उकडलेले सॅलड खाल्ल्याने वजन झपाट्याने कमी होईल, शरीरालाही मिळतील अनेक फायदे
वजन कमी करण्यासाठी, आपण आहारात सॅलड समाविष्ट करणे आवश्यक आहे. कोशिंबीर खाल्ल्याने वारंवार भूक लागत नाही आणि अनेक पोषक तत्वे मिळतात. हे खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
Health Tips : अनेकदा मैदाचे पदार्थ खाल्ल्याने वजन वाढतेच. पण त्याहीपेक्षा वजन वाढण्यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे आपली खराब जीवनशैली. वेळत जेवण नाही, झोपणं नाही दिवसभर धावपळ करण्यात जातो. याचा सर्वात जास्त परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. अशा जीवनशैलीत हळूहळू वजन वाढू लागते. पण, जर तुम्ही तुमच्या आहाराकडे लक्ष दिले तर तुम्ही वजन बऱ्याच अंशी नियंत्रणात ठेवू शकता. आज आम्ही तुम्हाला एक असा खास आहार सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे वजन वाढणार नाही आणि अतिरिक्त कॅलरीजही मिळणार नाहीत. वजन कमी करण्यासाठी, आपण आहारात मिक्स भाज्यांची कोशिंबीर समाविष्ट करणे आवश्यक आहे. वजन कमी करण्यासाठी हा सर्वात सोपा आहार आहे. उकडलेले सॅलड खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात.
मिक्स व्हेजिटेबल सॅलडचे फायदे :
1- सर्व जीवनसत्त्वे, खनिजे आणि प्रथिने या सॅलडमध्ये आढळतात. जे शरीराच्या विकासासाठी आवश्यक असते.
2- कोशिंबिरीने जास्त वेळ पोट भरलेले राहते. त्यामुळे पोट पुढे येण्याची समस्या होत नाही.
3- कोशिंबीर खाल्ल्याने शरीरात जडपणा आणि सुस्ती येत नाही. यामुळे तुम्हाला भरपूर ऊर्जाही मिळते.
4- मिक्स्ड व्हेजिटेबल सॅलड खाल्ल्याने भरपूर फायबर मिळते आणि शरीर हायड्रेट राहते. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
5- रोज मिक्स भाज्यांचे कोशिंबीर खाल्ल्याने पचनसंस्था निरोगी राहते.
अनेक वेळा कच्च्या कोशिंबीर खाल्ल्याने पोटात संसर्ग होण्याचा धोका असतो. या हंगामात भाज्यांमध्ये अनेक प्रकारचे जंतू वाढू लागतात. त्यांच्यामध्ये असा वायू वाढू लागतो, ज्याचा तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कोशिंबीर मंद आचेवर ऑलिव्ह ऑईलमध्ये हलके शिजवल्यानंतरच खावी. यामुळे तुमचे वजन झपाट्याने कमी होईल आणि शरीराला अनेक फायदे मिळतील. त्यात कांदा, टोमॅटो, काकडी, गाजर, मुळा आणि लिंबू मिसळून सलाड खाऊ शकता.
मिक्स व्हेजिटेबल सॅलड
मिक्स व्हेजिटेबल सॅलड बनवायला खूप सोपे आहे. तुम्ही त्यात कितीही भाज्या टाकू शकता. जर तुम्हाला सॅलडमध्ये जास्तीत जास्त पोषक द्रव्ये घ्यायची असतील तर तुम्हाला ते कसे बनवायचे आणि कसे खावे हे माहित असले पाहिजे. डायटिंग करणाऱ्यांसाठी हे सॅलड खूप फायदेशीर आहे. या सॅलडमध्ये तुम्ही कोणत्या भाज्या घालू शकता हे जाणून घ्या.
मिक्स व्हेजिटेबल सॅलडसाठीचे साहित्य
- 1 टीस्पून ऑलिव्ह ऑइल
- 3 बेबी कॉर्न
- 1-2 चिरलेले टोमॅटो
- 1 हिरवी शिमला मिरची
- 1 पिवळी भोपळी मिरची
- 2 चिरलेली गाजर
- 8-10 फरसबी
- 1 ब्रोकोली
मिक्स व्हेजिटेबल सॅलड रेसिपी
सर्व प्रथम ब्रोकोली गरम पाण्यात काही वेळ उकळवा. यामुळे ब्रोकोली मऊ होईल. आता इतर सर्व भाज्या चिरून घ्या. एका पॅनमध्ये ऑलिव्ह ऑइल ठेवा. तुम्ही इतर कोणतेही तेल किंवा बटर देखील वापरू शकता. त्यात बेबी कॉर्न आणि सर्व चिरलेल्या भाज्या घाला. आता थोडे पाणी घालून मंद आचेवर सॅलड शिजवा. तुम्हाला हे सॅलड फक्त 5 मिनिटे शिजवावे लागेल. त्यात चवीनुसार मीठ आणि मिरपूड घाला. सॅलड खाण्यासाठी तयार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Health Tips : गव्हाची चपाती की मल्टीग्रेन आटा रोटी, वजन कमी करण्यासाठी कोण ठरेल फायदेशीर?
- Weight Loss Tips : वजन कमी करायचंय? मग, आहारात नक्की सामील करा ‘ही’ फळं आणि भाज्या!
- Health Tips : शरीरातील अशक्तपणा दूर करण्यासाठी दररोज 'हे' एनर्जी ड्रिंक्स प्या, मिळतील अनेक फायदे
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )