HPCL Recruitment 2022 : हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये बंपर भरती; झटपट अर्ज करा
HPCL Recruitment 2022 : हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने बंपर पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ज्यासाठी उमेदवार आजपासून अर्ज करू शकतात.
HPCL Recruitment 2022 : हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार, HPCL मार्फत विविध पदांवर भरती केली जाणार आहे. ज्यासाठी उमेदवार आजपासून अर्ज करू शकतील. इच्छुक उमेदवार HPCL च्या अधिकृत वेब साईटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 जुलै ठेवण्यात आली आहे.
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमधील भरतीसंदर्भातील तपशील
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमधील भरती मोहिमेद्वारे मेकॅनिकल इंजिनिअर्ससाठी 103 पदं, इलेक्ट्रिकल इंजिनिअर्ससाठी 42 पदं, इंस्ट्रूमेंटेशन इंजिनिअर्ससाठी 30 पदं, क्वॉलिटी कंट्रोल ऑफिसर्ससाठी 27 पदं, सिव्हिल इंजिनिअर्ससाठी 25 पदं, चार्टर्ड अकाउंटंटसाठी 15 पदं, केमिकल इंजिनिअर्ससाठी 7 पदं, इंफॉर्मेशन सिस्टम ऑफिसर्ससाठी 5 पदं, लॉ ऑफिसर्ससाठी 7 पदं, सिनिअर मॅनेजर इलेक्ट्रिकल्ससाठी 3 पदं, वेलफेयर ऑफिसर्ससाठी 2 पदं आणि सेफ्टी ऑफिसर्ससाठी 13 पदांवर भरती होणार आहे.
भरती प्रक्रियेसाठी अर्ज कसा कराल?
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमार्फत जारी करण्यात आलेल्या भरतीसाठी शैक्षणिक प्रक्रिया वेगवेगळी निश्चित करण्यात आली आहे. त्यासाठी अर्ज करण्याचा विचार करत असाल तर अधिकृत अधिसूचना पाहू शकता. तसेच, मेकॅनिकल इंजिनिअर, इलेक्ट्रिकल इंजिनिअर, सिव्हिल इंजिनिअर आणि केमिकल इंजिनिअर पदंच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना वयाची अटही घालण्यात आली आहे. 25 वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्ती या भरतीसाठी अर्ज करु शकणार नाहीत.
निवड प्रक्रिया
लेखी चाचणी, गट कार्य आणि वैयक्तिक मुलाखत इत्यादींच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.
अर्ज शुल्क
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमार्फत जारी करण्यात आलेल्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांना अर्ज शुल्क भरावं लागेल. सामान्य, इतर मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांना 1000 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.
कसा कराल अर्ज?
या भरतीसाठी, उमेदवार 23 जून ते 22 जुलै 2022 पर्यंत HPCL च्या अधिकृत वेबसाइट, hindustanpetroleum.com वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.