(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Job Majha : आयकर, महावितरण आणि रेलटेल कॉर्पोरेशनमध्ये नोकरीच्या संधी, असा करा अर्ज
Job : आयकर विभाग, महावितरण आणि रेलटेल इंडियामध्ये नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यासंबंधिची सर्व माहिती खाली दिली आहे.
Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
आयकर विभाग (Income Tax), महावितरण (Mahavitaran) आणि रेलटेल कॉर्पोरेशनमध्ये (RailTel Corporation) नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यासंबंधी अर्ज कसा आणि कुठे करायचा, त्यासाठी पात्रता काय आहे याची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे,
रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.
पोस्ट – पदवीधर/ डिप्लोमा इंजिनिअर अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता - BE/B.Tech. किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा
एकूण जागा – 103
वयोमर्यादा – 18 ते 27 वर्ष
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 एप्रिल 2022
तपशील - www.railtelindia.com (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. Current job openings मध्ये Notice fregarding engagement of Apprentice Trainees 2022 यावर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
महावितरण, पुणे
पोस्ट – अप्रेंटिस (इलेक्ट्रिशियन, वायरमन)
शैक्षणिक पात्रता – 10वी पास, ITI
एकूण जागा – 60
वयोमर्यादा – 32 वर्षांपर्यंत
अर्ज पाठवण्याचा पत्ता - अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या. गणेशखिंड शहर मंडळ, पुणे
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 मार्च 2022
तपशील - www.mahadiscom.in
आयकर विभाग
विविध पदांच्या 24 जागांसाठी भरती निघाली आहे.
पहिली पोस्ट – आयकर निरीक्षक
शैक्षणिक पात्रता – पदवीधर
जागा – 1
दुसरी पोस्ट – कर सहाय्यक
शैक्षणिक पात्रता – पदवीधर, डेटा एंट्री वेग प्रति तास 8000 की
एकूण जागा – 5
तिसरी पोस्ट – मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)
शैक्षणिक पात्रता - 10वी परीक्षा उत्तीर्ण
एकूण जागा – 18
ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता - The Additional Commissioner of Income Tax, Headquarters (Personnel & Establishment), Room No. 14, Aayakar Bhawan, P-7, Chowringhee Square, Kolkata- 700069
अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख - 18 एप्रिल 2022
तपशील – www.incometaxindia.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर important links मध्ये recruitment notices वर क्लिक करा. सुरुवातीलाच तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
संबंधित बातम्या :
- Indian Navy Recruitment 2022 : भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी, प्रतिमाह 60 हजार मिळवण्याची संधी
- Job Majha : बुलढाणा महावितरण, सांगली महापालिकेत नोकरीच्या संधी, कुठे करायचा अर्ज?
- Job Majha : Bank of Baroda येथे ठिकाणी नोकरीच्या संधी; असा करा अर्ज