एक्स्प्लोर

तुषार घाडीगावकरने आयुष्य संपवलं, कलाकारांच्या आर्थिक अडचणींवर विशाखा सुभेदारांची पोस्ट व्हायरल

Vishakha Subhedar on Tushar Ghadigaonkar : मराठी अभिनेता तुषार घाडीगावकर याने मुंबईतील गोरेगाव येथे राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवले होते.

Vishakha Subhedar on Tushar Ghadigaonkar : मराठी कलाकार आणि अभिनेता तुषार घाडीगावकर याने शुक्रवारी (दि.22) राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर तुषारने आत्महत्या का केली? यावरुन सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरु आहेत. कोणी तुषारने आर्थिक अडचणींमुळे आत्महत्या केल्याचं म्हणत आहे, तर कोणी कौटुंबिक वादातून त्याने टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान, तुषारने आयुष्य संपवल्यानंतर सिनेक्षेत्रातील अनेक कलाकारांनी दु:ख व्यक्त केलं आहे. बऱ्याच कलाकारांनी त्यांच्या पोस्टमधून तुषारकडे कामाची कमी नसल्याचं नमूद केलं. त्याला कामे मिळत होती, त्याने आयुष्य संपवण्याची कारणे वेगळी असल्याचंही बोललं जात आहे. दरम्यान, तुषारने आत्महत्या केल्यानंतर अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी कलाकारांच्या आर्थिक अडचणींवर फेसबुक पोस्ट केली आहे. विशाखा सुभेदार काय काय म्हटल्या? जाणून घेऊयात.. 

विशाखा सुभेदार यांची पोस्ट जशीच्या तशी.. 

रंगभूमी बळ देते.. असं म्हणता म्हणता.. वाईट बातमी.. Tushar Ghadigaonkar  ह्या रंगकर्मीची..! खरंतर माझा मुलगा आणि हा एकाच कॉलेज चे.. अभिनय कडून अनेकदा त्याच नाव ऐकलेले... भेटले ही होते, काम नव्हतं केलं... पण भयानक वाईट घडले..हिच जी phase येते त्या वेळीस बोलायला हव, मार्ग निघतो.. (एडिट करतेय ) मंडळी क्षमस्व.. माहिती जी मला मिळाली ती अर्थिक अडचण अशी होती पण ते कारण नाहीय हे आत्ताच एक निकटवर्तीय मित्राने सांगितले.

त्या बद्दल मित्रां🙏🙏🙏 माफ कर मला..!  तू ज्या परिस्थितीत हे पाऊल उचललं ते... वाईट झालं. सांगो वांगी जे कानावर पडल त्यामुळे share कराव वाटलं. पण तरीही माझा मुद्दा खोडवा असं वाटत नाहीय.. कलाकारांना अर्थिक अडचण आल्यानंतर काही मदत मिळावी ह्यासाठी फंड करावा असं खुप वाटतं.. नंतर ते पॆसे कमवून त्यांनी फेडावे..! सोसायटी मधून कसं लोन घेता येतं अगदी तसंच काहीसं कलाकार फंड करावा... त्याची काहीतरी सिस्टिम असावी.. परतफेडीचे नियम नियोजन असावे. काहीतरी मार्ग असावा..!

रंगमंच कामगार संघटना आहे, जुनियर artist साठी त्यांची संघटना आहे.. संघटन फक्त त्याच्या वरच्या फळीतल्या कलाकारांच  होत नाही.कारणं माहित नाही..! मदत करतात ही काही मित्र मैत्रिणी पण नंतर ते ही पाठ फिरवतात.त्याला दोषी ही काही कलाकार आहेतच जे पॆसे घेऊन गूल होतात..त्याच पैशांची दारू पितात. अनेकांनी अनुभवलं असेलच हे.. फार दुष्ट चक्र आहे हे..पण तरीही..काहीतरी मार्ग काढायला हवा..!  ताकद, बळ, द्यायला हवं.

 हातात  कामं नसताना पोटाची खळगी, कामाची भूक आणि नकारत्मक विचारांशी लढणं फार अवघड होऊन जात.. आमचं फिल्ड बेभरवशाच.. त्यामुळे ही phase प्रत्येकाला फेस करावीच लागते..साहित्य,नाट्य, संमेलनसाठी दिला जातो त्यातुनच एक छोटासा भाग कलाकार निधी असं काही करता येईल का?? किंवा जसं नाटक सिनेमा जगावा म्हणून अनुदान असतं तस कलाकार जगावा,(प्रामाणिक पणा पडताळून घ्यावा हव तर) तर त्यासाठी वरदान/ जीवदान .. असं काही स्कीम करता येईल का?? एक भाबडा विचार..! 

त्याला ही अनेक फाटे फुटतील च.. पण  आत्महत्येच्या विचाराला तरी फाटा देता येईल. पटतंय का कलाकार मित्र मैत्रिणी नों..???? ही वेळ कोणावरही येऊ शकते..पटत असेल तर चला काहीतरी मार्ग काढूया. स्वतःचा संसार चालवण हे ज्याच्या त्याच कामं आहे पण टेकू तर देऊच शकतो त्यासाठी काहीतरी स्कीम,प्रॉव्हिजन बांधू शकतो का आपण???

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Brain AVM सारख्या जीवघेण्या आजाराशी लढतोय अभिनेता सलमान खान, कपिल शर्माच्या शोमध्ये केला मोठा खुलासा

सिनेमात मुलाने निभावली होती बापाची भूमिका, ऐतिहासिक सिनेमाची झाली होती गिनीज बुकमध्ये नोंद

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
Embed widget