India At 2047 : कॉमनवेल्थ आणि आशियाई खेळांमधील भारताची कामगिरी बदलाची चिन्हे, कसे असेल देशातील ई स्पोर्ट्सचे भविष्य
India At 2047 : आशियाई खेळांव्यतिरिक्त, ई स्पोर्ट्सचा या वर्षीच्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये एक पायलट इव्हेंट म्हणून समावेश करण्यात आला होता. त्यामध्ये भारतीय खेळाडूंनी DOTA 2 आणि रॉकेट लीगमध्ये भाग घेतला होता.
India At 2047 : जवळपास गेल्या दशकभरात देश खूप बदलला आहे. या कालावधीत विविध क्षेत्रात बदल देखील दिसून आले. विशेषत: ई स्पोर्ट्स क्षेत्रात मोठा बदल झाला आहे. ई स्पोर्ट्स 2000 च्या उत्तरार्धात सुरू झाले, परंतु त्यावेळी ते मोठ्या प्रमाणावर दिसून आले नाही. त्याकाळी कॉलेजच्या फेस्टिव्हल्स किंवा लोकल टूर्नामेंटच्या वेळी ई स्पोर्ट्स अधूनमधून दिसायचा. परंतु, बदलत्या काळानुसार बरेच काही बदलले आहे, आता ई स्पोर्ट्स सुमारे 250 कोटी रुपयांचा उद्योग बनला आहे. एवढेच नाही तर 6 लाखांहून अधिक खेळाडू यात आपली आवड दाखवत आहेत. हा आकडा बरेच काही सांगून जातो, परंतु ज्या लोकांना ई स्पोर्ट्स चांगले समजत नाहीत त्यांना समजावून सांगण्यासाठी वेगळे उदाहरण द्यावे लागेल. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कॉमनवेल्थ ई स्पोर्ट्स चॅम्पियनशिप. याशिवाय नुकत्याच पार पडलेल्या आशियाई स्पर्धा. या स्पर्धेत अनेक ई स्पोर्ट्सइव्हेंटमध्ये भारताचा सहभाग आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. जकार्ता येथे झालेल्या या स्पर्देत देखील भारताचाही सहभाग होता. इतकेच नाही तर ई स्पोर्ट्सइव्हेंट्सच्या सुरुवातीच्या 18 सदस्यांपैकी भारत एक होता. या वेळी भारताच्या तीर्थ मेहता याने कांस्यपदक जिंकले होते. परंतु, यावेळी भारताकडून अधिक अपेक्षा असतील कारण ई स्पोर्ट्सला अधिकृत मान्यताप्राप्त खेळ म्हणून समावेश केला जात आहे. भारतीय खेळाडू 5 वेगवेगळ्या प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये भाग घेतील. यामध्ये FIFA 22, Street Fighter V, Hearthstone, League of Legends आणि DOTA 2 यांचा समावेश आहे.
आशियाई खेळांव्यतिरिक्त, ई स्पोर्ट्सचा या वर्षीच्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये एक पायलट इव्हेंट म्हणून समावेश करण्यात आला होता. त्यामध्ये भारतीय खेळाडूंनी DOTA 2 आणि रॉकेट लीगमध्ये भाग घेतला होता. यापूर्वी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने टोकियो ऑलिम्पिक 2020 पूर्वी आभासी ऑलिम्पिक स्पर्धा (ई स्पोर्ट्सटूर्नामेंट) आयोजित केली होती. याशिवाय 2007 पासून ओसीए इव्हेंटमध्ये ई स्पोर्ट्सचा समावेश करण्यात आला होता.
भारताशिवाय 46 देशांमध्ये ई स्पोर्ट्स हा नियमित खेळ
भारताव्यतिरिक्त कोरिया, थायलंड, फिनलंड, इटली, ब्राझील, नेपाळ, इंडोनेशिया, तुर्कमेनिस्तान, मॅसेडोनिया, श्रीलंका, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, सर्बिया, उझबेकिस्तान, कझाकिस्तान, मलेशिया, व्हिएतनाम आणि जॉर्जिया सारख्या सुमारे 46 देशांनी ई स्पोर्ट्सचा स्वीकार केला आहे. नियमित खेळाला मान्यता मिळाली आहे. यात काही शंका नाही की भारतीय ई स्पोर्ट्स खेळाडू जागतिक मान्यताप्राप्त स्पर्धांमध्ये त्यांची क्षमता दाखवत आहेत. पारंपारिक खेळांच्या तुलनेत ई स्पोर्ट्स देखील कमी नाहीत. परंतु या क्षेत्रात अजून बरेच बदल व्हायचे आहेत.
