एक्स्प्लोर

बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना

श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड येथे आज संत वामन भाऊ यांचा 49 वा पुण्यतिथी सोहळा साजरा केला जात आहे. मागील साधारण 20 ते 25 वर्षांपासून पुण्यतिथीच्या दिवशीच्या महापूजेचा मान धनंजय मुंडे यांना आहे

बीड : राज्यातील विधानसभा निवडणुकांपूर्वीपासून बीड (Beed) जिल्ह्यातील जातीय सलोखा व सामाजिक स्वास्थ बिघडल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच, गेल्या महिनाभरापासून बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याकांडामुळेही बीड जिल्हा चर्चेत असून जिल्ह्यातील दहशत व गुन्हेगारीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. बीडमधील वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय मानले जात असून खंडणी प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच, मोक्काअंतर्गतही कारवाई सुरू आहे. त्यामुळे, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. धनजंय मुंडे हे गुंडांना सांभाळत असल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. दरम्यान, श्री क्षेत्र गहिनीनाथ गड येथे वैराग्यमूर्ती संत श्रेष्ठ श्री वामन भाऊ यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आयोजित महापुजेस राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे प्रतिवर्षीप्रमाणे उपस्थित राहिले. यावेळी आपल्या बीड जिल्ह्यातील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा कायम अबाधित राहावा अशी प्रार्थना धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांनी श्री गहिनीनाथ महाराज व संत वामन भाऊ यांच्या चरणी केली असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. 

श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड येथे आज संत वामन भाऊ यांचा 49 वा पुण्यतिथी सोहळा साजरा केला जात आहे. मागील साधारण 20 ते 25 वर्षांपासून पुण्यतिथीच्या दिवशीच्या महापूजेचा मान धनंजय मुंडे यांना आहे. दरवर्षीच्या  परंपरेप्रमाणे याही वर्षी धनंजय मुंडे हे पुण्यतिथीच्या आदल्या दिवशी रात्रीच गहिनीनाथ गड येथे दाखल झाले. पहाटेच्या विशेष महापूजेनंतर धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाची ऊर्जा मला गोरगरिबांची सेवा करण्याचे बळ देते, असेही धनंजय मुंडे म्हणाले. दरम्यान, येथील दर्शनानंतर धनंजय मुंडेंना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, संतोष देशमुख यांच्या खुनाच्या घटनेचं प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवलं पाहिजे आणि आरोपींना फाशीची शिक्षा दिली पाहिजे, असे मुंडेंनी म्हटले. मात्र, याप्रकरणी जास्त बोलण्याचं त्यांनी टाळलंय 

अन् दोघांनीही एकमेकांना बांधला फेटा

दरम्यान संत वामन भाऊ यांच्या समाधीची महापूजा संपन्न झाल्यानंतर श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांनी वारकरी संप्रदायाची ओळख असलेला मानाचा फेटा धनंजय मुंडे यांना बांधला. तर गडाचे महंत म्हणून धनंजय मुंडे यांनी विठ्ठल महाराज शास्त्री यांनाही तसाच फेटा स्वतःच्या हाताने बांधला. यावेळी संत वामन भाऊ यांच्या नावाचा जयघोष असंख्य भाविकांच्या उपस्थितीत करण्यात आला.

हेही वाचा

धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Sharad Pawar: पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट;  शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट; शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली,  प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली, प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh : पंकजा मुंडेंनी व्हिडीओ कॉल केला, धनंजय मुंडेंनी फोनही केला नाही!Walmik Karad Judicial Custody : वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पुढे काय?ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 22 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सPune Reverse Car Accident : पुण्यात रिव्हर्स गिअरने अनर्थ, कार पहिल्या मजल्यावरुन कोसळली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Sharad Pawar: पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट;  शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट; शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली,  प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली, प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
Anjali Damania: धनंजय मुंडेंचं मंत्रिपद सोडा, आमदारकीच धोक्यात; अंजली दमानियांनी निर्वाणीचं अस्त्रं बाहेर काढलं
धनंजय मुंडेंचं मंत्रिपद सोडा, आमदारकीच धोक्यात; अंजली दमानियांनी निर्वाणीचं अस्त्रं बाहेर काढलं
Zomato Share Price  :झोमॅटोचा शेअर गडगडला, तीन दिवसांमध्ये 44620 कोटी बुडाले, पुढं काय, तज्ज्ञ काय म्हणाले?
झोमॅटोच्या शेअरमध्ये घसरणीचा ट्रेंड, गुंतवणूकदारांचे 44 हजार कोटी बुडाले, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
Embed widget