SSC Recruitment 2022 : सरकारी नोकरीची सुवर्ण संधी, अनेक पदांवर भरती
SSC Vacancy 2022 : कर्मचारी निवड आयोगाकडून (SSC) ज्युनियर ट्रांसलेटरसह अनेक पदांवर भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑगस्ट आहे.
SSC Recruitment 2022 : सरकारी नोकरीची सुवर्ण संधी आहे. कर्मचारी निवड आयोगाकडून (SSC) कनिष्ठ अनुवादक (JT - Junior Translator) यासह अनेक पदांवर भरती करण्यात येणार आहे. यासाठी आयोगाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑगस्ट आहे. उमेदवार ssc.nic.in या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करु शकतात.
रिक्त पदांचा तपशील
कर्मचारी निवड आयोगाकडून (SSC) जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार या भरती प्रक्रियेमध्ये कनिष्ठ अनुवादक (JH), कनिष्ठ हिंदी अनुवादक (JHT - Junior Hindi Translator) आणि वरिष्ठ हिंदी अनुवादक (SHT - Senior Hindi Translator) पदांवर भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा.
कशी असेल निवड प्रक्रिया?
या पदांवर उमेदवारांची भरती ऑनलाईन परीक्षेच्या आधारे केली जाईल.
कधी होणार परीक्षा?
आयोगाकडून या पदांसाठी उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षेद्वारे (CBT) केली जाईल. ऑक्टोबर महिन्यात एसएससी (SSC) सीबीटी (CBT) घेण्यात येईल. या भरतीद्वारे उमेदवारांना रेल्वे बोर्ड, आर्म फोर्सेस मुख्यालय आणि केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध होईल.
वयोमर्यादा
या भरती अंतर्गतसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षे दरम्यान असावं. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत मिळेल.
पगार
या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवाराला पात्रतेच्या निकषानुसार पगार मिळेल. कनिष्ठ अनुवादकाच्या पदांवर निवडलेल्या अर्जदाराला 35 हजार 400 रुपये ते 1 लाख 12 हजार 400 रुपये वेतन दिले जाईल. कनिष्ठ हिंदी अनुवादकाच्या पदावर निवड झालेल्या उमेदवाराला 35 हजार 400 रुपये ते 1 लाख 12 हजार 400 रुपये वेतन दिले जाईल. वरिष्ठ हिंदी अनुवादकाच्या पदावर निवड झालेल्या उमेदवाराला 44 हजार 900 ते 1 लाख 42 हजार 400 रुपये पगार मिळेल.
अर्ज कसा कराल?
या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना 4 ऑगस्टपूर्वी SSC च्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जाऊन अर्ज करावा लागेल.