आरोपी सुटला तर धनंजय मुंडेच्या टोळीचं जगणं मुश्किल करीन, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, म्हणाले ..
Manoj Jarange: धनंजय मुंडे यांनी गुंडांची एक मोठी टोळी तयार केली होती .त्यांच्या जातीला बोलत नाही .त्या गुंडांना उचलणं गरजेचं होतं .ते फडणवीसांनी केलं नाही . असं जरांगे म्हणाले.
Manoj Jarange: 'एक महिना झाला तरी यंत्रणेला मोबाईल सापडत नाही .किती मूर्खपणाचे लक्षण आहे .याचा अर्थ असा की मुख्यमंत्र्यांचा पाऊल चुकायला लागलंय .तुम्ही आरोपी वाचवायला लागला आहात अशी शंका येत आहे . जो खंडणीतला आरोपीच तुमचं सरकार चालवतोय असं समजायचं का .हे कुठलं राजकारण चालवताय तुम्ही की 302 मध्ये या आरोपीला तुम्हाला घेता येत नाही .आता आमचाही संयम सुटायला लागलाय .देशमुख कुटुंबाच्या जीविताला आता काहीही झालं ,आरोपी सुटला तर धनंजय मुंडेच्या टोळीचं जगणं मुश्किल करीन', असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला .(Manoj Jarange on Santosh Deshmukh Murder Case)
संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर महिना उलटून गेला तरी आरोपी फरार आहेत . प्रशासन कोणत्याही प्रक्रियेची माहिती देत नाहीत . दोषीवर कारवाई होत नाही . या मागण्यांसाठी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मस्साजोग येथे उंच टाकीवर चढवून आंदोलन केले . यावेळी ग्रामस्थ आक्रमक होते .तणाव होता . प्रशासनाच्या मनधरणीनंतर धनंजय देशमुख टाकीवरून खाली उतरले . त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्यात अशी मागणी करत प्रशासनासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टिकेची झोड उठवली आहे .
काय म्हणाले जरांगे ?
'ज्यांनी खंडणी मागितली तो एक आरोपी . त्यानंतर त्यांनी खून करायला पाठवलेले लोक . या सगळ्यांना घेऊन कोण पळालं ? या सगळ्यांना 302 मध्ये अडकवणं फडणवीसांकडून अपेक्षित होते . आरोपीच्या घरांवर पांघरूण घालताय तुम्ही . खंडणीतल्या आणि कुणाच्या आरोपींना कपडेही घेतले होते का ? नीचपणाचा कळस किती असावा,राज्य कसं चालवावं ? किमान या हत्येचा रोष तरी तुम्हाला असायला हवा होता . खंडणीतला आरोपीला खुनातल्या आरोपीला पुण्यात कोणी सांभाळलं ? असा सवाल ही जरांगेंनी सरकारला केला . धनंजय मुंडे यांनी गुंडांची एक मोठी टोळी तयार केली होती .त्यांच्या जातीला बोलत नाही .त्या गुंडांना उचलणं गरजेचं होतं .ते फडणवीसांनी केलं नाही .जर देशमुख कुटुंब तुम्हाला पाहून हताश होणार असलं तर तुम्ही अयशस्वी झालात . तुम्हाला पाहून या कुटुंबीयांना धीर यायला हवा होता तो आला नाही .त्यांच्या लेकीनं, धनंजयनं छाती ठोकून आम्हाला न्याय मिळेल असं सांगायला हवं होतं .हे काम सरकार म्हणून मुख्यमंत्र्यांनी करणे अपेक्षित असतं . आरोपीलाच तुम्ही सांभाळायला लागलात . तुमच्या गावातल्या एका आदर्श सरपंचाचा खून झाला .पण लाजा नसल्यासारखं तुम्ही डबल गेम खेळता अशी शंका येते .सरकारमध्ये सांगायचं कुटुंबाशी गोड बोलतो दुसरीकडे आरोपी सोडून द्यायचे .जर आता आरोपी सुटला तर धनंजय मुंडे यांच्या टोळीचा जगणं मुश्किल करेन, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला .
हेही वाचा:
Dhananjay Deshmukh Beed PC : ॲट्रॉसिटीचा गुन्हा का दाखल केला नाही..? धनंजय देशमुख यांचे खरमरीत सवाल