(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : प्रथिनांच्या कमतरतेला हलक्यात घेऊ नका; तुमच्या वयानुसार दररोज किती प्रोटीन घ्यावं? वाचा सविस्तर
Health Tips : प्रथिनांच्या कमतरतेमुळे लठ्ठपणा, हाडे कमकुवत होणे, केस गळणे आणि प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते. त्यामुळे प्रथिनांच्या गरजेबरोबरच कोणत्या वयात किती प्रथिने आवश्यक आहेत.
Health Tips : शरीर निरोगी ठेवण्यासाठी प्रथिने (Protein) महत्त्वाची भूमिका बजावतात. हाडे मजबूत करण्याबरोबरच एकंदर आरोग्यासाठीही ते फार महत्त्वाचे आहे. शरीरात प्रोटीनच्या कमतरतेमुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. प्रथिनांच्या कमतरतेमुळे लठ्ठपणा, हाडांचा कमकुवतपणा, केस गळती, त्वचेच्या समस्या आणि कमकुवत प्रतिकारशक्ती यांसारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे प्रथिनांच्या गरजेबरोबरच कोणत्या वयात किती प्रथिने आवश्यक आहेत हेही जाणून घेणं फार गरजेचं आहे. जाणून घेऊयात तज्ज्ञांचं नेमकं काय म्हणणं आहे.
वयानुसार दररोज किती प्रथिने आवश्यक आहेत?
- 1-3 वर्ष - 13 ग्रॅम
- 4-8 वर्ष - 19 ग्रॅम
- 9-13 वर्ष - 34 ग्रॅम
- 14-18 वर्ष - 52 ग्रॅम
- 14-18 वर्ष - 46 ग्रॅम
- 19 वर्षांनंतरच्या महिलांसाठी - 46 ग्रॅम
- 19 वर्षांनंतर पुरुषांसाठी - 56 ग्रॅम
वृद्धांनी किती प्रोटीन घ्यावे?
शरीरातील त्वचा, केस, नखे, स्नायू, हाडे आणि अंतर्गत अवयवांच्या निर्मितीमध्ये प्रथिने फार महत्त्वाची भूमिका बजावतात. हे पेशी आणि ऊती तयार करणे आणि बरे करण्यास देखील मदत करतात. प्रथिनांच्या कमतरतेमुळे स्नायू फ्रॅक्चर देखील होऊ शकतात. वाढत्या वयाबरोबर स्नायूंची घनता, हाडांची घनता आणि ताकद कमी होते, त्यामुळे वृद्धांना प्रौढांपेक्षा जास्त प्रोटीनची आवश्यकता असते. तज्ञांच्या सल्ल्यानुसार ते प्रोटीनयुक्त आहार घेऊ शकतात.
प्रथिनांची कमतरता कशी पूर्ण करावी?
प्रथिने सर्व प्रकारच्या पदार्थांमध्ये आढळतात. पण, काही पदार्थ असे आहेत ज्यात प्रथिने जास्त प्रमाणात असतात. सकस आहार घेतल्याने शरीराला प्रथिनांचा पुरवठा होतो. सी फूड, मांस, अंडी, बीन्स, कडधान्ये, ड्रायफ्रुट्स, बिया आणि सोया उत्पादनांमध्ये भरपूर प्रथिने आढळतात. याशिवाय दूध, चीज, ताक यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांमध्येही प्रथिने जास्त प्रमाणात आढळतात. संपूर्ण धान्य आणि भाज्यांमध्ये भरपूर प्रथिने आढळतात. याच्या सेवनाने शरीरातील प्रोटीनची कमतरता दूर होऊ शकते.
तुम्ही देखील वाढत्या वयानुसार तुमच्या शरीरात प्रोटीनची पातळी वाढवली तर तुम्ही देखील निरोगी राहू शकाल. तसेच, तुमची प्रतिकारकशक्ती देखील मजबूत होण्यास मदत होते. यासाठी रात्री पाण्यात भिजवलेले ड्रायफ्रूट्स तुमच्यासाठी फार महत्त्वाचे ठरतील. वरील पदार्थांचं सेवन केल्याने शरीराला भरपूर फायदे मिळू शकतात. यासाठी प्रोटीनचं सेवन लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाने करणं गरजेचं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.