखांनी शोरुममध्ये जाऊन मॅनेजरला समज दिली. त्यानंतर, हा वाद संपुष्टात आला. तत्पूर्वी,  क्रॉफर्ड मार्केटमधील रुपम शोरुमच्या मॅनेजरने मराठी तरुणाला गुजराती किंवा हिंदीमध्ये बोलण्यास जबरदस्ती केली होती. मी मराठी बोलणार नाही, असे या मॅनेजरने म्हटले, तसेच ग्राहकालाही हिंदी किंवा गुजराती भाषेत बोलण्यासाठी दम दिला. त्यामुळे, सदर ग्राहक तरुणाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख संतोष शिंदे यांच्याकडे त्याची तक्रार केली. त्यानंतर, सदर मॅनेजरला शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शिवसेना स्टाईलने समज दिली, व त्यास मराठी बोलायला लावले. तसेच, मराठी लोकांची माफी मागाला लावली, त्यानंतर हा विषय इथेच संपला. 

मॅनेजरने भाषिक वाद घातला

गिरगावातील रहिवाशी खरेदीसाठी गेले असता, त्या ठिकाणच्या मॅनेजरने भाषिक वाद घातला. तुम्ही हिंदी आणि गुजरातीमध्ये बोला, असे त्यांनी म्हटले. त्यावर, मराठी कुटुंबीयांनी नकार दिला. तसेच, आम्ही महाराष्ट्रात आहोत आणि मराठीतच बोलणार असे म्हटले. या प्रकारानंतर आम्ही त्याठिकाणी गेलो आणि संबंधित मॅनेजरला माफी मागायला लावली. तसेच, आम्ही त्याला ठणकावून सांगितले की, येथील रहिवाशी हे मराठीतच बोलणार,असे शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख संतोष शिंदे यांनी सांगितले. 

महायुती सरकावर टीका

गेल्या काही 4-5 महिन्यांपासून मराठी माणसाची गळचेपी केली जात आहे का? मला वाटतं, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पुन्हा सुरू करावी लागणार का हा सर्व प्रकार सुरु आहे, हे सरकार फसवं सरकार आहे. मरीन लाईन स्थानकाचे नाव बदलले जाणार आहे, पण त्याचे नाव दिले नाही. मुंबई सेंट्रल स्थानकाचे नाव बदलले पाहिजे म्हणन आम्ही मागणी करत आहे. सीएसएमटी स्थानकावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला पाहिजे. पण हे सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे. मराठी माणसांसाठी 25% घर ही टॉवर आणि नव्या इमारतीत राखीव ठेवायला हवी, अशी आम्ही मागणी केली आहे. मात्र, हे सरकार गद्दार आणि खोक्यांच आहे, त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार, अशी टीकाही संतोष शिंदे यांनी केलीय.  

हेही वाचा

प्रयागराजमध्ये 50 कोटी भारतीयांच गंगास्नान, न जाऊ शकलेल्यांच्या घरी पवित्र जल; फडणवीसांकडून कौतुक

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी

व्हिडीओ

Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट
Eknath Shinde Brother : साताऱ्यातील सावरी गावात शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टजवळ ड्रग्स सापडलं- अंधारे
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, आमदारकी जाणार? वकील काय म्हणाले?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
IPL Auction 2026: आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
Embed widget