एक्स्प्लोर

Nashik Accident: मित्राने हात दाखवला, अपघाताच्या 10 मिनिटं आधी टेम्पोतून उतरलेला विक्रांत वाचला, नाशिकच्या अपघाताची अचंबित करणारी कहाणी

Nashik dwarka flyover accident: नाशिकमध्ये टेम्पो आणि ट्रकचा भीषण अपघात, लोखंडी सळ्या शरीरात शिरल्याने 5 जणांचा मृत्यू, 13 जण गंभीर जखमी. द्वारका पुलावर नेमकं काय घडलं?

नाशिक: नाशिकच्या द्वारका उड्डाणपुलावर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. तर 13 जण गंभीररित्या जखमी झाले. याठिकाणी एक टेम्पो लोखंडी सळ्यांनी भरलेल्या ट्रकवर जाऊन आदळला. त्यावेळी मागून येणाऱ्या वाहनाने टेम्पोला धडक दिली. त्यामुळे हा टेम्पो दोन्ही वाहनांमध्ये चिरडला गेला. यावेळी ट्रकमधील पोलादी सळ्या टेम्पोच्या काचा फोडून आतमध्ये शिरल्या. या लोखंडी सळ्या टेम्पोच्या मागच्या भागात बसलेल्या तरुण मुलांच्या शरीरात शिरल्या. यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या टेम्पोत असणाऱ्या अनेकांचा मृत्यू झाला तर बहुतांश जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. या टेम्पोत असणारा केवळ एकजण सुदैवाने या अपघातामधून बचावला. 

या दुर्घटनेत मृत्यू झालेली मुलं ही सिडकोच्या सह्याद्रीनगर आणि अंबड परिसरातील रहिवाशी होती. बहुतांश जण कामगार कुटुंबातील होते. हे सर्वजण  निफाड तालुक्यातील धारणगाव येथे देवाचे कारण या कार्यक्रमासाठी गेले होते. हा कार्यक्रम आटोपून महिलांचा टेम्पो आणि पुरुषांचा टेम्पो पुन्हा नाशिकच्या दिशेने परत येत होता. टेम्पो नाशिकच्या सय्यद पिंपरी परिसरातील आल्यानंतर या टेम्पोतील विक्रांत ठाकूर हा तरुण खाली उतरला आणि त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत या टेम्पोचा भीषण अपघात झाला.

विक्रांत ठाकूर याने अपघातानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला तेव्हा रविवारी रात्री नक्की काय घडले होते, हे सांगितले. आम्ही सकाळी 10 वाजता गेलो धारणगावला गेलो होते, तिथून आम्ही परत येत होतो. आम्ही संध्याकाळी साडेपाच वाजता धारणगाववरुन निघालो होतो. परत येत असताना सय्यद पिंपरी येथे मला माझा मित्र दिसला. मी त्याला गाडीतून हात दाखवला. त्याने मला सोबत येण्यास सांगितले. तेव्हा मी टेम्पोतील सगळ्यांचा निरोप घेऊन खाली उतरलो. त्यानंतर टेम्पो पुढे गेला आणि द्वारका उड्डाणपुलावर अपघात झाला. उड्डाणपुलावर एक ट्रक बिनालाईटचा उभा होता. आमच्या टेम्पोत 15 ते 16 जण होते.  मी अपघाताच्या 10 मिनिटं आधीच टेम्पोतून खाली उतरलो होतो. मी सगळ्यांना सांगितलं की, मी मित्रांसोबत जातो, असे विक्रांतने सांगितले. केवळ दैव बलवत्तर असल्यामुळे विक्रांतचा जीव थोडक्यात बचावला.

लोखंडी सळ्या शरीरातून आरपार

द्वारका उड्डाणपुलावर टेम्पोने मागून लोखंडी सळ्यांनी भरलेल्या ट्रकला धडक दिली. यावेळी टेम्पोच्या मागे असलेल्या वाहन टेम्पोवर येऊन आदळले. दोन्ही गाड्यांमध्ये सापडल्याने ट्रकमधील लोखंडी सळ्या टेम्पोत बसलेल्या लोकांच्या शरीरात शिरल्या. या टेम्पोत काही तरुण मुलं होती. त्यांनी टेम्पोत मजामस्ती करतानाचे स्टेटस सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर काहीवेळातच हा अपघात झाला. पोलादी सळ्या शरीरातून आरपार गेल्याने अनेकजण गंभीरपणे जखमी झाले. शरीरातून बराच रक्तस्राव झाल्याने चार मुलांचा जागीच मृत्यू झाला.

आणखी वाचा

सोशल मीडियावर स्टेटस टाकलं अन् पुढच्या काही क्षणांत भीषण अपघात, लोखंडी सळ्या अंगात शिरल्याने पोरसवदा तरुणांनी जागेवरच प्राण सोडला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indurani Jakhar  : इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kunal Kamra Special Report : कामराची कॉमडी, प्रेक्षकांना समन्स; पोलीस नोंदवणार प्रेक्षकांचे जबाबSuresh Dhas Full PC : कृषी केंद्राची कंत्राट अप्रत्यक्षपणे कृषी अधिकाऱ्यांकडेच : सुरेश धसSpecial Report Sanjay Raut : मोदींची सप्टेंबरमध्ये निवृत्ती,राऊतांची भविष्यवाणी;भाजप जाळ्यात अडकणार?Anjali Damania On Rajendra Ghanwat : राजेंद्र घनवट यांनी बीडच्या शेतकऱ्यांना छळून त्रास दिला:दमानिया

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indurani Jakhar  : इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
Embed widget