(Source: ECI/ABP News/ABP Majha)
MPSC Group B Recuritment : MPSC मध्ये नोकरीची संधी; 800 पदांवर भरती, लवकर करा अर्ज
MPSC Recruitment 2022 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ग्रुप बी पदांसाठी भरती सुरु केली आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करु शकतात.
MPSC Group B Recuritment 2022 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) ग्रुप बी (Group B) पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरती अंतर्गत 800 पदांवर भरती करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करा. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार mpsconline.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करु शकतात.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 800 गट B मधील SI/DR, ASO, STI आणि PSI पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार 15 जुलै 2022 पूर्वी ऑनलाइन अर्ज सबमिट करू शकतात.
रिक्त पदं आणि जागांचा तपशील
या भरती अंतर्गत एकूण 800 पदांवर भरती करण्यात येणार आहे. या भरतीत पोलीस उपनिरीक्षक (PSI), राज्य कर निरीक्षक (STI), सहाय्यक विभाग अधिकारी (ASO) या पदांवर भरती करण्यात येईल.
शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी इच्छुक उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केलेली असावी. उमेदवाराला मराठी भाषेचं ज्ञान असावं. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत MPSC ग्रुप बी भारती अधिसूचना पहा.
वयोमर्यादा
पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी उमेदवाराचं वय 19 ते 31 वर्ष असावं. राज्य कर निरीक्षक (STI) पदासाठी इच्छुक उमेदवाराचं वय 19 ते 31 वर्ष दरम्यान असायला हवं. सहाय्यक विभाग अधिकारी (ASO) पदासाठी इच्छुक उमेदवाराचं वय 18 ते 38 दरम्यान असावं.
कसा कराल अर्ज?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ग्रुप बी पदांसाठी (महाराष्ट्र MPSC गट ब भर्ती 2022 800 पदे) फक्त ऑनलाइन अर्ज करता येईल. यासाठी MPSC च्या mpsconline.gov.in या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करता येईल. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट ब पदांशी संबंधित अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवार mpsc.gov.in या वेबसाइटला भेट देऊन अधिसूचना पाहू शकतात.
अर्ज शुल्क
या भरतीसाठी सामान्य उमेदवाराला 394 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल, तर आरक्षित वर्गातील उमेदवारा 294 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.
निवड प्रक्रिया
MPSC ग्रुप बी पदांसाठी उमेदवारांची निवड परीक्षा - पूर्व, मुख्य आणि मुलाखत या तीन टप्प्यांनंतर केली जाईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- DRDO Recruitment 2022 : पदवीधरांसाठी DRDO मध्ये नोकरीची संधी, लगेच अर्ज करा
- Jobs majha : नवोदय विद्यालय समितीत नोकरीची संधी, विविध पदांसाठी भरती जाहीर
- IDBI Jobs 2022 : पदवीधरांसाठी बँकेत नोकरीची संधी; झटपट करा अर्ज