एक्स्प्लोर

Hair Care : उन्हामुळे होत आहेत केस खराब? चमकदार आणि दाट केसांसाठी करा 'हे' 5 उपाय

Hair Care: जर सूर्यप्रकाशामुळे केस खराब झाले असतील तर काही घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही केस नीट करू शकता, त्याबद्दल जाणून घेऊया.

Hair Care : उन्हाळ्यात सूर्यप्रकाशाचा परिणाम केवळ चेहऱ्यावरच नाही, तर केसांवरही होतो. त्वचेवर सनस्क्रीन लावून तुम्ही त्याचे संरक्षण करु शकता. पण केसांना उष्णतेपासून वाचवण्यात आपण सगळेच अपयशी ठरतो आणि त्यामुळे केस हळूहळू तुटायला लागतात आणि कमी होतात. जर तुम्हीही या सर्व समस्यांनी त्रस्त असाल, तर हेअर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी काही टिप्स जाणून घ्या, जे तुमचे केस मऊ आणि चमकदार बनवू शकतात.

कोमट तेलाने मसाज करा

उन्हात केसांची आर्द्रता निघून जाते आणि केसांची मुळे कमकुवत होऊ लागतात, अशा परिस्थितीत केसांना पोषणाची गरज असते, यासाठी केसांच्या मुळांना कोमट खोबरेल किंवा ऑलिव्ह ऑईल लावा. केस गळण्याची समस्या असेल तर त्यापासून सुटका मिळेल.

नैसर्गिक शाम्पू वापरा

उष्णतेमुळे केसांची चमक कुठेतरी हरवते. उन्हामुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी केमिकलयुक्त हार्ड शाम्पू वापरणं टाळा. बाजारात मिळणारे कोणतेही आयुर्वेदिक किंवा  अॅलोवेरा जेल शाम्पू वापरावा, यामुळे केसांना ओलावा मिळेल आणि चमकही येईल.

हेअर मास्क लावा

उन्हाळ्यात हेअर मास्क लावणं देखील आवश्यक आहे, यामुळे केसांची मुळे मजबूत होतात. केस मऊ होतात आणि डॅमेज कंट्रोल होते. हेअर मास्क लावण्यासाठी केळी मॅश करुन त्यात दोन ते तीन चमचे बदामाचे तेल मिसळा. हे मिश्रण केसांच्या लांबीपासून मुळापर्यंत पूर्णपणे नीट लावा, 15 ते 20 मिनिटे हे मिश्रण केसांवर राहू द्या आणि नंतर केस धुवा.

चहाच्या पाण्याने केस धुवा

जर केस खूप खराब झाले असतील तर त्यासाठी तुम्ही चहाच्या पाण्यानेही केस धुवू शकता. यासाठी पातेलं अर्ध पाण्याने भरुन त्यात चहाची पाने टाकून उकळा. पाणी थंड झाल्यावर केस धुवा आणि केस टॉवेलमध्ये गुंडाळून 15 ते 20 मिनिटे ठेवा, त्यानंतर केस सामान्य पाण्याने धुवा. यामध्ये असलेले कॅफिन केसांच्या दुरुस्तीसाठी मदत करते आणि केसांचा कोरडेपणा दूर होतो.

उन्हात जाताना केस कव्हर करा

जेव्हाही घराबाहेर पडता तेव्हा सुती कापडाने केस बांधून घ्या, जेणेकरुन केसांना व्यवस्थित हवा मिळेल आणि उष्णतेचा परिणाम केसांवर होणार नाही.

(टीप: या लेखात नमूद केलेले उपाय आणि सूचनांचे अनुसरण करण्यापूर्वी डॉक्टर किंवा संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्या.)

हेही वाचा:

Home Remedy For White Hair: 'या' उपायांनी केस होतील नैसर्गिक पद्धतीने कायमचे काळे; नेहमी केस रंगवण्याचा ताण होईल दूर

