Tujhya Majhya Sansarala Ani Kay Hava : अमेरिकेला जाण्याचा नाद, सिद्धार्थ देशमुख कुटुंबात निर्माण करणार नवा वाद!
Marathi Serial : ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली असली, तरी प्रेक्षकांचा या मालिकेला भरगोस प्रतिसाद मिळतोय.
Marathi Serial : मराठीवरील प्रेक्षकांची लोकप्रिय आणि कायम लक्षात राहील अशी व्यक्तिरेखा म्हणजे ‘राणा दा’. हा राणा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आता सिद्धार्थ देशमुख या नव्या व्यक्तिरेखेसह ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ (Tujhya Majhya Sansarala Ani Kay Hava ) या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली असली, तरी प्रेक्षकांचा या मालिकेला भरगोस प्रतिसाद मिळतोय.
सध्या एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत आहे. विभक्त कुटुंब पद्धती फोफावत असताना पुन्हा एकत्र कुटुंबपद्धतीला नवसंजीवनी देणारी ही मालिका आहे. मालिकेतील एकत्र कुटुंब पद्धती आणि एकंदरतीच देशमुख कुटुंबातील सदस्यांची एकमेकांबद्दलच नाही तर त्यांच्याकडील पशु-पक्षांबद्दल देखील असलेली आत्मीयता प्रेक्षकांना भावली आहे. मात्र, मालिकेत आता एक मोठं वळण आलं आहे.
अमेरिकेला जाण्यासाठी वाट्टेल ते!
देशमुख कुटुंबाचा लाडका लेक सिद्धार्थ याला अमेरिकाला जाऊन सेटल व्हायचं आहे. यामुळे तो वाटेल ते करण्यास तयार झाला आहे. आदितीला फसवून अमेरिकेला नेण्याचा त्याचा प्लॅन उघडकीस आल्यावर देशमुख कुटुंबाने सिद्धार्थला खरी-खोटी सुनवत घराबाहेर काढले. मात्र, सगळ्या हल्लाकल्लोळानंतर आजोबांनी देखील सिद्धार्थला अमेरिकेला जाण्याची परवानगी दिली. मात्र, अमेरिकेला जाण्यासाठी किंवा तिथे सेटल होण्यासाठी त्याला घरातून एकही पैसा मिळणार नाही, अशी अट घातली.
सिद्धार्थ घरात करणार चोरी!
आजोबांची अट ऐकल्यावर सिद्धार्थ घरातील दागिने चोरी करण्याची योजना बनवतो. या योजनेनुसार सगळे घराबाहेर असताना सिद्धार्थ तिजोरीतील सगळे दागिने बाहेर काढतो आणि एका बॅगेत भरतो. ही बॅग घेऊन निघणार तोच कामानिमित्त घरी आलेली आदिती हे सगळं पाहते आणि पुन्हा एकदा सिद्धार्थची खेळी त्याच्यावरच उलटते. मात्र, आता संतापलेले आजोबा सिद्धार्थला ‘तुला नेमकं काय हवंय?’ असं विचारतात. यावर सिद्धार्थ आता संपत्तीतील स्वतःचा वाटा मागणार आहे. सिद्धार्थच्या या नव्या तमाशामुळे देशमुखांच्या घरात आता एका नव्या वादाला तोंड फुटणार आहे.
हेही वाचा :
- Attack Poster : जॉन अब्राहमचा 'अटॅक' या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला, नवे पोस्टर प्रदर्शित
- Rula Deti Hai Song Released : करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाशचे 'रुला देती है' गाणे रिलीज
- Pathaan : किंग इज बॅक, 'पठाण'च्या शूटिंगसाठी शाहरुख खान स्पेनला रवाना
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha