शिक्षक व्हायचंय? 35 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, वेतन 70 हजार रुपये, अर्ज करण्याचे उरले फक्त 24 तास
शिक्षक पदासाठी मोठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. तुम्हाला जर शिक्षक पदावर नोकरी हवी असेल तुम्ही लवकरात लवकर अर्ज करा असं आवाहन करण्यात आलं आहे.
Teacher Recruitment 2024: तुम्ही जर शिक्षकाची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. शिक्षक पदासाठी मोठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. तुम्हाला जर शिक्षक पदावर नोकरी हवी असेल तुम्ही लवकरात लवकर अर्ज करा असं आवाहन करण्यात आलं आहे. कारण अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 12 ऑगस्ट 2024 आहे. कारण, अर्ज करण्यासाठी एकच दिवस बाकी आहे. ही भरती प्रक्रिया आसाम राज्यात होणार आहे.
ही भरती आसामच्या प्राथमिक शिक्षण संचालकांनी केली आहे. या अंतर्गत, एकूण 35133 शिक्षक पदांवर पात्र उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. या भरती प्रक्रियेअंतर्गत उच्च प्राथमिक आणि निम्न प्राथमिक आणि उच्च प्राथमिकमध्ये सहाय्यक शिक्षक या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. त्यामुळं तुम्हाला अर्ज करण्यासाठी एकच दिवस बाकी राहिला आहे. तुमच्याकडे फक्त 24 तास उरले आहेत. त्यामुळं तुम्ही लवकरात लवकर अर्ज करणं गरजेचं आहे.
कसा कराल अर्ज?
DEE आसामच्या या पदांसाठी फक्त ऑनलाइन अर्ज करता येतील. हे करण्यासाठी, उमेदवारांना प्राथमिक शिक्षण संचालक, आसामच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल, ज्याचा पत्ता आहे – dee.assam.gov.in. या वेबसाइटवरून तुम्ही केवळ अर्ज करू शकत नाही तर या भरतीचे तपशील देखील तपासू शकता.
अर्ज करण्यासाठी पात्रता काय?
अर्ज करण्यासाठी, उमेदवाराने पदानुसार मान्यताप्राप्त विद्यापीठातून BA किंवा B.Sc पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. आसाम TET परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवाराने प्राथमिक शिक्षणाचा दोन वर्षांचा डिप्लोमा किंवा बीएड केलेला असणे आवश्यक आहे. D.Ed उमेदवार देखील अर्ज करण्यास पात्र आहेत. ही पदवी विशेष शिक्षणात असावी. या पदांसाठी वयोमर्यादा 18 ते 45 वर्षे आहे.
कशी असेल निवड प्रक्रिया?
या पदांवर निवडीसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा द्यावी लागणार नाही. त्यांची गुणवत्ता आणि कागदपत्र पडताळणीच्या आधारे निवड केली जाईल. तुम्ही वेबसाइटवरून त्याचे तपशील तपासू शकता. दुसरी विशेष बाब म्हणजे अर्जासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
पगार किती मिळणार?
या पदांवर निवड झाल्यास, उमेदवारांना पदानुसार दरमहा 14 हजार ते 70 हजार रुपये वेतन दिले जाईल. इतर तपशील वरील वेबसाइटवर तपासता येतील.
महत्वाच्या बातम्या: