BSF Recruitment 2022 : बीएसएफमध्ये नोकरी करण्याची संधी, कसा कराल अर्ज? जाणून घ्या...
BSF Jobs 2022 : सीमा सुरक्षा दलामध्ये (BSF) इन्स्पेक्टरसह अनेक पदांची भरती करण्यात येणार आहे.
![BSF Recruitment 2022 : बीएसएफमध्ये नोकरी करण्याची संधी, कसा कराल अर्ज? जाणून घ्या... bsf recruitment 2022 apply for 90 group b vacancies check selection process details here BSF Recruitment 2022 : बीएसएफमध्ये नोकरी करण्याची संधी, कसा कराल अर्ज? जाणून घ्या...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/24/8c11c524311bc7f803e6c9d333d0ab26_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
BSF Recruitment 2022 : सीमा सुरक्षा दलामध्ये (BSF) निरीक्षक, उपनिरीक्षक आणि कनिष्ठ अभियंता / उपनिरीक्षक (इलेक्ट्रिकल) या पदांसाठी उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवार या पदांसाठी 8 जून 2022 पर्यंत अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेअंतर्गत 90 पदांवर नियुक्ती करण्यात येणार आहे. या भरतीमध्ये निरीक्षक 01 (आर्किटेक्ट) पदे, उपनिरीक्षक (वर्क्स) 57 पदे आणि कनिष्ठ अभियंता / उपनिरीक्षक (इलेक्ट्रिकल) 32 साठीच्या पदांवर भरती करण्यात येणार आहेत.
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे? जाणून घ्या
इन्स्पेक्टर (आर्किटेक्ट) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून आर्किटेक्टची पदवी.
उपनिरीक्षक (वर्क्स) : सिव्हिल इंजिनीअरिंग डिप्लोमा.
कनिष्ठ अभियंता / उपनिरीक्षक (इलेक्ट्रिकल) : इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा.
किती असेल पगार?
या भरतीअंतर्गत पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पदाप्रमाणे म्हणजेच निरीक्षक (आर्किटेक्ट) या पदांसाठी रु. 44,900 ते रु. 1,42,400 आणि उपनिरीक्षक (वर्क्स), कनिष्ठ अभियंता/उपनिरीक्षक (इलेक्ट्रिकल) या पदांसाठी मॅट्रिक्सप्रमाणे स्तर 6 नुसार 35,400 ते 1,12,400 रुपये वेतन दिले जाईल.
कसा कराल अर्ज? जाणून घ्या
या भरतासाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार प्रथम अधिकृत वेबसाइट rectt.bsf.gov.in वर लॉग इन करावे लागेल. येथे त्यांना अर्ज करावा लागेला. या भरतीअंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 जून आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवाराचे वय 30 वर्षांपेक्षा अधिक नसावे.
निवड प्रक्रिया
या पदांवरील भरतीसाठी उमेदवारांना दोन टप्प्यांतून जावे लागेल. लेखी परीक्षा आणि मुलाखत असे दोन टप्पे असतील. पहिल्या टप्प्यात लेखी परीक्षेचा घेण्यात येईल. पहिल्या टप्प्यातील परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेसाठी पात्र असतील. यामध्ये शारीरिक चाचणी आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि कागदपत्र तपासणी यांचा समावेश असेल. हे सर्व टप्पे पार केल्यानंतर, निवडलेल्या उमेदवारांची तपशीलवार वैद्यकीय तपासणी केली जाईल. अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाईटची मदत घेऊ शकतात.
अर्जाची फी
या भरतीसाठी उमेदवारांना परी शुल्क म्हणून 200 रुपये भरावे लागतील. महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, BSF सेवा करणारे कर्मचारी आणि माजी सैनिकांना परीक्षा शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- ICMR Recruitment 2022 : आयसीएमआरमध्ये नोकरीची संधी, येथे करा अर्ज, जाणून घ्या कशी असेल प्रक्रिया
- MPSC Exam 2021 : मोठी बातमी! एमपीएससी मुख्य परीक्षेचं प्रवेश प्रमाणपत्र जारी
- Job Majha : पाटबंधारे विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात नोकरीची संधी; जाणून घ्या भरतीबाबत सर्व माहिती
- Indian Navy Jobs 2022 : भारतीय नौदलात नोकरीची संधी; कोणत्या पदांसाठी, किती वेतन मिळणार? जाणून घ्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)