Covid-19 : कोरोनापासून बचाव करायचाय? मग 'या' आरोग्यदायी सवयींचा अवलंब करा
Health Tips : कोरोनाकाळात रोग प्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे.
Covid-19 : कोरोनाकाळात रोग प्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे. काही गोष्टींनी रोगप्रतिकारशक्ती वाढवता येते. रोग प्रतिकारशक्ती चांगली असेल तर कोरोनातून लवकर बरे होता येते. कोरोनाची लक्षणे जितक्या वेगाने बदलत आहेत तितक्याच वेगाने कोरोनाचे नवीन प्रकार समोर येत आहेत. कोरोनापासून बचाव करायचा असेल तर काही उपाय लक्षात ठेवले पाहिजे.
हळदीचे दूध प्या :
हळदीचे दूध आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर आहे. हळदीमध्ये अनेक गुणधर्म असतात. हळदीचे दूध प्यायल्याने चांगली झोप लागते तसेच रोगप्रतिकारशक्तीदेखील वाढते. हळदीचे दूध नियमित प्यायल्याने थकवा कमी होतो.
नियमित प्राणायाम करा :
सर्दी, खोकला, कोरोनासारख्या आजारांचा श्वसनसंस्थेवर वाईट परिणाम होतो. फुफ्फुसांची काळजी घेण्यासाठी आणि त्यांची क्षमता वाढवण्यासाठी योगा करा. कोरोनाकाळात दररोज व्यायाम करायला हवा.
च्यवनप्राश गरम पाण्यासोबत खा :
गरम पाण्यासोबत च्यवनप्राशचे सेवन केले पाहिजे. च्यवनप्राशमध्ये अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती वापरल्या जातात. त्यामुळे कोरोनापासून बचाव करण्यास च्यवनप्राश फायदेशीर ठरतो. रात्री झोपण्यापूर्वी हळदीच्या दुधासोबतही च्यवनप्राशचे सेवन करता येते.
गवती चहा :
गवती चहामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. त्याचा शरीराला फायदा होतो. गवती चहाचे दररोज सेवन केले तर रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासदेखील मदत होते. त्यामुळे दिवसातून एकदा गवती चहा पिणे आवश्यक आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
संबंधित बातम्या
Omicron variant : 'या' लक्षणापासून सावध राहा, होऊ शकतो गंभीर परिणाम
Covid-19: कोरोनापासून बचाव करण्यासठी जीवनशैलीत 'असा' बदल करा, संसर्ग होणार नाही
Tulsi Benefits for hair : केसांची हरवलेली चमक परत आणण्यास मदत करतील तुळशीचे पानं, पांढऱ्या केसांच्या समस्येवर गुणकारी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )