एक्स्प्लोर

UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा

UPSC CSE 2025 Notification : यूपीएससी परीक्षेची नोटिफिकेशन जारी झालं असून भारतीय नागरी सेवा आणि भारतीय वन सेवेच्या जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. 

UPSC CSE 2025 Notification : केंद्रीय लोकसेवा आयोगाने 2025 साठीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलिस सेवा आणि भारतीय वन सेवा यासह विविध पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यासाठी अर्ज करण्यासाठीची अंतिम मुदत ही 11 फेब्रुवारी आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या upsc.gov.in या अधिकृत वेबसाईटवर अधिक माहिती मिळेल. यंदाच्या परीक्षेसाठी पदांची संख्या अद्याप जाहीर करण्यात आली नाही. 

UPSC नागरी सेवा परीक्षेसाठी अर्ज कसा करायचा? 

1. सर्वप्रथम, UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in ला भेट द्यावी.
2. मुख्यपृष्ठावरील 'UPSC नागरी सेवा प्राथमिक परीक्षा 2025 नोंदणी लिंक' (UPSC Civil Service Preliminary Exam 2025 Registration Link) वर क्लिक करा.
3. एक नवीन पेज उघडेल. त्यामध्ये उमेदवारांना त्यांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
4. यशस्वी नोंदणीनंतर, उमेदवार अर्ज भरू शकतात.
5. अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे अपलोड करा, फी भरा आणि फॉर्म सबमिट करा.
6. अर्जाची प्रिंटआउट घ्या आणि भविष्यातील संदर्भासाठी सुरक्षित ठेवा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि महत्वाची माहिती

यावर्षी, उमेदवारांना त्यांची नोंदणी 11 फेब्रुवारी 2025 पर्यंत पूर्ण करायची आहे. यूपीएससीने परीक्षेच्या तारखा आधीच जाहीर केल्या आहेत आणि आता उमेदवारांना तयारी सुरू करण्यासाठी वेळ मिळाला आहे. यावेळी UPSC CSE अधिसूचना लवकर प्रसिद्ध करण्यात आली आहे, जेणेकरून उमेदवारांना अधिक वेळ मिळेल आणि त्यांच्या परीक्षेची चांगली तयारी करता येईल.

IAS, IFS सूचना एकत्र

यावर्षी, 22 जानेवारी रोजी, भारतीय नागरी सेवा (पूर्व) परीक्षा 2025 सोबत, भारतीय वन सेवा (IFS) प्राथमिक परीक्षा 2025 साठी अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. दोन्ही परीक्षा UPSC द्वारे आयोजित केल्या जातात आणि उमेदवार दोन्हीसाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांना सूचित करण्यात येते की त्यांनी त्यांचा नोंदणी फॉर्म विहित मुदतीत ऑनलाइन सबमिट करावा. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 11 फेब्रुवारी 2025 आहे.

मागील वर्षाच्या रिक्त पदांची माहिती

गेल्या वर्षी, UPSC ने CSE साठी एकूण 1,056 आणि भारतीय वन सेवेसाठी (IFoS) 150 रिक्त पदांची अधिसूचना जारी केली होती. यंदाच्या परीक्षेसाठी रिक्त पदांची संख्या अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु यंदाही ही संख्या मोठी असेल, अशी उमेदवारांची अपेक्षा आहे. गेल्या वर्षीच्या परीक्षेचे मुलाखतीचे सत्र आता सुरू असून ते एप्रिलमध्ये संपणार आहे. UPSC CSE 2025 ची प्राथमिक परीक्षा 25 मे रोजी होणार आहे आणि त्यानंतर मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या जातील.

ही बातमी वाचा: 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली,  प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली, प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh : पंकजा मुंडेंनी व्हिडीओ कॉल केला, धनंजय मुंडेंनी फोनही केला नाही!Walmik Karad Judicial Custody : वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पुढे काय?ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 22 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सPune Reverse Car Accident : पुण्यात रिव्हर्स गिअरने अनर्थ, कार पहिल्या मजल्यावरुन कोसळली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली,  प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली, प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
Anjali Damania: धनंजय मुंडेंचं मंत्रिपद सोडा, आमदारकीच धोक्यात; अंजली दमानियांनी निर्वाणीचं अस्त्रं बाहेर काढलं
धनंजय मुंडेंचं मंत्रिपद सोडा, आमदारकीच धोक्यात; अंजली दमानियांनी निर्वाणीचं अस्त्रं बाहेर काढलं
Zomato Share Price  :झोमॅटोचा शेअर गडगडला, तीन दिवसांमध्ये 44620 कोटी बुडाले, पुढं काय, तज्ज्ञ काय म्हणाले?
झोमॅटोच्या शेअरमध्ये घसरणीचा ट्रेंड, गुंतवणूकदारांचे 44 हजार कोटी बुडाले, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
Maharashtra Politics: शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याची चर्चा; मनपाच्या निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढणार?
शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याची चर्चा; मनपाच्या निवडणुकीआधी शिंदेंची डोकेदुखी वाढणार?
Embed widget