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Akola crime: आधी सख्ख्या बापाने पोटच्या मुलीच्या शरीराचे लचके तोडले नंतर काका अन् शेजारच्या म्हाताऱ्यानेही लैंगिक शोषण केलं, अकोल्यातील संतापजनक घटना
आधी सख्ख्या बापाने पोटच्या मुलीच्या शरीराचे लचके तोडले नंतर काका अन् शेजारच्या म्हाताऱ्यानेही लैंगिक शोषण केलं, अकोल्यातील संतापजनक घटना
Chandrapur : मुनगंटीवारांच्या नाराजीनाट्यामुळं काय बदललं? चंद्रपुरात भाजपचा सर्वांना खुश करणारा तोडगा
मुनगंटीवारांच्या नाराजीनाट्यामुळं काय बदललं? चंद्रपुरात भाजपचा सर्वांना खुश करणारा तोडगा
Mhada Pune Lottery : म्हाडा पुणेच्या 4186 घरांची सोडत अनिश्चित काळासाठी लांबणीवर, 2 लाख 15 हजार अर्जदार हवालदिल, अनामत रकमेच्या व्याजाचं काय असा सवाल 
म्हाडा पुणेच्या 4186 घरांची सोडत अनिश्चित काळासाठी लांबणीवर, 2 लाख 15 हजार अर्जदार हवालदिल
Rohit Sharma : विराट कोहलीचा छोटा चाहता मॅच संपताच धावत आला, रोहित शर्मानं एका कृतीनं सर्वांची मनं जिंकली पाहा Video  
कोहलीचा छोटा चाहता मॅच संपताच धावत आला, रोहित शर्मानं एका कृतीनं सर्वांची मनं जिंकली पाहा Video

व्हिडीओ

Tara Tiger : ताडोबातून आलेल्या ताराचा सह्याद्रीत मुक्त संचार Special Report
Nashik BJP VS Shiv Sena Thackeray :  आयारामांचं संकट? नाशिक भाजपात कटकट! Special Report
Sayaji Shinde Vanrai : सयाजींच्या वनराईवर कुणाची वाकडी नजर? Special Report
Municipal Corporation Election 2026 : महानगरपालिका निवडणुकीतही घराणेशाहीचा दबदबा Special Report
Prashant Jagtap NCP : प्रशांत जगताप काँग्रेसचा हात धरणार? अजितदादांमुळे काकाशी कट्टी... Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Akola crime: आधी सख्ख्या बापाने पोटच्या मुलीच्या शरीराचे लचके तोडले नंतर काका अन् शेजारच्या म्हाताऱ्यानेही लैंगिक शोषण केलं, अकोल्यातील संतापजनक घटना
आधी सख्ख्या बापाने पोटच्या मुलीच्या शरीराचे लचके तोडले नंतर काका अन् शेजारच्या म्हाताऱ्यानेही लैंगिक शोषण केलं, अकोल्यातील संतापजनक घटना
Chandrapur : मुनगंटीवारांच्या नाराजीनाट्यामुळं काय बदललं? चंद्रपुरात भाजपचा सर्वांना खुश करणारा तोडगा
मुनगंटीवारांच्या नाराजीनाट्यामुळं काय बदललं? चंद्रपुरात भाजपचा सर्वांना खुश करणारा तोडगा
Mhada Pune Lottery : म्हाडा पुणेच्या 4186 घरांची सोडत अनिश्चित काळासाठी लांबणीवर, 2 लाख 15 हजार अर्जदार हवालदिल, अनामत रकमेच्या व्याजाचं काय असा सवाल 
म्हाडा पुणेच्या 4186 घरांची सोडत अनिश्चित काळासाठी लांबणीवर, 2 लाख 15 हजार अर्जदार हवालदिल
Rohit Sharma : विराट कोहलीचा छोटा चाहता मॅच संपताच धावत आला, रोहित शर्मानं एका कृतीनं सर्वांची मनं जिंकली पाहा Video  
कोहलीचा छोटा चाहता मॅच संपताच धावत आला, रोहित शर्मानं एका कृतीनं सर्वांची मनं जिंकली पाहा Video
Vasai Virar Election : वसई-विरारचा तिढा सुटला, 91 जागांवर भाजप तर 24 जागांवर शिंदेंची शिवसेना लढणार
वसई-विरारचा तिढा सुटला, 91 जागांवर भाजप तर 24 जागांवर शिंदेंची शिवसेना लढणार
भाजपचा तो पराभव माझ्यामुळे झाला तर आनंदाची बाब; एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांवर पलटवार
भाजपचा तो पराभव माझ्यामुळे झाला तर आनंदाची बाब; एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांवर पलटवार
Pune Election 2026 BJP Shivsena: पुण्यात भाजपकडून शिंदे गटाला फक्त 12 जागांची ऑफर, शिवसेनेचा महायुतीमधून बाहेर पडण्याचा इशारा
पुण्यात भाजपकडून शिंदे गटाला फक्त 12 जागांची ऑफर, शिवसेनेचा महायुतीमधून बाहेर पडण्याचा इशारा
Gold Rate : सोने चांदीच्या दरवाढीचा ट्रेंड कायम, 2026 मध्ये दर किती रुपयांपर्यंत वाढणार? तज्ज्ञ काय म्हणाले? अधिक परतावा कुठं मिळणार? 
सोने चांदीच्या दरवाढीचा ट्रेंड कायम, 2026 मध्ये दर किती रुपयांपर्यंत वाढणार? तज्ज्ञ काय म्हणाले?
Embed widget