![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : जेवणानंतर रक्तातील साखर 300 पार जाते? फक्त 'या' 5 गोष्टी करा; साखरेची पातळी नियंत्रित राहील
Health Tips : जेव्हा रक्तातील साखरेची पातळी वाढते तेव्हा अंधुक दृष्टी, लक्ष केंद्रित न होणे, ऊर्जा कमी होणे, थकवा, अशक्तपणा, अस्वस्थता यांसारखी लक्षणे दिसू शकतात.
![Health Tips : जेवणानंतर रक्तातील साखर 300 पार जाते? फक्त 'या' 5 गोष्टी करा; साखरेची पातळी नियंत्रित राहील Health Tips how to manage blood sugar spikes after meals try these 6 simple ways to prevent blood sugar marathi news Health Tips : जेवणानंतर रक्तातील साखर 300 पार जाते? फक्त 'या' 5 गोष्टी करा; साखरेची पातळी नियंत्रित राहील](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/05/abcafa08acafed8d52f64ae08af49f581701768742665358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Health Tips : बदलत्या जीवनशैलीमुळे (Lifestyle) आजकाल मधुमेहाच्या रूग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. मधुमेहाच्या (Diabetes) रूग्णांची सर्वात मोठी समस्या ही आहे की त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी रिकाम्या पोटी जास्त राहते. पण, जेवणानंतर किंवा काही खाल्ल्यानंतर ही पातळी आणखी वाढते. साहजिकच, जेव्हा रक्तातील साखरेची पातळी वाढते तेव्हा अंधुक दृष्टी, लक्ष केंद्रित न होणे, ऊर्जा कमी होणे, थकवा, अशक्तपणा, अस्वस्थता यांसारखी लक्षणे दिसू शकतात.
जर तुमच्या रक्तातील साखर खूप कमी झाली तर तुम्ही बेशुद्ध देखील होऊ शकता. दीर्घकाळात, तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढलेले राहिल्यास, तुम्हाला हृदयविकार, स्ट्रोक, किडनी रोग किंवा मधुमेह यांसारख्या गंभीर आरोग्य समस्यांचा धोका असू शकतो. यासाठी खाण्याआधी आणि नंतर रक्तातील साखरेची पातळी कशी असावी? या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या.
जेवणापूर्वी आणि नंतर रक्तातील साखर किती असावी?
खाल्ल्यानंतर अनेक रुग्णांच्या रक्तातील साखरेची पातळी 300 च्या पुढे जाते. अमेरिकन डायबिटीज असोसिएशन (ADA) ने शिफारस केली आहे की, तुम्ही जेवणापूर्वी तुमची रक्तातील साखर तपासा. जेवणानंतर 1 ते 2 तासांनी ते पुन्हा तपासा. साधारण आठवडाभर हे चालू ठेवा. तुमच्या शुगर लेव्हलवर परिणाम करणारी औषधे, व्यायाम, तुम्ही काय खाल्ले इत्यादींची नोंद घ्या. जेवणानंतर 1 ते 2 तासांनी रक्तातील साखरेची पातळी 180 mg/dL पेक्षा कमी असावी.
जेवणानंतर रक्तातील साखर वाढू नये यासाठी काय कराल?
जर तुम्हाला मधुमेह असेल तर प्रथिने तुमच्यासाठी पुरेसे असतील.
तुम्ही काय खात आहात याची काळजी घ्या
जर तुम्ही मिठाई, व्हाईट ब्रेड, भात, पास्ता आणि बटाटे यांसारख्या पदार्थांचे सेवन करत असाल तर ते खाल्ल्यानंतर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची शक्यता आहे. या गोष्टींचा आहारात कमीत कमी समावेश करा.
अनहेल्दी फॅट टाळा
तुम्ही खाल्लेल्या फॅटच्या प्रकारामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढण्याचा धोका वाढतो. जर तुम्ही भरपूर बटर असलेले पदार्थ वगळले आणि त्याऐवजी ऑलिव्ह ऑईलने बनवलेले पदार्थ खाल्ले तर ते जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी वाढण्यापासून रोखू शकते.
दररोज सकाळी नाश्ता करा
अनेक लोक ही चूक करतात. नाश्ता कधीही वगळू नका. जे लोक सकळचा नाश्ता करत नाहीत त्यांना डायबिटीजचा त्रास आहे त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणानंतर वाढण्याची शक्यता असते.
मधुमेहाच्या रुग्णांनी नाश्त्यात काय खावे?
तुमचा नाश्ता प्रथिनांनी समृद्ध असावा. जर्नल न्यूट्रिशन (ref) मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की कमी-कॅलरी, प्रथिनेयुक्त नाश्ता खाल्ल्याने जेवणानंतरच्या रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
रात्रीच्या जेवणानंतर फेऱ्या मारा
ही प्रत्येकासाठी एक आरोग्यदायी सवय आहे, परंतु तुम्हाला मधुमेह असल्यास, अन्नातून अतिरिक्त ग्लुकोज काढून टाकण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. याशिवाय रात्री जेवणानंतर फेऱ्य मारल्याने वजन नियंत्रित ठेवण्यासही मदत होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Room Heater Side Effects : हिवाळ्यात रूम हीटर जपून वापरा; तुमची एक चूक पडू शकते महागात
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)