एक्स्प्लोर

... आणि बिग बी अमिताभ शांतपणे कार चालकाची वाट बघत थांबले

दादासाहेब फाळके रेट्रोस्पेक्टिव विभागात दाखवल्या जाणाऱ्या आपल्याच सिनेमांच्या विभागाच्या उद्धाटनाला बच्चन यांनी स्वतः हजेरी लावत या विभागाला ग्लॅमर प्राप्त करून दिले. कालच्या प्रमाणे आज देखील बच्चन यांनी गोवा आपल्यासाठी खास असल्याचे सांगत आपला सन्मान केल्याबद्दल आभार मानले.

पणजी : गोव्यातील 15 व्या आणि देशातील 50 व्या अर्थात सुवर्णमहोत्सवी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) उद्धाटन सोहळा काल पार पडला. बिग बी अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. करिअरमधील पहिल्या सिनेमाचा चित्रीकरण गोव्यात झाल्याने गोवा आपल्यासाठी खास असल्याचे सांगत सदैव रसिक प्रेक्षकांच्या ऋणात राहायला आवडेल असे अदबीने सांगत उपस्थितांची मने जिंकलेल्या बिग बी अमिताभ बच्चन यांनी महानायक असून देखील आपले पाय अजूनही देखील जमीनीवर असल्याचा प्रत्यय आज दिला. रेट्रोस्पेक्टिव्ह विभागातील उद्धाटन सोहळा आटोपून परत जाण्यासाठी जेव्हा बिग बी आपल्या कारजवळ पोहोचले, तेव्हा कारमध्ये चालकच नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी कडक उन्हात देखील बच्चन शांतपणे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि इतरांशी गप्पा मारत उभे राहिले. चार ते पाच मिनिटे बच्चन ताटकळत कारपाशी उभे होते. शेवटी कुठे गायब झालेला चालक धावत पळत हजर झाला आणि बच्चन यांची कार आल्या मार्गाने परतीच्या प्रवासाला निघून गेली. त्याचं झालं असं, इफ्फीचे औचित्य साधून भारतीय चित्रपट सृष्टीमधील प्रतिष्ठित असा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याने अमिताभ बच्चन यांचे गाजलेले चित्रपट निवडून दादासाहेब फाळके रेट्रोस्पेक्टिव विभागात दाखवले जात आहेत. 'पा' सिनेमाच्या प्रदर्शनाने या विभागाचे उद्धाटन झाले. यावेळी दस्तुरखुद्द अमिताभ बच्चन यांनी हजेरी लावली. या विभागाच्या उद्धाटन सोहळ्याला अमिताभ बच्चन उपस्थित राहणार याची कल्पना कालपर्यंत कुणाला नव्हती. सकाळी 10 वाजता उद्धाटन आणि साडे नऊ वाजता पीआयबीचा मेसेज आला. त्यात साक्षात बिग बी या विभागाचे उद्धाटन करणार असल्याचे कळवण्यात आले आणि सगळ्याच्या नजरा त्यांच्या आगमनाकडे लागल्या. बघता बघता कला अकादमीमधील रेड कार्पेट गजबजून गेला. पत्रकार,छायाचित्रकार यांनी रेड कार्पेटला वेढा घातला. ... आणि बिग बी अमिताभ शांतपणे कार चालकाची वाट बघत थांबले अमिताभ यायच्या पूर्वी 5 मिनिट आधी मुख्यमंत्री प्रमोद सावंत आले. मुख्य सचिव परिमल राय, गोवा मनोरजंन संस्थेचे सीईओ अमित सतेजा, महोत्सव संचालक चैतन्य प्रकाश आणि त्यांची टीम बच्चन यांच्या स्वागतासाठी सज्ज झाली. एस्कोर्टचा सायरन वाजला आणि पांढऱ्या रंगाच्या बीएमडब्ल्यूमधून बिग बी बच्चन उतरले. उतरताच हात जोडून हसतमुखाने सगळ्याना अदबीने नमस्कार केल्यानंतर त्यांनी रेड कार्पेटवरुन खास अंदाजात कला अकादमी मधील व्हीआयपी लाउंजकडे प्रयाण केले. कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर सभागृहात दादासाहेब फाळके रेट्रोस्पेक्टिव विभागात दाखवल्या जाणाऱ्या आपल्याच सिनेमांच्या विभागाच्या उद्धाटनाला बच्चन यांनी स्वतः हजेरी लावत या विभागाला ग्लॅमर प्राप्त करून दिले. कालच्या प्रमाणे आज देखील बच्चन यांनी गोवा आपल्यासाठी खास असल्याचे सांगत आपला सन्मान केल्याबद्दल आभार मानले. बच्चन यांनी उद्धाटनाचा सिनेमा असलेल्या 'पा' सिनेमाच्या आठवणींना उजाळा दिला. उद्धाटन सोहळा आटोपून बच्चन रेड कार्पेट वरुन पुन्हा कला अकादमीच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर उभ्या असलेल्या कारजवळ पोहोचले. मात्र तेव्हा कारमध्ये चालकच नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी कडक उन्हात देखील सुटाबुटात असलेले बच्चन शांतपणे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि इतरांशी गप्पा मारत उभे राहिले. चार ते पाच मिनिटे बच्चन ताटकळत कारपाशी उभे राहिल्यानंतर कुठंतरी गायब झालेला चालक धावत पळत हजर झाला आणि बच्चन यांची कार आल्या मार्गाने परतीच्या प्रवासाला निघून गेली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! होळी, रंगपंचमीसाठी मुंबई पोलिसांकडून कडक नियमावली जाहीर, 12 मार्च ते 18 मार्चदरम्यान नियम लागू 
सावधान! होळी, रंगपंचमीसाठी मुंबई पोलिसांकडून कडक नियमावली जाहीर, 12 मार्च ते 18 मार्चदरम्यान नियम लागू 
IndusInd Bank : इंडसइंड बँकेचा शेअर गडगडला,  बाजारमूल्य तब्बल 19000 कोटींनी घटलं, गुंतवणूकदारांच्या पैशांचं काय होणार? 
इंडसइंड बँकेचा शेअर गडगडला, लोअर सर्किट लागताच बाजारमूल्य 19000 कोटींनी घटलं, आज काय होणार?
राजेsss महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर, शिवाजी महाराजांची 6 फूट उंच मूर्ती; मुख्यमंत्री अन् उदयनराजेंच्याहस्ते लोकार्पण
राजेsss महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर, शिवाजी महाराजांची 6 फूट उंच मूर्ती; मुख्यमंत्री अन् उदयनराजेंच्याहस्ते लोकार्पण
स्वारगेट बसमधील बलात्कार घटनेचा अहवाला आला, मंत्री प्रताप सरनाईकांनी विधानसभेत सांगितला
स्वारगेट बसमधील बलात्कार घटनेचा अहवाला आला, मंत्री प्रताप सरनाईकांनी विधानसभेत सांगितला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 Headlines : टॉप 100 हेडलाईन्स : 12 March 2025 : Maharashtra News : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 6.30 AM : ABP Majha : Maharashtra NewsABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 12 March 2025 : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 11 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सावधान! होळी, रंगपंचमीसाठी मुंबई पोलिसांकडून कडक नियमावली जाहीर, 12 मार्च ते 18 मार्चदरम्यान नियम लागू 
सावधान! होळी, रंगपंचमीसाठी मुंबई पोलिसांकडून कडक नियमावली जाहीर, 12 मार्च ते 18 मार्चदरम्यान नियम लागू 
IndusInd Bank : इंडसइंड बँकेचा शेअर गडगडला,  बाजारमूल्य तब्बल 19000 कोटींनी घटलं, गुंतवणूकदारांच्या पैशांचं काय होणार? 
इंडसइंड बँकेचा शेअर गडगडला, लोअर सर्किट लागताच बाजारमूल्य 19000 कोटींनी घटलं, आज काय होणार?
राजेsss महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर, शिवाजी महाराजांची 6 फूट उंच मूर्ती; मुख्यमंत्री अन् उदयनराजेंच्याहस्ते लोकार्पण
राजेsss महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर, शिवाजी महाराजांची 6 फूट उंच मूर्ती; मुख्यमंत्री अन् उदयनराजेंच्याहस्ते लोकार्पण
स्वारगेट बसमधील बलात्कार घटनेचा अहवाला आला, मंत्री प्रताप सरनाईकांनी विधानसभेत सांगितला
स्वारगेट बसमधील बलात्कार घटनेचा अहवाला आला, मंत्री प्रताप सरनाईकांनी विधानसभेत सांगितला
मोठी बातमी! जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी आता कडक नियम; कायद्यात बदल, महसूलमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय
मोठी बातमी! जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी आता कडक नियम; कायद्यात बदल, महसूलमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा 15 लाखांपर्यंत वाढणार, केंद्र सरकारकडे शिफारस; मंत्री अतुल सावेंची अधिवेशनात माहिती
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा 15 लाखांपर्यंत वाढणार, केंद्र सरकारकडे शिफारस; मंत्री अतुल सावेंची अधिवेशनात माहिती
Pakistan Train Hijack आधी स्फोट, नंतर रेल्वेचं अपहरण; पाकिस्तान 'जाफर एक्सप्रेस हायजॅक' करतानाचा व्हिडिओ अन् फोटो समोर
आधी स्फोट, नंतर रेल्वेचं अपहरण; पाकिस्तान 'जाफर एक्सप्रेस हायजॅक' करतानाचा व्हिडिओ अन् फोटो समोर
Video: 50 लाख लाडक्या बहिणी योजनेतून कमी होणार; भास्कर जाधवांचा दावा, विधानसभेतच मांडलं गणित
Video: 50 लाख लाडक्या बहिणी योजनेतून कमी होणार; भास्कर जाधवांचा दावा, विधानसभेतच मांडलं गणित
Embed widget