एक्स्प्लोर

Jobs for Women: महिलांसाठी रोजगार वाढला, पण चांगल्या नोकऱ्याच नाहीत; काय सांगते आकडेवारी?

Jobs for Women: भारतात महिलांच्या रोजगारात वाढ झाली आहे. महिलांचा बेरोजगारीचा दर 8.6 टक्क्यांवर आला आहे. मात्र, अजूनही त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळत नाहीत, ही चिंतेची बाब आहे.

Jobs for Women: भारताचा विकास (Development of India) करायचा असेल तर, निम्म्या लोकसंख्येचे आर्थिक हात मजबूत असले पाहिजेत. जागतिक बँकेनंही (World Bank) अलिकडेच एका निवेदनात म्हटलं होतं की, भारताला प्रगतीच्या शिखरावर चढायचं असेल तर महिलांसाठी उत्तम रोजगाराच्या संधी (Better Employment Opportunities for Women) उपलब्ध करुन द्याव्या लागतील. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम (Women are Financially Empowered) झाल्या, तर भारताचा विकास होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. भारतातील शहरी भागात महिलांमधील रोजगार वाढला आहे. महिलांचा बेरोजगारीचा दर (Unemployment Rate of Women) 8.6 टक्क्यांवर आला आहे. मात्र, अजूनही महिलांना चांगल्या नोकऱ्या (Jobs) मिळत नाहीत, ही चिंतेची बाब आहे. 

पगारदार महिलांची संख्या कमी 

सांख्यिकी आणि कार्यक्रम मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, जुलै-सप्टेंबर या तिमाहीत महिलांच्या बेरोजगारीच्या दरात घट झाली आहे. मात्र, त्यांना नियमित रोजगार मिळत नाही. त्यामुळे या तिमाहीत पगारदार महिलांची संख्या 55 टक्क्यांवर घसरली आहे. याशिवाय पगारदार नोकऱ्या करणाऱ्या पुरुषांची संख्याही कमी झाली आहे, ती आता फक्त 47 टक्के उरली आहे. दरम्यान, या तिमाहीतही अनियमित नोकऱ्या करणाऱ्या पुरुषांची संख्या तेवढीच राहिली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत शहरांमधील रोजगाराची आकडेवारी सारखीच राहिली आहे.

कृषी क्षेत्रानं दिल्यात सर्वाधिक नोकऱ्या  

कृषी क्षेत्रात जवळपास सर्वच नव्या नोकऱ्या निर्माण झाल्याचं सर्वेक्षणातून समोर आलं आहे, तर इतर क्षेत्रातील नोकऱ्यांची संख्या घटली आहे. खरीप हंगामातील पेरण्या झाल्यामुळे कृषी क्षेत्रातील रोजगार वाढला आहे. मात्र, पेरणीचा हंगाम संपल्यानं या नोकऱ्याही गायब होतील, ही निराशाजनक बाब आहे. त्यामुळे पुढील तिमाहीतील आकडेवारी निराशाजनक असू शकते.

आठवड्यातून एक तासही काम मिळालं, तर रोजगार मिळाला, असा समज होतो 

सरकार दर तिमाहीत शहरी भागांत नोकरीची आकडेवारी जाहीर करतं. या सर्वेक्षणात, सर्वेक्षणाच्या वेळी सात दिवसांत एक तासही काम मिळालेल्या प्रत्येक व्यक्तीला रोजगार मिळाला, असंच मानलं जात आहे. बेरोजगारीच्या दरामध्ये 15 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींचा समावेश होतो. 

 

महत्त्वाच्या बातम्या

SBI Recruitment: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरतीची तयारी सुरु, वर्षभरात 12 हजार नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणार, बँकेत सध्या किती कर्मचारी?
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरतीची तयारी सुरु, वर्षभरात 12 हजार नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणार
Bank of Baroda : गुड न्यूज, बँक ऑफ बडोदामध्ये 1100 जागांवर भरती, 67 हजारांपासून पगार सुरु 
गुड न्यूज, बँक ऑफ बडोदामध्ये 1100 जागांवर भरती, 67 हजारांपासून पगार सुरु 
Lay off : 4 हजार कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात! टाटा समूहाची 'ही' कंपनी घेणार मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
Lay off : 4 हजार कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात! टाटा समूहाची 'ही' कंपनी घेणार मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
नोकरीच्या शोधात आहात? बँकेत नोकरी मिळवण्याची मोठी संधी, तब्बल 2 हजार 49 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
नोकरीच्या शोधात आहात? बँकेत नोकरी मिळवण्याची मोठी संधी, तब्बल 2 हजार 49 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 

