Job Majha : वयाच्या साठीतही नोकरीची सुवर्णसंधी; दरमाह 5 लाखांपर्यंतचं वेतन, कसा कराल अर्ज?
MECON Jobs 2022 : MECON लिमिटेड (MECON Ltd.) ने विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. इच्छुक उमेदवार या पदांसाठी 21 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.
MECON Jobs 2022 : मेकॉन लिमिटेड (MECON Ltd.) विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. इच्छुक उमेदवार या पदांसाठी 21 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्जदाराचं वय 64 वर्षांपेक्षा जास्त नसावं. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत, शेवटच्या दिवशी साईटवर जास्त भार असल्यानं त्यांना त्रासाला सामोरे जावे लागू शकतं. त्यामुळे संधी दवडू नका, लगेच अर्ज करा.
या पदांसाठी होणार भरती
- सल्लागार (Consultant)
- व्यावसायिक (Professional)
- विशेतज्ज्ञ (O&M) Expert (O&M)
काय आहेत निकष आणि पात्रता?
अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे AMIE किंवा समकक्ष सह अभियांत्रिकी/अभियांत्रिकी डिप्लोमा पदवी असणं आवश्यक आहे. अभियांत्रिकी पदवी व्यतिरिक्त, अर्जदाराकडे किमान 1 वर्ष कालावधीची सुरक्षा पदवी किंवा डिप्लोमा असणं आवश्यक आहे. यासह, अर्जदारास किमान 5 वर्षांच्या कामाचा अनुभव असावा. पात्रतेच्या अटींची पूर्तता करणारे उमेदवार अधिकृत वेबसाइट www.meconlimited.co.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. वेबसाइटवर सूचित केलेल्या तारखांवर ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. अर्ज सादर करण्याच्या इतर कोणत्याही पद्धतीला परवानगी नाही. ऑनलाइन अर्ज करताना उमेदवाराला कागदपत्रे अपलोड करावी लागतील. अधिक तपशीलांसाठी उमेदवार अधिकृत साईटची मदत घेऊ शकतात.
वेतन
या पदांसाठी वेतन 1.25 लाखांपासून 5 लाखांपर्यंत वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया
अधिसूचनेनुसार, या पदासाठी निवड प्रक्रिया वैयक्तिक मुलाखतीवर आधारित आहे. निवड शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि विशेषीकरणावर आधारित असेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- IISC Recruitment 2022: भारतीय विज्ञान संस्थेच्या तांत्रिक सहाय्यक पदांसाठी भरती! लगेच करा अर्ज
- दरमाह 1.60 लाखांपर्यंतचं मिळेल वेतन; सरकारी नोकरीची नामी संधी, कुठे कराल अर्ज?
- Maharashtra National Law University : महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये रिसर्च असिस्टंट पदासाठी भरती; असा करा अर्ज
- Jobs : बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अधिकारीपदासाठी बंपर भरती, जाणून घ्या सर्व माहिती
- Bank Job 2022 : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये SO पदांसाठी मेगा भरती; पदवीधर अर्ज करू शकतात
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha