Health Tips : लॅपटॉपवर जास्त वेळ काम केल्यास होऊ शकतो ट्रिगर फिंगरचा त्रास; जाणून घ्या लक्षणं आणि उपचार
Trigger Finger : ट्रिगर फिंगर हा एक विकार आहे ज्यामध्ये तुमची बोटे वाकलेल्या स्थितीत अडकतात.

Trigger Finger : मोबाईल (Mobile), कॉम्प्युटर, टॅबलेट यांसारखे गॅझेट्स जवळजवळ आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भागच झाले आहेत. दिवसभर आपली बोटे फोनच्या स्क्रीनवर किंवा कीबोर्डवर सतत असतात. त्यामुळे बोटे बराच वेळ तशीच वाकलेली राहतात. या कारणामुळे, तुम्हाला तुमच्या बोटांमध्ये समस्या जाणवू शकते, यालाच ट्रिगर फिंगर म्हणतात. या विकारामुळे बोटे वाकणे आणि सरळ होण्यास त्रास होतो. ट्रिगर फिंगर म्हणजे नेमकं काय? यावर लक्षणं आणि उपचार काय आहेत या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
ट्रिगर फिंगर म्हणजे काय?
ट्रिगर फिंगर हा एक विकार आहे ज्यामध्ये तुमची बोटे वाकलेल्या स्थितीत अडकतात. त्यामुळे बोटे हलवण्यात किंवा सरळ करण्यात अडचण येते. त्याच स्थितीत राहिल्यामुळे, बोटे सरळ करताना आवाज देखील ऐकू येतो. या स्थितीत, बोटांच्या कडा सुजतात, ज्यामुळे त्यांना सरळ करणे खूप वेदनादायक होते. हा विकार एक किंवा अधिक बोटांना होऊ शकतो. ही समस्या पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त आढळते.
बोटं ट्रिगर कशामुळे होते?
वारंवार हालचालींमुळे, बोटांच्या कडा सुजतात. बोटं सतत एकाच स्थितीत ठेवल्याने ही स्थिती उद्भवते. कधीकधी, ही समस्या अधिक वेदनादायक होते.
लक्षणे कोणती?
- बोट वाकताना किंवा सरळ करताना क्रॅकचा आवाज येणे.
- बोटांना सूज येणे.
- कोणतीही वस्तू हातात पकडण्यास अडचण निर्माण होणे.
- बोटे सरळ न होणे.
रिस्क फॅक्टर्स नेमके कोणते?
- शेती, बागकाम किंवा संगणकावर दीर्घकाळ काम करणे
- पियानो सारखे वाद्य वाजवणे
- मधुमेह
- थायरॉईड
- संधिरोग
- संधिवात
यावर उपाय काय?
स्ट्रेचिंग एक्सरसाईज करा : यामुळे तुमच्या बोटांमधील कडकपणा कमी होईल आणि हालचालीमुळे तुमच्या हाताचे आणि बोटांचे स्नायू मजबूत होतील. काम करताना बोटे जास्त वेळ एकाच स्थितीत ठेवू नका. त्यांना मध्येच स्ट्रेच करत रहा.
बोटांना विश्रांती घ्या : टाईप करत असताना ज्या बोटांवर ईजा झालीय त्या बोटाच जास्त वापर करू नका. तसेच, थोड्या वेळाने हातांना विश्रांती द्या.
अॅडॉप्टिव्ह टूल्सचा वापर : सॉफट प्रोटेक्टिव्ह कव्हरिंगचा वापर करा. ज्यामुळे बोटांवर कमी ताण येऊन सूज देखील कमी होऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
