Saints Samadhi : साधू-संतांचं पार्थिव दहन करण्याऐवजी जल समाधी का देतात? जाणून घ्या धार्मिक आणि आध्यात्मिक कारण
Saints Samadhi : सनातन धर्मात मृत्यूनंतर अंतिम संस्काराच्या वेगवेगळ्या प्रक्रिया असतात. त्यातलीच एक प्रक्रिया म्हणजे जल समाधीची प्रक्रिया.

Saints Samadhi : सनातन धर्मात साधू-संतांना विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. कारण साधू संत देवाची सेवा करतात. पूजाअर्चा करतात. त्यानुसार, नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, अयोध्येतील राम जन्मभूमि मंदिराचे प्रमुख पुजारी महंत सत्येंद्र दास यांचे वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले. नुकतीच त्यांना सरयू नदीत जलसमाधी देण्यात आली. तर, त्यांचं पार्थिव तुलसीदास घाटावर जलसमाधीसाठी प्रवाहित करण्यात आला. पण साधु-संतांच्या पार्थिवाला अग्नीऐवजी समाधी का दिली जाते? ही प्रक्रिया नेमकी कशी आणि त्याचं महत्त्व काय? याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व
साधू-संतांच्या पार्थिवाला समाधी देणं म्हणजे त्यांच्या तपश्चर्येला आणि ज्ञानाला सन्मानित करण्यासारखं आहे. सनातन धर्मात मृत्यूनंतर अंतिम संस्काराच्या वेगवेगळ्या प्रक्रिया असतात. त्यातलीच एक प्रक्रिया म्हणजे जल समाधीची प्रक्रिया. यामध्ये संतांच्या पार्थिव शरीराला मोठ्या दगडांनी बांधून नदीच्या प्रवाहात सोडले जाते.
समाधी का दिली जाते?
सनातन धर्मात असं म्हणतात की, व्यक्ती संसाराच्या बंधनातून मुक्त होऊन संन्यास घेतो. त्यामुळे त्यांचं स्थान इतर लोकांपेक्षा उच्च स्थानी असते.असं म्हणतात की, जल हा पवित्र तत्व आहे. त्यात विलीन झाल्याने लवकर मोक्ष प्राप्त होतो. संतांचे शरीर सामान्य व्यक्तींपेक्षा फार वेगळे मानले जाते. कारण ते तप आणि साधनेने पूर्ण असते. त्यामुळेच त्यांना दहन करण्याऐवजी जल समाधी दिली जाते. महंत सत्येंद्र दास यांनी 20 व्या वर्षी संन्यास घेतला होता. राम जन्मभूमी मंदिराचे ते मुख्य पुजारी म्हणून कार्यरत होते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:




















