एक्स्प्लोर

Health Tips : सावधान! तुम्हीही डिस्पोजेबल कपमध्ये चहा, कॉफी पित असाल तर वेळीच सावध व्हा; 'या' आजारांचा वाढता धोका

Disposable Cup And Cancer : डिस्पोजेबल कपमध्ये चहा आणि कोणतीही गरम वस्तू पिणे आरोग्याला खूप नुकसान पोहोचवू शकते.

Disposable Cup And Cancer : आजकाल जीवनशैलीच्या सगळ्या पद्धती बदलत चालल्या आहेत. प्रत्येक गोष्टीत, वस्तूत बदल होत चालला आहे. आता डिस्पोजेबल कपांनी स्टील किंवा काचेचे ग्लास किंवा भांडी यांची जागा घेतली आहे. तुम्ही कुठेही जा अगदी रस्त्यावरच्या दुकानापासून ते मोठ्या हॉटेलपर्यंत आजकाल सगळीकडे हे डिस्पोजेबल कप सगळीकडे वापरले जातात. पाणी, चहा, कॉफी किंवा इतर कोणत्याही पेयासाठी डिस्पोजेबल कपचा वापर अगदी सहज केला जातो. पण तुम्हाला माहित आहे का की डिस्पोजेबल कप आरोग्यावर परिणाम करू शकतात. याच्या अति सेवनाने कोणता धोका होऊ शकतो? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.  
 
डिस्पोजेबल कपमुळे कर्करोग होऊ शकतो का?

प्लास्टिक आणि रसायनांचा वापर करून डिस्पोजेबल कप तयार केले जातात, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. जर तुम्ही दीर्घकाळ या कपचा वापर करत असाल तर कर्करोग होऊ शकतो. डॉक्टरांनी सांगितले की, डिस्पोजेबल कपमध्ये बिस्फेनॉल आणि बीपीए सारखी रसायने आढळतात. ही अत्यंत घातक रसायने आहेत. या कपमध्ये चहा किंवा गरम पाणी प्यायल्यास त्यातील रसायने त्यामध्ये विरघळतात आणि ही रसायने पोटात पोहोचतात, ज्यामुळे कर्करोगाचा धोका होऊ शकतो.
 
डिस्पोजेबल कपमुळे थायरॉईड आजाराचा धोका 

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, डिस्पोजेबल कप बनवण्यासाठी केवळ रसायनांचा वापर केला जात नाही, तर मायक्रोप्लास्टिकचाही वापर केला जातो. त्यामुळे थायरॉईडसारखे धोकादायक आजार होऊ शकतात. त्यांचा दीर्घकाळ वापर केल्याने देखील कर्करोग होऊ शकतो. अल्कोहोल किंवा धूम्रपान करणाऱ्यांमध्ये डिस्पोजेबल कप वापरल्याने कर्करोगाचा धोका खूप लवकर वाढू शकतो. म्हणूनच डिस्पोजेबल कपचा वापर टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
 
डिस्पोजेबल कपसाठी पर्याय

चहा, कॉफी किंवा पाणी पिण्यासाठी प्लास्टिक किंवा कागदाचा वापर टाळावा, असे डॉक्टर सांगतात. याऐवजी स्टीलचे भांडे किंवा कुल्हडचा कप वापरावे. कुल्हडच्या कपात चहा पिण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे कागद आणि प्लास्टिकचा वापरही कमी होतो. मातीच्या कुल्हडमध्ये असे अनेक घटक आढळतात, जे हाडांसाठी फायदेशीर असतात. म्हणूनच डिस्पोजेबल कपांऐवजी तुम्ही कुल्हड किंवा स्टीलचे भांडे वापरू शकता. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : शपथविधीआधी देवेंद्र फडणवीसांसमोर सर्वात मोठी आव्हानं, एकनाथ शिंदेच्या नाराजीचा अर्थ काय?Special Report on Devendra Fadnavis : सर्वसमावेशक अनुमोदन, देवेंद्र फडणवीस भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदीSudhir Mungantiwar on Oath Ceremony : उद्या फक्त 3 जण शपथ घेतील, सुधीर मुनगंटीवारांची मोठी माहितीEknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
Embed widget