Dating Tips : पहिल्या डेटनंतर गर्लफ्रेंड इम्प्रेस झाली की नाही? असं जाणून घ्या
Dating Tips : तुम्ही हे जाणून घेऊ शकता की तुमचा जोडीदार पहिल्या डेटमध्ये तुमच्यावर प्रभावित झाला आहे की नाही.
How to know Girls Mind on First Date : पहिल्या डेटसाठी मुलगा आणि मुलगी दोघेही खूप उत्सुक असतात. डेटसाठी मुलगा समोरच्या जोडीदाराला प्रभावित करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो. ज्यानंतर डेट यशस्वी होते. पण त्यानंतर समोरची व्यक्ती तुमच्यावर खऱ्या अर्थाने प्रभावित झाली आहे की नाही हे समजायची वेळ येते. त्यावेळी जोडीदार नात्यात पुढे जाण्यास तयार आहे की नाही हे जाणून घेण्याची उत्सुकताही लागलेली असते.
म्हणून आम्ही तुम्हाला काही टिप्स देत आहोत ज्याद्वारे तुम्ही हे जाणून घेऊ शकता की तुमचा जोडीदार पहिल्या डेटमध्ये तुमच्यावर प्रभावित झाला आहे की नाही.
मुलीचे स्मित
तुम्ही पहिल्या डेटवर आहात आणि त्याच वेळी तुमचा जोडीदार या नात्यात पुढे जाण्यास तयार आहे की नाही हे तुम्ही शोधू शकता. डेट दरम्यान चेहऱ्यावरच स्मित हास्य किंवा त्यांच्या चेहऱ्यावरील चमक यावरून जोडीदार तुमच्यावर प्रभावित झाला आहे हे तुम्ही समजू शकता.
इंटरेस्ट
जर तुमच्या समोरची व्यक्ती तुम्हाला डेट दरम्यान पसंत करत नसेल तर समोरची व्यक्ती डेटवरून बहाणा करून तेथीन निघण्याचा प्रयत्न करेल आणि जर जर जोडीदारानं आनंदानं डेट एन्जॉय केली आणि डेट पूर्ण केली तर याचा अर्थ त्याला तुमच्यामध्ये इंटरेस्ट आहे.
तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणे किंवा लक्ष न देणे
डेट दरम्यान तुमच्या बोलण्यात जर समोरची व्यक्ती लक्ष देत नसेल म्हणजे रस घेत नसेल, तुमच्या बोलण्याला योग्य उत्तर देत नसेल, तर समजून घ्या की त्याला तुमच्या बोलण्यात रस नाही. आणि जर तो असेल तर ती नक्कीच तुमचे शब्दांवरून पुढे बोलणं वाढवण्याचा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करेल.
प्रशंसा करणे
जर मुलगी तुम्हाला किंवा डेटचे ठिकाण किंवा तुम्ही मांडलेल्या गोष्टी पसंत करत नसेल, तर समजून घ्या की तिला या डेटमध्ये इंटरेस्ट नाही. दुसरीकडे, जर समोरच्या व्यक्ती तुमची किंवा डेटच्या ठिकाणाची प्रशंसा केली तर ती तुमच्यावर नक्कीच खुश आहे.
डेटवरून निघताना मुलीची प्रतिक्रिया
डेट संपल्यानंतर मुलीची प्रतिक्रियेवर नक्की लक्ष द्या. जर मुलगी तुम्हाला बाय-बाय करून हसत असेल किंवा पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत असेल तर समजून घ्या की ती तुमच्यावर प्रभावित झाली आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या इतर बातम्या