(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Job Majha : कोल इंडिया कंपनी अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; लगेच अर्ज करा
Job Majha : अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळे संधी सोडू नका, लगेच अर्ज करा.
Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
अनेक तरुण सरकारी नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या. पाहूयात वेगवेगळ्या क्षेत्रांतील भरतीसंदर्भात...
पोस्ट : व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी हवेत (यात खाणकाम, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार, प्रणाली आणि EDP यांचा समावेश होतो)
शैक्षणिक पात्रता : B.E./B.Tech/B.Sc अभियांत्रिकी संबंधित ट्रेडमध्ये किमान 60% गुण
एकूण जागा : 1 हजार 50 (यात खाणकामसाठी 699, सिव्हिलसाठी 160, इलेक्ट्रॉिनिक्स आणि दूरसंचारसाठी 124, प्रणाली आणि EDP साठी 67 जागा आहेत.)
वयोमर्यादा : 30 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 जुलै 2022
तपशील - https://www.coalindia.in/ (या वेबसाईटवर गेल्यावर career with cil वर क्लिक करा. jobs at coal india यावर क्लिक करा. Recruitment of Management Trainee on the basis of GATE-2022 Score या लिंकवर क्लिक करा. detailed advertisement download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
2. बँक ऑफ बडोदामध्ये स्पेशालिस्ट ऑफिसरच्या 325 जागांसाठी भरती निघाली आहे.
पोस्ट : रिलेशनशिप मॅनेजर-कॉर्पोरेट आणि इंस्टंट क्रेडिट
शैक्षणिक पात्रता : पदवीधर, फायनान्समधील स्पेशलायझेशनसह पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा
एकूण जागा : 175
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 जुलै 2022
तपशील : www.bankofbaroda.in
पोस्ट : क्रेडिट ऍनालिस्ट कॉर्पोरेट आणि इंस्टंट क्रेडिट
शैक्षणिक पात्रता : पदवीधर, पदव्युत्तर पदवी/ डिप्लोमा किंवा CA / CMA / CS / CFA, 5 वर्षांचा अनुभव
एकूण जागा : 150
संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.
ऑनलाईन पद्धतीने ही भरती होत आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 जुलै 2022
तपशील : www.bankofbaroda.in (या वेबसाईटवर गेल्यावर about us मध्ये careers वर क्लिक करा. current opportunities वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. know more वर क्लिक करा. advertisement download करा. तु्म्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
3. IDBI बँकेत विविध पदांच्या 226 जागांसाठी भरती निघाली आहे.
पोस्ट : मॅनेजर (ग्रेड B)
शैक्षणिक पात्रता : B.E./B.Tech (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) किंवा LLB किंवा कोणत्याही शाखेतील पदवी/MCA/M.Sc./ MA/MBA, 3 वर्षांचा अनुभव
एकूण जागा : 82
वयोमर्यादा : 25 ते 35 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 जुलै 2022
तपशील : www.idbibank.in
पोस्ट : असिस्टंट जनरल मॅनेजर-AGM (ग्रेड C)
शैक्षणिक पात्रता : B.E./B.Tech (सिव्हिल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) किंवा LLB किंवा कोणत्याही शाखेतील पदवी/MCA, 6 वर्षांचा अनुभव
एकूण जागा : 111
वयोमर्यादा : 28 ते 40 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 जुलै 2022
तपशील : www.idbibank.in
पोस्ट : डेप्युटी जनरल मॅनेजर-DGM (ग्रेड D)
शैक्षणिक पात्रता : B.E./B.Tech (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) किंवा LLB किंवा कोणत्याही शाखेतील पदवी/MCA, 10 वर्षांचा अनुभव
एकूण जागा : 33
वयोमर्यादा : 35 ते 45 वर्ष
संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 जुलै 2022
तपशील : www.idbibank.in (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. current openings वर क्लिक करा. Recruitment of Specialist Officer - 2022-23 या जाहिरातीतली advertisement download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
4. ठाणे महानगरपालिकेत वैद्यकीय तज्ज्ञ या पोस्टसाठी एकूण 45 पदांची भरती निघाली आहे.
पोस्ट : वैद्यकीय तज्ज्ञ
शैक्षणिक पात्रता : MBBS
एकूण जागा : 45
ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : सार्वजनिक आरोग्य विभाग, चौथा मजला, महापालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्यमार्ग, पाचपाखाडी, ठाणे - 400 602
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 30 जून 2022
तपशील : thanecity.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर नवीन माहितीमध्ये संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
महत्वाच्या बातम्या :
- Agnipath Scheme : अग्निपथ योजनेला विरोध होत असताना वायुसेनेत भरती प्रक्रियेला सुरुवात, जाणून घ्या कशी असेल प्रक्रिया
- HPCL Recruitment 2022 : हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये बंपर भरती; झटपट अर्ज करा
- Indian Railway Recruitment 2022 : रेल्वेत 5 हजारांहून अधिक पदांवर बंपर भरती, लवकर करा अर्ज