एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Brain Stroke : ब्रेन स्ट्रोक म्हणजे काय? वेळीच ओळखा 'ही' लक्षणं

Brain Stroke : अनेक वेळा मानसिक ताण, उच्च रक्तदाब आणि इतर कारणांमुळे मेंदूला हादरे बसतात. मेंदूला रक्तपुरवठा खंडित होतो. याला सामान्यतः ब्रेन स्ट्रोक असे म्हणतात.

Brain Problem : मानवी शरीरात हृदय (Heart) आणि मन या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या भूमिका बजावतात. एखादी व्यक्ती जिवंत आहे की मृत हे हृदय आणि मन ठरवते. हृदयाची धडधड थांबली तर व्यक्तीचा मृत्यू होतो. मेंदू मृत झाला तरी माणूस मृत समजला जातो. निरोगी शरीरासाठी निरोगी मेंदू असणे खूप महत्वाचे आहे. पण कधी कधी मानसिक ताण, उच्च रक्तदाब आणि इतर कारणांमुळे मेंदूला धक्का बसतो. मेंदूला रक्तपुरवठा खंडित होतो. यालाच ब्रेन स्ट्रोक (Brain Stroke) असे म्हणतात. 

ब्रेन स्ट्रोक म्हणजे नक्की काय?

शरीराला योग्य रक्तपुऱवठा झाल्यास संपूर्ण शरीर सुरळीत चालते. हृदयाचे काम शरीराच्या इतर भागांत रक्त पोहोचवणे आहे. मात्र, मेंदूपर्यंत रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्यांमधील अडथळ्यांमुळे अनेक वेळा रक्त पोहोचत नाही. कधीकधी रक्तवाहिन्या फुटल्यामुळे मेंदूमध्ये रक्त गळते. हे रक्त मेंदूपर्यंत जेव्हा पोहोचू शकत नाही किंवा पोहोचत नाही अशा वेळी मेंदू काम करणे थांबवतो. ही ब्रेन स्ट्रोकची एकमेव स्थिती आहे.

या लक्षणांकडे लक्ष द्या

दृष्टीदोष

मेंदू शरीराच्या प्रत्येक अवयवावर नियंत्रण ठेवतो. त्याचा परिणाम होताच संपूर्ण शरीराला त्रास होतो. ब्रेन स्ट्रोकमुळे डोळ्यांच्या दृष्टीवर परिणाम होतो. मग, कधी कधी थोड्या वेळेसाठी दृष्टी जाते. कधी अंधुक दिसू लागलं. हे मेंदूकडून माहिती घेऊन जाणाऱ्या मज्जातंतूच्या नुकसानीमुळे होते.

चेहऱ्याचा एक भाग खाली लटकतो

ब्रेन स्ट्रोकचा थेट परिणाम तुमच्या चेहऱ्यावर दिसून येतो. यामुळे चेहरा वाकडा होतो. याचा परिणाम चेहऱ्यावरील हावभावावरही होतो. स्ट्रोकमुळे तोंड किंवा डोळे अनेकदा प्रभावित होतात.

शरीरात ऊर्जा राहात नाही

शरीरात ऊर्जा अजिबात नसते. कधी कधी तर संपूर्ण शरीर सुन्न झाल्यासारखे वाटते. व्यक्ती स्वत:ची मदतही करू शकत नाही. तुम्हाला तुमच्या शरीराचा कोणताही भाग जाणवू शकत नाही. हार्ट स्ट्रोकच्या सर्वात सामान्य लक्षणांपैकी हे एक आहे. मेंदूच्या एका भागात रक्तस्त्राव झाल्यामुळे दुसरा भाग सुन्न होतो.

छातीत दुखणे

कधीकधी रुग्णाच्या छातीत तीव्र वेदना होतात. गॅस किंवा अपचनाचा त्रास म्हणून लोक ते टाळतात. पण याकडे लक्ष देण्याची गरज आहे. ताबडतोब डॉक्टरांकडे जा आणि तपासणी करा.

बोलण्यास अडथळा निर्माण होणे

मेंदूच्या कार्यावर परिणाम झाल्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर दिसून येतो. स्ट्रोक दरम्यान जिभेचा प्रभाव देखील दिसून येतो. कारण जीभ मेंदूद्वारे नियंत्रित केली जाते. या व्यक्तीला बोलण्यास अडथळा निर्माण होतो. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या : 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra CM : नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? शिंदे गटाच्या नेत्याने सांगितला मुहूर्त, म्हणाले...
नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? शिंदे गटाच्या नेत्याने सांगितला मुहूर्त, म्हणाले...
Waqf Board Grant : Waqf Board Grant : वक्फ बोर्डाला तातडीने 10 कोटींचा निधी मंजूर, अल्पसंख्याक विभागाचा मोठा निर्णय
Waqf Board Grant : वक्फ बोर्डाला तातडीने 10 कोटींचा निधी मंजूर, अल्पसंख्याक विभागाचा मोठा निर्णय
Vijay Wadettiwar : मित्र अन् राजकीय शत्रू या दोन्ही बाजूने आवडणारा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस! विजय वडेट्टीवारांकडून तोंडभरून कौतुक
मित्र अन् राजकीय शत्रू या दोन्ही बाजूने आवडणारा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस! विजय वडेट्टीवारांकडून तोंडभरून कौतुक
Sushant Singh Rajput : 'या' 9 चित्रपटांमध्ये फर्स्ट चाॅईस फक्त सुशात सिंह राजपूत होता, पण नंतर नकार हाती आला! ज्यांना संधी मिळाली त्यांचं नशीब फळफळलं!
'या' 9 चित्रपटांमध्ये फर्स्ट चाॅईस फक्त सुशात सिंह राजपूत होता, पण नंतर नकार हाती आला! ज्यांना संधी मिळाली त्यांचं नशीब फळफळलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी १० च्या हेडलाईन्स- Top Headlines at 10AM  एबीपी माझा लाईव्ह Top 100 At 10AM 29 November 2024Vijay Wadettiwar On Fadanvis : फडणवीस बदला घेणारं राजकारण ही प्रतिमा पुसतील अशी अपेक्षा-वडेट्टीवारMVA on Result :ठाकरेंच्या सेनेचे काँग्रेसवर प्रहार;MVA तुटणार? ठाकरेंचा वेगळा निर्णय? Special ReportMVA on EC : जनतेच्या मतांवर निवडणूक आयोगाचा  दरोडा? विरोधकांचे नेमके आरोप काय? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra CM : नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? शिंदे गटाच्या नेत्याने सांगितला मुहूर्त, म्हणाले...
नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? शिंदे गटाच्या नेत्याने सांगितला मुहूर्त, म्हणाले...
Waqf Board Grant : Waqf Board Grant : वक्फ बोर्डाला तातडीने 10 कोटींचा निधी मंजूर, अल्पसंख्याक विभागाचा मोठा निर्णय
Waqf Board Grant : वक्फ बोर्डाला तातडीने 10 कोटींचा निधी मंजूर, अल्पसंख्याक विभागाचा मोठा निर्णय
Vijay Wadettiwar : मित्र अन् राजकीय शत्रू या दोन्ही बाजूने आवडणारा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस! विजय वडेट्टीवारांकडून तोंडभरून कौतुक
मित्र अन् राजकीय शत्रू या दोन्ही बाजूने आवडणारा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस! विजय वडेट्टीवारांकडून तोंडभरून कौतुक
Sushant Singh Rajput : 'या' 9 चित्रपटांमध्ये फर्स्ट चाॅईस फक्त सुशात सिंह राजपूत होता, पण नंतर नकार हाती आला! ज्यांना संधी मिळाली त्यांचं नशीब फळफळलं!
'या' 9 चित्रपटांमध्ये फर्स्ट चाॅईस फक्त सुशात सिंह राजपूत होता, पण नंतर नकार हाती आला! ज्यांना संधी मिळाली त्यांचं नशीब फळफळलं!
Sanjay Raut : एकनाथ शिंदेंकडे आता पर्याय उरलेला नाही; मावळत्या सूर्यापेक्षा उगवत्या सूर्याचं तेज अधिक असतं: संजय राऊत
एकनाथ शिंदेंकडे आता पर्याय उरलेला नाही; मावळत्या सूर्यापेक्षा उगवत्या सूर्याचं तेज अधिक असतं: संजय राऊत
Bollywood Celebrities Hair Transplants : बीग बी ते अक्षय कुमारपर्यंत! हेअर ट्रान्सप्लांट करताच या 5 बॉलिवूड सेलिब्रिटींचं आयुष्य बदलून गेलं
बीग बी ते अक्षय कुमारपर्यंत! हेअर ट्रान्सप्लांट करताच या 5 बॉलिवूड सेलिब्रिटींचं आयुष्य बदलून गेलं
Mahayuti: आधी लाडक्या बहिणींना पैशांची ओवाळणी दिली, आता सत्तेत वाटा देणार, नव्या सरकारमध्ये 4 महिला आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार?
आधी लाडक्या बहिणींना पैशांची ओवाळणी दिली, आता सत्तेत वाटा देणार, नव्या सरकारमध्ये 4 महिला आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार?
IPO Update :  आयपीओंची मालिका सुरुच, गणेश इन्फ्रा वर्ल्डचा IPO खुला होणार, GMP वर बोलबाला
आयपीओंची मालिका सुरुच, गणेश इन्फ्रा वर्ल्डचा IPO खुला होणार, GMP वर बोलबाला
Embed widget