डिप्रेशन जीवघेणं ठरु शकतं, याची लक्षणे कोणती?
आपल्या भोवती असणारे अनेकजण मानसिक तणावात असतात. पण अनेकदा आपल्याला ते कळत नाही. अनेकदा डिप्रेशनच्या भोवऱ्यात अडकलेल्या व्यक्ती टोकाचं पाऊलही उचलतात. वेळीच जर ही बाब लक्षात आली तर त्या व्यक्तीला मानसिक आधार देऊन डिप्रेशमधून सावरण्यासाठी आपण मदत करू शकतो.
मुंबई : अनेकदा आपल्यासोबत काही अशा व्यक्ती असतात, ज्या मनातून काही गोष्टिंमुळे किंवा प्रसंगांमुळे अडचणीत सापडलेल्या असतात. एखादी गोष्ट मनात ठेवून ते त्या गोष्टीचा फार विचार करतात. परिणामी अनेकदा अशा व्यक्ती डिप्रेशनला बळी पडतात. डिप्रेशनची समस्या उद्भल्यास तीव्र मानसिक त्रासाचा सामना करावा लागतो. अनेकदा डिप्रेशनच्या भोवऱ्यात अडकलेल्या व्यक्ती टोकाचं पाऊलही उचलतात. याआधीही डिप्रेशन किंवा मानसिक आजारांना बळी पडून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललेल्याचं समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतनेही आत्महत्या केली असून तो गेल्या काही दिवसांपासून डिप्रेशनमध्ये असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. त्यामुळे आपल्या सहवासातील अशा व्यक्तींना ओळखून त्यांच्याशी बोलावं. त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी त्यांना मदत करावी. अशातच आता प्रश्न पडला असेल की, एखादी व्यक्ती डिप्रेशनमध्ये आहे की, नाही. हे कसं ओळखावं? या प्रश्नाचं उत्तर म्हणून आम्ही आज तुम्हाला डिप्रेशनची काही लक्षणं सांगणार आहोत. जाणून घेऊयात...
डिप्रेशनमध्ये असलेल्या व्यक्तीची ओळख चीन पद्धतींनी केली जाऊ शकते. सायकॉलॉजिकल, फिजिकल आणि सोशल
1. सायकॉलॉजिकल लक्षणांमध्ये व्यक्ती दुःखी आणि सगळ्यांपासून लांब आणि एकटी राहू लागते. याव्यतिरिक्त त्या प्रत्येक गोष्टीत आपलीच चूक असल्याचं सांगू लागतात.
2. तर फिजिकली पाहायचं झालं तर, डिप्रेशनमध्ये असलेल्या व्यक्तींना रात्री शांत झोप लागत नाही. त्यामुळे या व्यक्ती थकलेल्या दिसतात. तसेच त्यांचा आवाजही खालावतो.
3. डिप्रेशन किंवा नैराश्यात असलेल्या व्यक्ती सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणं टाळतात. त्यांना कुठे जाणं, कोणाशी बोलणं आवडत नाही. ते एकटं राहणं पसंत करतात.
4. या व्यक्ती नेहमी विचारात असतात. त्यांच्या डोक्यात सतत वाईटसाईट विचार येतात, भीती वाटते.
5. डिप्रेशनमध्ये गेलेल्या व्यक्ती मनमोकळेपणाने हसत नाहीत, ते सतत कोणत्यातरी विचारात असतात. त्यांना झोपही लागत नाही.
6. डिप्रेस्ड लोक बऱ्याचदा नकारात्मक गोष्टींचा विचार करतात. एखाद्या साकारात्मक गोष्टिकडेही ते नकारात्मक पद्धतीने पाहतात.
7. नैराश्यात असणाऱ्या व्यक्ती उगाच गरज नसताना रडतात, त्यांना अशक्तपणा जाणवतो, सतत डोकेदुखीची समस्या होते, ह्रदयाची धडधड वाढणे, अंगाला घाम सुटणे यांसारखी लक्षणं दिसून येतात.
काही उपाय :
- दररोज व्यायाम करा
- वेळेत जेवण करा
- वेळेत झोपा
- स्वतःवर विश्वास ठेवा
- जास्त विचार करू नका
- कुटुंबासोबत वेळ घालवा
- सकारात्मक विचार करा
मानसिक आरोग्य जपण्यासाठी तुम्ही स्वतःला सकारात्मक ठेवणं हा सर्वात उत्तम उपाय असल्याचं नेहमीच तज्ज्ञ सांगत असतात. पण त्याचबरोबर तुम्ही स्वतःला इतर गोष्टिंमध्ये व्यस्त ठेवूनही मानसिक आरोग्य राखू शकता. यानंतरही जर तुम्हाला मानसिक तणाव जाणवत असेल, तर मात्र लगेच तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत फायदेशीर ठरतं. तसेच यासंदर्भात कोणताही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सला घ्या.
दरम्यान, सध्या संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसने आपले हातपाय पसरले आहेत. अशातच काही देशांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आपल्या देशांत लॉकडाऊन लागू केला आहे. लॉकडाऊनमुळे अनेक लोक आपापल्या घरांमध्ये बंद आहेत. भारतातही लॉकडाऊन लागू करण्यात आला असला तरी सध्या लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरु आहे. अद्यापही अनेक उद्योगधंदे बंद आहेत. लोकं घरात अडकली आहेत. त्यामुळे अनेकजण मानसिक तणावात आहेत. कोरोनासारख्या महामारीत आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहेच, पण त्याचबरोबर आपलं मानसिक आरोग्यही जपण्याची गरज आहे.
(टिप : वरील बाबी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :
Coronavirus Lockdown | लॉकडाऊनमुळे मूड स्विंग्सचा सामना करताय? जाणून घ्या उपाय
Coronavirus | एकदा संसर्ग झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो का?
लॉकडाऊनदरम्यान मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी?, तज्ज्ञांचं मार्गदर्शन
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )