Skin Care : पिंपल्स आणि स्किन प्रॉब्लेम्सला करा दूर, तुरटीचे 'हे' फायदे माहित आहेत का?
Alum For Skin Care : तुरटीचा वापर पुरुष दाढी करताना करतात, पण या तुरटीचे त्वचेसाठी अनेक फायदे आहेत, ते जाणून घ्या.
Use of Fitkari : तुम्ही तुमच्या वडीलांना किंवा आजोबांना दाढी करताना तुरटीचा (Alum) वापर करताना पाहिलं असेल. न्हावीही दाढी केल्यानंतर तरुणाच्या तोंडावर तुरटी (Turati) फिरवतात. पण या व्यतिरिक्तही तुरटीचे अनेक फायदे आहेत, हे अनेकांना माहित नसेल. तुरटी त्वचेसंदर्भातील अनेक आजारांवर गुणकारी (Alum Benefits) आहे. तुरटीचा वापर करुन तुम्ही त्वचेवरील मुरुमांपासून सुटका मिळवू शकता. तुरटीचा वापर केल्यास तुमच्या त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होईल आणि तुमची त्वचा निखळ आणि तजेलदार होईल, हे कसे ते जाणून घ्या.
तुरटी त्वचेसाठी फायदेशीर
तुरटीचा वापर करून तुम्ही तुमचं सौंदर्य वाढवू शकता. यामुळे तुमच्या त्वचा सुंदर आणि मुलायम होईल. यासाठी तुरटी घेऊन त्याची पावडर बनवा. ही पावडर पाण्यात मिसळून घ्या. या पाण्याचा वापर चेहरा धुण्यासाठी करा. तुम्ही अंघोळीच्या पाण्यातही तुरटी मिसळून तुम्ही या पाण्याता वापर करु शकता. या पाण्याचा वापर केल्याने तुमच्या त्वचेवरील मुरुमांची समस्या दूर होईल. तुरटीमध्ये अँटी फंगल गुणधर्म आहेत. यामुळे पिंपल्स कमी होण्यासाठी मदत होईल. यामुळे तुमची त्वचा सुंदर होईल.
त्वचा होईल सुंदर
त्वचेचा पोत सुधारण्यासाठीही तुम्ही तुरटीचा वापर करु शकता. एक चमचा मुलतानी माती, अर्धा चमचा तुरटीची पावडर यात गुलाब पाणी किंवा दूध मिसळून पॅक तयार करुन घ्या. हा फेसपॅक चेहऱ्यावर लावून 15 मिनिटे ठेवा. यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. चेहरा स्वच्छ कपड्याने पुसून कोरडा करा आणि यावर टोनर आणि मॉइश्चरायजर लावा. यामुळे तुमची त्वचा अधिक मुलायम आणि तजेलदार होईल
त्वचेवरील डाग होतील दूर
तुरटीचा वापर करुन तुम्ही त्वचेवरील डाग दूर करू शकता. यासाठी एका वाटीत तुरटीची पावडर घ्या. यामध्ये ऑलिव्ह ऑईल मिसळून एक पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर डाग असलेल्या ठिकाणी लावून मसाज करा. आठवड्यातील दोन वेळा असेल केल्याने तुम्हांला याचा फायदा दिसून येईल. त्वचेवरील टॅनिंगच्या समस्येवरही हा उपाय अतिशय फायदेशीर आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Copper Water : तांब्याच्या भांड्यात पाणी किती वेळ ठेवणं फायदेशीर? तुम्ही करु नका 'ही' चूक
- Heart Attack : काळजी घ्या! कोरोनानंतर वाढतोय हृदयविकाराचा धोका, डॉक्टरांनी सांगितलं 'हे' कारण
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )