Mom Tips : बाळाला स्तनपान करताना 'ही' चूक करताय? योग्य काळजी घेऊन बाळाचं आरोग्य सुधारा
Baby Care Tips : मातांकडून स्तनपान करताना नकळतपणे काही सामान्य चुका होतात. या चुका कोणत्या आणि त्या कशाप्रकारे सुधारता येतील हे सविस्तर वाचा.
Breastfeeding Tips : काही मातांसाठी बाळाला स्तनपान (Breastfeeding) करणे सोपे असते, तर काही मातांसाठी ही खूपच अवघड असते. प्रत्येक बाळाची दूध पिण्याची पद्धत वेगळी असते. दरम्यान, मातांकडून स्तनपान करताना नकळतपणे काही सामान्य चुका होतात. विशेषत: महिल्यांदा आई होण्याऱ्या मातांकडून या चुका सामान्यपणे होतात. याची योग्यरित्या काळजी घेतल्यास तुम्हाला बाळाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. या चुका कोणत्या आणि त्या कशाप्रकारे सुधारता येतील हे सविस्तर वाचा.
स्तनपानाशी संबंधित काही सामान्य चुका आणि त्यावर काय उपाय करता येतील हे जाणून घ्या.
कोणाचीही मदत न घेणे
बाळाला स्तनपान करणे नैसर्गिक आणि सोपे आहे असे म्हटले जाते. पण काही स्त्रियांसाठी हे खूप अवघड असते. काही मातांसाठी बाळाला स्तनपान करणे तणावपूर्ण आणि कठीण असू शकते. पहिल्यांदा माता झाल्यावर मातांकडून चुका होणे फार सामान्य गोष्ट आहे, पण अशावेळी तुम्ही अनुभवी मातांकडून मदत घेऊ शकता. यामुळे तुम्हाला स्तनपान करताना होणाऱ्या चुका टाळता येतील. कोणाचीही मदत न घेतल्याने परिस्थिती आणखी बिघडू शकते. तुम्ही तुमच्या कुटुंबियांचा किंवा मित्रपरिवाराचा सल्ला घेऊ शकता. त्यांचा अनुभव तुम्हाला उपयोगी पडेल.
स्तनपान करताना वेदना होणे सामान्य?
स्तनपान करताना स्तनात वेदना होणे हे अगदी सामान्य बाब आहे, असे मानणे चुकीचे आहे. स्तनपान करताना अगदी सुरुवातीला वेदना होणे आणि अस्वस्थ वाटणे सामान्य आहे. पण जास्त काळ वेदना होणे सामान्य नाही. जास्त वेळ स्तनात वेदना होत असतील तर, डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. चुकीच्या प्रकार स्तनपान करणे, ब्रेस्ट एंगॉर्जमेंट (स्तन ताठरणे आणि वेदना होणे) अशी कारणे असू शकतात. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
स्वतःकडे लक्ष द्या
स्तनपान करताना मातांनी स्वतःकडे लक्ष देणे खूप महत्वाचे आहे. स्तनामध्ये सतत दूध निर्माण होत राहण्यासाठी तुमच्या शरीरात हाडे, रक्त आणि स्नायूंना योग्य पोषक तत्वे आणि आहार मिळणे गरजेचे आहे. मातांना योग्य पोषण मिळाले तरच स्तनात दूध निर्माण होईल, त्यामुळे मातांनी योग्य आहार घेणे आवश्यक आहे. तसेच मातांनी नियमितपणे आठ तासांची झोप घेणेही गरजेचे आहे. पोषण आणि झोपेच्या अभावामुळे थकवा येऊ शकतो. यामुळे मातांनी शारीरिक आणि मानसिकरित्या स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे.
खूप लवकर बाटलीतील दुधाची सवय लावणे
अनेकदा माता बाळाला खूप लवकर दुधाच्या बाटलीतून दूध पाजण्यास सुरुवात करतात, हे योग्य नाही. बहुतेक वेळेस ऑफिसला जाणाऱ्या माता बाळाला लवकर बाटलीने दूध पिण्याची सवय लावतात. जोपर्यंत बाळाला स्तनपानातून दूध पिण्यास शिकत नाही तोपर्यंत त्याला दुधाची बाटली देऊ नये. सहा ते आठ महिन्यांपूर्वी बाळाला दुधाची बाटली देऊ नये.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :
Gaming Addiction : मुलांना नाराज न करता गेमिंगचं 'खुळ' सोडवा, 'या' टीप्स वापरून पाहा
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )