Earth: पृथ्वी आज सूर्याच्या सर्वात जवळ; जाणून घ्या काय आहे Perihelion
वर्षातून एकदा पृथ्वी (Earth) ही सूर्याच्या (sun) सर्वात जवळ येते. या स्थितीला पेरिहेलियन (Perihelion) असं म्हणलं जातं.
Earth Perihelion : सूर्य आज (4 जानेवारी) पृथ्वीच्या सर्वात जवळ असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस खास आहे. आज पृथ्वीही सूर्य भोवती लंबवर्तुळाकार मार्गाने परिक्रमा करणार असून सूर्य पृथ्वीच्या जवळ असेल. आज दुपारी 12 वाजून 22 मिनीटांनी पृथ्वी आणि सूर्य यांच्यामधील अंतर हे 14 कोटी 71 लाख 5 हजार 52 किलोमीटर असणार आहे. वर्षातून एकदा पृथ्वी ही सूर्याच्या सर्वात जवळ येते. जाणून घेऊयात या दिवसाबद्दल-
पृथ्वी आज सुमारे 19 मैल ताशी वेगाने कक्षेत सर्वात वेगाने आज फिरत आहे. वर्षातून एकदा पृथ्वी सूर्याच्या सर्वात जवळ असते. खगोलशास्त्रात पृथ्वी आणि सूर्याच्या या स्थितीला पेरिहेलियन असं म्हणतात. सर्वसाधारणपणे, पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील सरासरी अंतर 14 कोटी 96 लाख किलोमीटर मानले जाते, परंतु पृथ्वी आणि सूर्याच्या पेरिहेलियन या स्थितीत हे अंतर जवळपास 147 मिलियन किलोमीटर एवढे असते. तर अॅफेलियन (Aphelion)या स्थितीमध्ये पृथ्वी आणि सूर्यामध्ये जवळपास 152 मिलियन किलोमीटर एवढे अंतर असते.
सूर्याच्या जवळ कशी येते पृथ्वी?
प्लॅनेटरी सोसायटी ऑफ इंडियाचे डायरेक्टर श्री रघुनंदन कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वी एका अंडाकार कक्षेत सूर्याची परिक्रमा करायला सुरूवात करते या कारणामुळे एक अशी स्थिती निर्माण होते, ज्यामुळे पृथ्वी सूर्याच्या सर्वात जवळ येते. पृथ्वी प्रत्यक्षात सूर्याभोवती वर्तुळात फिरत नाही, ती लंबवर्तुळामध्ये फिरते म्हणून जानेवारीच्या सुरुवातीला पृथ्वी ही सूर्याच्या सर्वात जवळच्या बिंदूवर असते ज्याला पेरिहेलियन म्हणतात. जुलैच्या सुरुवातीला पृथ्वी सूर्यापासून सर्वात दूरच्या बिंदूवर असते, ज्याला अॅफेलियन म्हणतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Weight Loss: नाश्ता करताना 'या' चुका टाळा, अन्यथा लठ्ठपणाचे व्हाल शिकार
skin Care Tips : चेहऱ्यावरील पिम्पल्स होतील दूर; 'हे' टोनर ठरेल फायदेशीर, जाणून घ्या तयार करायची सोपी पद्धत
Healthy Fruits : मधुमेह, हृदय आणि कर्करोगावर गुणकारी 'ड्रॅगन फ्रूट', फायदे जाणून घ्या