Health Tips : सकाळचा नाश्ता आणि रात्रीचं जेवण आठ वाजण्यापूर्वी केलं तर हृदयावर 'असा' परिणाम होतो; काय म्हणतात तज्ज्ञ?
Health Tips : ज्यावेळेस नाश्ता किंवा रात्रीचे जेवण करतो त्याचा थेट परिणाम आपल्या हृदयाच्या आरोग्यावर होतो.
Health Tips : आपण ज्या वेळेस आपला नाश्ता आणि जेवण करतो त्याचा थेट परिणाम आपल्या हृदयाच्या (Heart) आरोग्यावर जातो. असे अनेक संशोधनातून सिद्ध झालं आहे. इतकंच नव्हे तर आपल्या झोपेचं गणितही आपल्या खाण्यावर अवलंबून आहे. जर तुम्हाला सकाळी आणि रात्री आठच्या आधी नाश्ता आणि जेवण करण्याची सवय असेल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. पण, जर तुम्ही आठनंतर नाश्ता आणि जेवण करत असाल तर काळजी करण्याची काही गरज नाही. पण, त्याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो.
संशोधनात काय म्हटलंय?
'फ्रेंच संशोधन संस्था' 'राष्ट्रीय कृषी संशोधन संस्था' अन्न आणि पर्यावरण (NRAE) ने नुकत्याच केलेल्या संशोधनात असं दिसून आलं आहे की, जे लोक सकाळी नऊच्या नंतर नाश्ता करतात त्यांच्यामध्ये हृदयविकाराच्या धोक्याचं प्रमाण वाढतं. तुम्ही जितका वेळ लावाल तितक्या वेगाने हा धोका आणखी वाढतो. या विशेष संशोधनात 2009 ते 2022 या कालावधीतील डेटाचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये 100,000 हून अधिक व्यक्तींचे नमुने समाविष्ट करण्यात आले आहेत. संशोधनात असेही आढळून आले की जे लोक रात्रीचे जेवण उशिरा करतात किंवा सकाळी उशिरा नाश्ता करतात त्यांना हृदयविकाराचा धोका वाढतो. तर रात्री बराच वेळ उपवास केल्याने स्ट्रोक सारख्या सेरेब्रोव्हस्कुलर रोगाचा धोका कमी होतो.
रात्रीचे जेवण आणि नाश्ता यामध्ये अंतर असावे
तुम्हाला जर रात्री नऊ नंतर जेवण्याची सवय असेल तर विशेषत: महिलांमध्ये सेरेब्रोव्हस्कुलर रोगाचा धोका जास्त वाढतो. तसेच, स्ट्रोकचा धोका रात्री 8 वाजण्यापूर्वी खाण्यापेक्षा 28 टक्क्यांनी वाढतो. तुमच्या जेवणाची वेळ हृदयविकार कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. अनेक संशोधनात असे आढळून आले आहे की, जर तुम्ही रात्रीचे जेवण लवकर केले तर नाश्ता आणि रात्रीचे जेवण यामध्ये खूप अंतर असते. यामुळे हृदयविकाराचा धोका बर्याच प्रमाणात कमी होतो. थोडक्यात सांगायचं झालं तर, तुम्ही कोणत्या वेळी आहार घेता याचा तुमच्या हृदयावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो. अशा प्रकारे तुम्ही आठचा नियम जर लावला तर नक्कीच तुमचा अनेक समस्या कमी होतील.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Pregnancy Health Issues : गरोदरपणात महिलांना 'या' आजारांचा सर्वाधिक धोका; अशी आरोग्याची काळजी घ्या