एक्स्प्लोर

Health Tips : मासिक पाळीदरम्यान आपलं आरोग्य जपा; स्वच्छता राखण्यासाठी 'या' महत्त्वाच्या टिप्स फॉलो करा

Health Tips : योग्य सुविधांचा अभाव, लाज वाटणे, भीती वाटणे किंवा मासिक पाळीशी संबंधित गैरसमजुतींमुळे अनेक मुली मासिक पाळीदरम्यान शाळा चुकवतात.

Health Tips : दरवर्षी 12 फेब्रुवारी रोजी 'लैंगिक आणि पुनरुत्पादक आरोग्य जागरूकता दिवस' म्हणून पाळला जातो. मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. या दरम्यान महिलांनी (Women) काही निष्काळजीपणा केल्यास आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. महिलांमध्ये आरोग्य चांगले राखण्यासाठी आणि संसर्ग रोखण्यासाठी मासिक पाळीदरम्यान योग्य स्वच्छता राखणे आवश्यक आहे. अस्वच्छ कापड वापरणे किंवा दर 4 ते 6 तासांनी सॅनिटरी पॅड न बदलणे हे संसर्गास आमंत्रण देते. 

यासाठीच डोंबिवलीच्या स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ, एम्स हॉस्पिटल येथील डॉ. दीपाली लोध यांनी काही महत्त्वाची माहिती दिली आहे. त्या म्हणतात, मासिक पाळी दरम्यान योग्य स्वच्छता सवयींचे पालन न केल्यास प्रजनन मार्गाचे संक्रमण, बॅक्टीरियल वेजिनोसिस (Bacterial Vaginosis), ट्रायकोमोनियासिस, कॅन्डिडिआसिस, सिफिलीस, मूत्रमार्गाचे संक्रमण (यूटीआय) आणि त्वचेची जळजळ होऊ शकते. हे संक्रमण महिलेच्या आरोग्याबरोबरच त्यांच्या आत्मविश्वासावरही परिणाम करतात. म्हणूनच स्वच्छतेच्या सवयींचे पालन करणे आणि दीर्घकालीन आरोग्य गुंतागुंत टाळण्यासाठी स्वच्छ पाणी, योग्य उत्पादने आणि मासिक पाळी दरम्यान वापरण्यात येणाऱ्या उत्पादनांची विल्हेवाट लावण्याच्या योग्य पद्धतींचा अवलंब करणे गरजेचे आहे.

योग्य सुविधांचा अभाव, लाज वाटणे, भीती वाटणे किंवा मासिक पाळीशी संबंधित गैरसमजुतींमुळे अनेक मुली मासिक पाळीदरम्यान शाळा चुकवतात. या गैरहजेरीमुळे मुलींच्या शैक्षणिक प्रगतीत अडथळा येतो आणि करिअरच्या संधींवरही मर्यादा येतात. मासिक पाळीच्या स्वच्छतेबद्दल मुलींना शिक्षित करणे ही काळाची गरज आहे.

मासिक पाळीच्या स्वच्छतेतील आव्हाने 

आर्थिक अडचणी लाखो महिलांना स्वच्छता उत्पादने खरेदी करण्यापासून रोखतात आणि त्यांना कापड, चिंध्या, कागद किंवा अगदी गवतासारख्या असुरक्षित पर्यायांचा वापर करण्यास प्रवृत्त करते. हे पर्याय त्यांच्या आरोग्यावर परिणाम करतात. ग्रामीण आणि वंचित भागांमध्ये, स्वच्छता व सुविधा तसेच जागरूकतेचा अभाव महिलांना त्यांच्या मासिक पाळीचे योग्य व्यवस्थापन करण्यास बाधा निर्माण करते आणि त्यांना संसर्गाचा धोका वाढतो. त्याचप्रमाणे, मासिक पाळीशी संबंधित निषिद्ध गोष्टी महिलांना खुलेपणाने चर्चा करण्यापासून रोखतात, ज्यामुळे लाजिरवाणे वाटणे आणि चुकीची माहितीचा प्रसार होतो आणि महिलांमध्ये अनेकदा मासिक पाळीच्या स्वच्छतेचा अभाव जाणवतो. जागरूकता मोहिमांनी लोकांना सुरक्षित मासिक पाळीच्या पद्धतींबद्दल शिक्षित केले पाहिजे. शाळा आणि कामाच्या ठिकाणी स्वच्छता सुविधा आणि परवडणाऱ्या मासिक पाळीच्या उत्पादनांची उपलब्धता सुनिश्चित केली पाहिजे.

योग्य मासिक पाळीची स्वच्छता राखण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

मुली आणि महिलांनी संसर्ग टाळण्यासाठी दर 4 तासांनी सॅनिटरी पॅड किंवा टॅम्पोन बदलले पाहिजेत. मासिक पाळीच्या उत्पादनांना हाताळण्यापूर्वी आणि नंतर महिलांनी त्यांचे हात स्वच्छ धुवावेत. जळजळ आणि पुरळ टाळण्यासाठी स्वच्छ, श्वास घेण्यायोग्य सुती अतर्वस्त्रांची निवड करणे. जर तुम्ही पुन्हा वापरता येणारे कापडाचे पॅड किंवा मासिक पाळीचे कप वापरत असाल तर ते व्यवस्थित स्वच्छ धुवा, वाळवा आणि मगच वापरा. नियमितपणे आंघोळ करा आणि जननेंद्रियाचा भाग पाण्याने स्वच्छ करा, डाऊचिंग करणे टाळा किंवा तीव्र रसायनांचा समावेश असलेली उत्पादने वापरणे टाळा. योग्य हायड्रेशन आणि संतुलित आहाराचे सेवन करा आणि वापरलेल्या उत्पादनांची योग्य विल्हेवाट लावा. या महत्त्वाच्या टिप्सचे पालन केल्यास तुम्ही निश्चितच मासिक पाळीच्या काळात चांगली स्वच्छता बाळगु शकाल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:      

Saints Samadhi : साधू-संतांचं पार्थिव दहन करण्याऐवजी जल समाधी का देतात? जाणून घ्या धार्मिक आणि आध्यात्मिक कारण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
भारत सरकारचे अधिकारी कंटेंट ब्लॉक करत आहेत, हा आयटी कायद्याचा दुरुपयोग सुरुय! एलॉन मस्क यांच्या X ची केंद्र सरकारविरोधात याचिका
भारत सरकारचे अधिकारी कंटेंट ब्लॉक करत आहेत, हा आयटी कायद्याचा दुरुपयोग सुरुय! एलॉन मस्क यांच्या X ची केंद्र सरकारविरोधात याचिका
हिंजवडीतील टेम्पो जळीतकांड अपघात नसून घातपात; पोलिसांनी लावला छडा, ड्रायव्हरनेच टॅम्पो जाळला
हिंजवडीतील टेम्पो जळीतकांड अपघात नसून घातपात; पोलिसांनी लावला छडा, ड्रायव्हरनेच टॅम्पो जाळला
बीडमध्ये आणखी एका गुन्हेगारी टोळीवर मकोका, तीन महिलांचा समावेश; SP नवनीत कावत अ‍ॅक्शनमोडमध्ये
बीडमध्ये आणखी एका गुन्हेगारी टोळीवर मकोका, तीन महिलांचा समावेश; SP नवनीत कावत अ‍ॅक्शनमोडमध्ये
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Disha Salian Aditya Thackeray Majha Mudda EP 4 : वकिलाचे दावे ते ठाकरेंवर आरोप; काय आहे प्रकरण?Aaditya Thackeray Chandrashekhar Bawankule Meet : आदित्य ठाकरे-बावनकुळे यांची विधान भवनात भेटABP Majha Marathi News Headlines 6 PM TOP Headlines 6PM 20 March 2025Anmol Ratna Award 2025 Episode 3 : महाराष्ट्रातील उद्योग रत्नांचा सन्मान : अनमोल रत्न पुरस्कार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
भारत सरकारचे अधिकारी कंटेंट ब्लॉक करत आहेत, हा आयटी कायद्याचा दुरुपयोग सुरुय! एलॉन मस्क यांच्या X ची केंद्र सरकारविरोधात याचिका
भारत सरकारचे अधिकारी कंटेंट ब्लॉक करत आहेत, हा आयटी कायद्याचा दुरुपयोग सुरुय! एलॉन मस्क यांच्या X ची केंद्र सरकारविरोधात याचिका
हिंजवडीतील टेम्पो जळीतकांड अपघात नसून घातपात; पोलिसांनी लावला छडा, ड्रायव्हरनेच टॅम्पो जाळला
हिंजवडीतील टेम्पो जळीतकांड अपघात नसून घातपात; पोलिसांनी लावला छडा, ड्रायव्हरनेच टॅम्पो जाळला
बीडमध्ये आणखी एका गुन्हेगारी टोळीवर मकोका, तीन महिलांचा समावेश; SP नवनीत कावत अ‍ॅक्शनमोडमध्ये
बीडमध्ये आणखी एका गुन्हेगारी टोळीवर मकोका, तीन महिलांचा समावेश; SP नवनीत कावत अ‍ॅक्शनमोडमध्ये
नाशकमध्ये काय चाललंय काय? गेल्या तीन महिन्यात खूनाच्या 8-10 घटना; जाब विचारल्याने टोळक्याच्या मारहाणीचा व्हिडिओ समोर
नाशकात काय चाललंय काय? रंगपंचमीचं दुहेरी हत्याकांड ताजं असताना टोळक्याच्या मारहाणीचा Video समोर
तेव्हा मनिषा कायंदे म्हणाल्या, भाजपा आणि राणे गँगने संबंध जोडून थयथयाट केला, आदित्य ठाकरेंची नाक घासून माफी मागावी, आता सुषमा अंधारे तोच स्क्रीनशाॅट शेअर करत म्हणाल्या....
तेव्हा मनिषा कायंदे म्हणाल्या, भाजपा आणि राणे गँगने संबंध जोडून थयथयाट केला, आदित्य ठाकरेंची नाक घासून माफी मागावी, आता सुषमा अंधारे तोच स्क्रीनशाॅट शेअर करत म्हणाल्या....
औरंगजेब 1300 मतांनी पिछाडीवर, पराभवाच्या छायेत, संतोष जुवेकरच्या जीवात जीव आला, दिशाने आघाडी घेतली! राज्यातील राजकीय चिखलफेकीवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रियांचा पाऊस
औरंगजेब 1300 मतांनी पिछाडीवर, पराभवाच्या छायेत, संतोष जुवेकरच्या जीवात जीव आला, दिशाने आघाडी घेतली! राज्यातील राजकीय चिखलफेकीवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रियांचा पाऊस
एप्रिल महिन्यात राज्याची AI पॉलिसी, मंत्री शेलार यांची घोषणा; पालकमंत्रीपदाचाही मजेशीर किस्सा सांगितला
एप्रिल महिन्यात राज्याची AI पॉलिसी, मंत्री शेलार यांची घोषणा; पालकमंत्रीपदाचाही मजेशीर किस्सा सांगितला
Embed widget