व्हिडीओ

Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगेंसोबत चर्चेला ब्रेक आणि उद्रेक | Special Report ABP Majha
Amravati Tiger : वाघिणीचा मृत्यू, वनविभाग संशयाच्या जाळ्यात Special Report
PM Modi on Gen Z : तरुणांनी AI कौशल्य विकसित करण्याची गरज : नरेंद्र मोदी | Special Report ABP Majha
Sugercane : साखर हंगामासाठी घाई का? Special Report
How to search for a Kunbi record : कुणबी नोंद कशी शोधायची? सर्व माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rakesh Mehta: दिल्लीच्या माजी मुख्य सचिवांकडून आयुष्याचा शेवट; नोएडातील घरात मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळला
दिल्लीच्या माजी मुख्य सचिवांकडून आयुष्याचा शेवट; नोएडातील घरात मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळला
अभिजीत दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्या विरोधात भाजप प्रवक्त्त्याचा मानहानीचा खटला दाखल; 2 कोटींच्या भरपाईची मागणी
अभिजीत दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्या विरोधात भाजप प्रवक्त्त्याचा मानहानीचा खटला दाखल; 2 कोटींच्या भरपाईची मागणी
Rahul Gandhi: राहुल गांधींचं विमान पहिल्या प्रयत्नात लँडिंग होण्यात अयशस्वी; 25 मिनिटांनी दुसऱ्या प्रयत्नात उतरलं, विमानतळावर प्रचंड गर्दी जमल्याने धक्काबुक्की, रायबरेलीत स्वागतासाठी तब्बल एक किमी रांग
राहुल गांधींचं विमान पहिल्या प्रयत्नात लँडिंग होण्यात अयशस्वी; 25 मिनिटांनी दुसऱ्या प्रयत्नात उतरलं, विमानतळावर प्रचंड गर्दी जमल्याने धक्काबुक्की, रायबरेलीत स्वागतासाठी तब्बल एक किमी रांग
Indian  Hockey Team: भगव्या जर्सीवरून वाद पेटला असतानाच आता हॉकी इंडिया टीम आशियाई क्रीडा स्पर्धेत निळ्या जर्सीत दिसणार!
भगव्या जर्सीवरून वाद पेटला असतानाच आता हॉकी इंडिया टीम आशियाई क्रीडा स्पर्धेत निळ्या जर्सीत दिसणार!
Video: ... तर त्यात काही गैर वाटत नाही; गरब्यात मुस्लिमांना प्रवेश देण्याच्या वादावर अमृता फडणवीसांची परखड भूमिका
Video: ... तर त्यात काही गैर वाटत नाही; गरब्यात मुस्लिमांना प्रवेश देण्याच्या वादावर अमृता फडणवीसांची परखड भूमिका
तर 90 डेसिबलच्या आवाजात 24 तास कोणी राहू शकल का? दरे गावात एका माणसाचा मोठा बंगला आहे तिथं डेटा सेंटर करा; आदित्य ठाकरेंनी डेटा सेंटरचा पाढाच वाचला
तर 90 डेसिबलच्या आवाजात 24 तास कोणी राहू शकल का? दरे गावात एका माणसाचा मोठा बंगला आहे तिथं डेटा सेंटर करा; आदित्य ठाकरेंनी डेटा सेंटरचा पाढाच वाचला
Raghav Chadha Voter Row : आधी म्हणाले पंजाबमधून नाव वगळलं, आता राघव चढ्ढा अचानक दिल्लीचे मतदार कसे झाले? 'आप'चा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
आधी म्हणाले पंजाबमधून नाव वगळलं, आता राघव चढ्ढा अचानक दिल्लीचे मतदार कसे झाले? 'आप'चा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
कुटुंब फिरायला गेले, 23 तोळे सोनं, अर्धा किलो चांदी घेऊन पसार; ऐटीत बॅग अडकवून जाताना चोरटा कॅमेऱ्यात कैद
कुटुंब फिरायला गेले, 23 तोळे सोनं, अर्धा किलो चांदी घेऊन पसार; ऐटीत बॅग अडकवून जाताना चोरटा कॅमेऱ्यात कैद
Embed widget