Health Tips : हिवाळ्यात 'या' भाज्या फ्रिजमध्ये ठेवण्याची चूक पडेल महागात, आरोग्यासाठी घातक
Vegetables Store in Fridge : थंडीच्या मोसमाच फ्रिजमध्ये ठेवलेल्या काही भाज्यांचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक आहे. जाणून घ्या अशा कोणत्या आहेत आणि त्यांच्या शरीरावर काय वाईट परिणाम होतो.

Do Not Store These Vegetables in Fridge During Winter : फ्रिज (Fridge) म्हणजे रेफ्रिजरेटर (Refrigerator) हा आपल्या जीवनाचा (Lifestyle) जणू एक महत्त्वाचा भागच बनला आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात फ्रिजमुळे अन्न साठवणे सोपे झाले आहे. आठवड्यात सुट्टीच्या दिवशी आपण भाजी विकत घेतो आणि फ्रीजमध्ये साठवून ठेवतो. हिवाळ्यामध्ये काही भाज्या फ्रिजमध्ये ठेवू नयेत. त्यामुळे या भाज्यांवर परिणाम आणि यामुळे आरोग्याला गंभीर हानी पोहोचू शकते. आरोग्यतज्ज्ञांचे मते, थंडीच्या मोसमाच फ्रिजमध्ये ठेवलेल्या काही भाज्यांचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक आहे. जाणून घ्या अशा कोणत्या आहेत आणि त्यांच्या शरीरावर काय वाईट परिणाम होतो.
हिवाळ्यात 'या' भाज्या फ्रीजपासून दूर ठेवा
1. लसूण (Garlic)
लसूण साठवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे स्वयंपाकघरात लहान टोपलीत ठेवणे. लसून खोलीमधील तापमानातही बरेच दिवस ताजी आणि सुरक्षित राहते. लसूण सोलून किंवा बारीक करून फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यामधील पोषक तत्वे कमी होतात. बहुतेक वेळेस आपण आले-लसून पेस्ट बनवून किंवा लसून सोलून आणि कापून ती फ्रिजमध्ये ठेवतो. याचे सेवन आरोग्यासाठी घातक आहे.
2. काकडी (Cucumber)
काकडीचे सेवन आपण सॅलडमध्ये मोठ्या प्रमाणात करतो. हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. पण हिवाळ्यात काकड्या विकत घेतल्यास त्या फ्रीजमध्ये ठेवू नका. काकडी खोलीमधील सामान्य तापमानावर ठेवा, अन्यथा तुमचे आरोग्य बिघडू शकते. काकडीमध्ये जास्त प्रमाणात पाणी असते, ती फ्रिजमध्ये ठेवल्यावर ती अधिक थंड होते. हिवाळ्यात अशा थंड काकडीचे सेवन नुकसानदायक ठरेल.
3. टोमॅटो (Tomato)
हिवाळ्याच्या हंगामात टोमॅटोही सामान्य तापमानावर टोमॅटो ठेवू शकता. फ्रीजमध्ये ठेवल्यास त्याची चव बदलते. टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यांची चव (Taste), पोत (Texture) आणि रंगही (Color) बदलतो.
4. बटाटा (Potato)
बटाट्याला भाज्यांचा राजा म्हटले जाते कारण भाजी कोणतीही त्या भाजीमध्ये बटाटा मिसळता येते. बटाटे कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये, कारण त्यामध्ये असलेल्या स्टार्चचे साखरेत रूपांतर होते. यामुळे शरीरातील ग्लुकोजच्या पातळीचा धोका वाढतो. तसेच लठ्ठपणा वाढण्याचाही धोका असतो.
Disclaimer : या लेखात नमूद केलेले दावे फक्त सूचना आणि माहिती म्हणून आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा याची पुष्टी करत नाही. कोणतेही उपचार/औषध/आहार आणि सूचना लागू करण्यापूर्वी, कृपया डॉक्टरांचा किंवा संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्या.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
