Health Tips : रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी ऊसाचा रस फायदेशीर, शरीराला मिळतात 'हे' आश्चर्यकारक फायदे
Health Tips : तुम्हीही उन्हाळ्यात हायड्रेट राहण्याचे मार्ग शोधत असाल, तर तुमच्यासाठी ऊसाचा रस हा एक चांगला पर्याय आहे.
Health Tips : उन्हाळा जवळ येत चालला आहे. त्यानुसार कडक उन्हात भरपूर तहान लागते. अशा वेळी काहीतरी थंड प्यावेसे वाटते. यावर पर्याय म्हणून काही जण भरपूर ज्यूस पितात तर काहीजण आईस्क्रिम खाणं पसंत करतात. तर बरेच लोक फ्रीजमध्ये भरपूर कोल्ड्रिंक्स आणि ज्यूस ठेवतात. परंतु कोल्ड्रिंक्स तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. अशा वेळी जर तुम्हाला घसा पूर्णपणे थंड ठेवायचा असेल आणि शरीर हायड्रेट ठेवायचे असेल तर तुम्ही ऊसाचा रस देखील पिऊ शकता. ऊसाच्या रसामुळे शरीराला थंडावा मिळतो. ऊसाचा रस प्यायल्यानेही शरीराला अनेक फायदे होतात. कोणते ते जाणून घ्या.
ऊसाच्या रसाचे फायदे :
रोगप्रतिकारक शक्ती वाढवा - उसाच्या रसामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि फोटोप्रोटेक्टिव्ह घटक असतात. ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढू लागते. ऊसाचा रस प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. उन्हाळ्यात ऊसाचा रस प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो आणि व्हायरल इन्फेक्शनसारख्या आजारांचा धोका दूर राहतो.
ऊर्जा वाढवा - उन्हाळ्यात जेव्हाही तुम्ही बाहेर जाता तेव्हा सूर्यप्रकाशामुळे शरीरात पाणी किंवा ग्लुकोजची कमतरता असते. अशा परिस्थितीत तुम्हाला सुस्त आणि खूप थकवा जाणवतो. अशा वेळी ऊसाचा रस प्यायल्यास शरीराला कर्बोदके मिळतात ज्यामुळे एनर्जी लेव्हल वाढते. ऊसाचा रस प्यायल्याने भरपूर ऊर्जा मिळते.
डिहायड्रेशन दूर करा - उन्हाळ्यात शरीराला पाणी आणि इतर द्रवपदार्थांची जास्त गरज असते. उन्हाळ्यात शरीराला घाम येताच शरीर निर्जलीकरण होते. जेव्हा शरीरात पाणी शिल्लक राहत नाही, तेव्हा अन्न पचण्यास त्रास होतो. अशा परिस्थितीत ऊसाचा रस प्यायल्याने डिहायड्रेशन दूर होते आणि अन्न पचण्यास मदत होते.
मधुमेहात आराम - ज्यांना मधुमेह आहे ते ऊसाचा रस प्यायला घाबरतात, त्याच्या गोडव्यामुळे असे लोक ऊसाचा रस पीत नाहीत. पण ऊसामध्ये आयसोमल्टोज नावाचा पदार्थ असतो जो रक्तातील साखरेची पातळी कमी करू शकतो. त्यामुळेच मधुमेहाच्या रुग्णांसाठीही उसाचा रस फायदेशीर ठरतो.
वजन कमी होते - ऊसाचा रस प्यायल्यानेही वजन कमी होण्यास मदत होते. यामध्ये आहारातील फायबर असते ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. ऊसाचा रस रिकाम्या पोटी प्यायल्याने वजन झपाट्याने कमी होते.
महत्वाच्या बातम्या :
- Health Tips : 'हा' आजार असलेल्यांनी चुकूनही करू नये शेंगदाण्यांचे सेवन; आरोग्यासाठी ठरेल हानिकारक
- Amla benefits : सुपरफूड अशा आवळ्याचे 'हे' गुणधर्म आणि वापरण्याची पद्धत तुम्हाला माहित आहे का?
- Weight Loss : वजन कमी करण्यासाठी आहारात सामील करा स्प्राउट्स, आरोग्यालाही होतील अनेक फायदे!
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha