Skin Care Tips : हिवाळ्यात मुलायम आणि चमकदार त्वचा हवीये? ट्राय करा 'हे' घरगुती फेसपॅक
Winter Face Pack For Softness: हिवाळ्यामध्ये (Winter Season) त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते.
Winter Face Pack For Softness: हिवाळ्यामध्ये (Winter Season) त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण हिवाळ्यात त्वचा कोरडी होते. सामान्य त्वचा, कोरडी त्वचा आणि सेन्सिटिव्ह त्वचा हे त्वचेचे तीन प्रकार आहेत. थंडीमध्ये जर तुम्ही केमिकल्स असणाऱ्या प्रोडक्टचा वापर केला तर तुम्हाला रॅश येणे (Skin Rashes) आणि त्वचा कोरडी पडणे या समस्या जाणवतील. घरी तयार केलेले फेसपॅक वापरल्याने तुमची त्वचा मुलायम आणि चमकदार होईल. जाणून घेऊयात मुलतानी मातीपासूस फेसपॅक तयार करण्याची सोपी पद्धत-
1. दूध आणि मुलतानी माती-
मुलतानी मातीचा फेसपॅक लावल्याने तुमच्या स्किनचा टोन चांगला होतो. त्याचप्रमाणे मुलतानी मातीने टॅन देखील कमी होतो. 2 किंवा 3 चमचे मुलतानी माती घ्या त्यामध्ये दोन चमचे 2 चमचे दूध मिक्स करा. हा फेसपॅक चेहऱ्याला लावा. त्यानंतर 10-12 मिनीटे चेहऱ्यावर लावा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.
2. मध आणि मुलतानी मातीचा फेसपॅक-
हा फेसपॅक तयार करण्यासाठी एक चमचा मुलतानी माती घ्या. त्यामध्ये अर्धा चमचा गुलाब पाणी मिक्स करा. त्यानंतर त्यामध्ये अर्था चमचा मध टाका. हा फेसपॅक दिवसातून दोन वेळा चेहेऱ्यावर लावा.
3. हळद आणि मुलतानी मातीचा फेसपॅक-
हळद आणि मुलतानी मातीचा फेसपॅक तयार करण्यासाठी 1 चमचा मुलतानी माती घ्या. त्यामध्ये हळद पावडर आणि गुलाब पाणी मिक्स करा.हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा. या फेसपॅकमुळे तुमच्या चेहऱ्यावरील डाग निघून जातील.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
संबंधित बातम्या
Health Tips : दररोज दूधात तूप टाकून प्या, पळून जातील आजार; काय आहेत फायदे?
Weight Loss Tips : वजन नियंत्रणात ठेवायचंय? मग, नाश्ता करताना 'ही' काळजी घ्या, फॅट टू फिट होण्यासाठी होईल मदत