IDBI Jobs 2022 : पदवीधरांसाठी बँकेत नोकरीची संधी; झटपट करा अर्ज
IDBI Jobs 2022 : IDBI बँकेनं स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर्सच्या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. 25 जूनपासून या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
IDBI Jobs 2022 : बँकेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच. IDBI बँकेनं स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर्सच्या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरतीसाठी IDBI ची अधिकृत वेबसाइट idbibank.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. 25 जूनपासून या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2022 आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत 226 पदांवर भरती केली जाणार आहे.
भरतीसंदर्भातील महत्त्वाचे तपशील
मॅनेजर : ग्रेड बी : 82 पदं
सहायक महाप्रबंधक (एजीएम) : ग्रेड सी : 111 पदं
डेप्युटी जनरल मॅनेजर (डीजीएम) : ग्रेड डी : 33 पदं
भरतीसाठी शैक्षणिक पात्रता
IDBI बँकेनं जारी केलेल्या भरती प्रक्रियेअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. त्यामुळे शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादाही वेगळी आहे. या माहितीसाठी, उमेदवार अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.
महत्वाच्या तारख्या
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 25 जून
अर्ज प्रक्रियेची शेवटची तारीख : 10 जुलै
अर्ज शुल्क
भरती पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरावं लागणार आहे. सर्वसाधारण, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी श्रेणीसाठी अर्ज शुल्क रुपये ठेवण्यात आले आहे. तर SC/ST/PWD श्रेणीतील उमेदवारांना 200 रुपये शुल्क भरावं लागेल. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, IMPS, कॅश कार्ड/ मोबाईल वॉलेट वापरून अर्जाची फी भरली जाऊ शकते. भरतीशी संबंधित इतर कोणत्याही माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाईटची मदत घेऊ शकतात.
अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.