152 देशांमध्ये 50 कोटींहून अधिक ई स्पोर्ट्सचे चाहते
गेल्या काही वर्षांत या खेळाबाबत लोकांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे. 152 देशांमधील 50 कोटींहून अधिक ई स्पोर्ट्सचे चाहते अनेक वेगवेगळ्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मद्वारे विविध स्पर्धा ऑनलाइन पाहतात. भारतातील यूट्यूब, फेसबुक गेमिंग, लोको आणि राउटर हे त्याचे सर्वात मोठे माध्यम आहे. याशिवाय स्ट्रीमर्स देखील भरपूर कमाई करतात आणि त्याच वेळी आजच्या युगात ते करिअर म्हणून वेगाने उदयास येत आहे. YouGov ग्लोबल प्रोफाइलमधील आकडेवारी दर्शवते की प्रत्येक चौथा व्यक्ती आठवड्यातून किमान 7 तास त्यांच्या मोबाईल फोनवर व्हिडिओ गेम खेळण्यात घालवतो. भारतातील सुमारे 19 टक्के लोकसंख्या आठवड्यातून 1 ते 7 तास मोबाइल गेम खेळण्यात आणि 11 टक्के लोक 7 ते 14 तास घालवतात.
स्वस्त आणि मोठ्या प्रमाणावर उपलब्ध मोबाइल डेटा आणि पॉकेट-फ्रेंडली स्मार्टफोन्स ही संख्या वेगाने वाढण्याचे कारण आहे. मोठ्या संख्येने लोक मोबाइल गेमिंगकडे वळत असल्याने अॅप डाउनलोडच्या बाबतीत भारत सर्वात मोठा मोबाइल गेमिंग बाजार बनला आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गानंतर देशातील ई स्पोर्ट्स खेळाडू आणि संघांची संख्या जवळपास दुप्पट झाली आहे. सर्व वयोगटातील लोक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरील प्रमुख स्पर्धांमध्ये स्वारस्य दाखवत आहेत. या व्यतिरिक्त काही ई स्पोर्ट्स इव्हेंट शीर्षक स्पर्धांनी 2 कोटी रुपयांपर्यंतचे मोठे बक्षीस जाहीर केले आहेत. अशा परिस्थितीत लोकांचा हा कल भरपूर आहे. त्यामुळे असे मानले जाते की हा बाजार वार्षिक 46 टक्के दराने वाढेल आणि अशा प्रकारे 2025 पर्यंत ई स्पोर्ट्स बाजार 1100 कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल.
करिअर
ई स्पोर्ट्स उत्तम कमाईचा तसेच करिअरचा मार्ग म्हणून उदयास येत आहे. भारतीय तरुण त्याकडे करिअर म्हणून पाहत आहेत. तज्ञांचे म्हणणे आहे की आगामी काळात भारत एस्पोर्ट्ससाठी एक मोठी बाजारपेठ म्हणून उदयास येईल. ज्यानंतर तरुणांना ई स्पोर्ट्स मार्केटिंग, कोचिंग, ई स्पोर्ट्सजर्नलिस्ट, गेम डिझायनर करिअरकडे अधिक आकर्षित केले जाईल.
अलीकडेच फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही जाहीरपणे सांगितले की, 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ई स्पोर्ट्सचा समावेश व्हावा अशी त्यांची इच्छा आहे. ऑलिम्पिक आणि आगामी राष्ट्रकुल खेळांमध्ये स्पर्धात्मक गेमिंगचा समावेश करण्याची वेळ आली आहे. असे झाल्यास भारत त्यात सामील होण्यात आघाडीवर असेल.
महत्वाच्या बातम्या