Brain AVM सारख्या जीवघेण्या आजाराशी लढतोय अभिनेता सलमान खान, कपिल शर्माच्या शोमध्ये केला मोठा खुलासा
Salman Khan : Brain AVM सारख्या जीवघेण्या आजाराशी लढतोय अभिनेता सलमान खान, कपिल शर्माच्या शोमध्ये केला मोठा खुलासा

Salman Khan : ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या तिसऱ्या सिझनचा पहिला भाग शनिवारी (दि.22) रात्री नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. या नवीन सिझनचा पहिला पाहुणा होता अभिनेता सलमान खान. या एपिसोडमध्ये सलमान खान नेहमीपेक्षा अधिक फिट दिसला. मात्र, शोमध्ये त्याने आपल्या आरोग्याविषयी एक धक्कादायक खुलासा केला.
जेव्हा होस्ट कपिल शर्मा याने 59 वर्षीय सलमान खानला लग्नाविषयी प्रश्न विचारला, तेव्हा सलमानने उत्तर दिलं की,"लग्न आणि घटस्फोट हे भावनिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून खूप कठीण असतात. आणि पुन्हा नव्याने सुरुवात करणं सोपं नसतं."
यानंतर सलमान खानने आपल्या आजारांविषयी सांगताना प्रेक्षकांना चकित केलं. त्याने म्हटलं: "दररोज हाडांना मालिश करुन घेत आहे. बऱ्याच शारीरीक अडचणी येत आहेत. मी सध्या 'ट्रायजेमिनल न्युराल्जिया'सारख्या आजाराशी लढतोय . ब्रेनमध्ये एन्युरिझम आहे, तरीही माझं काम सुरू आहे. 'एव्ही मालफॉर्मेशन' आहे, तरी चालतोय."या आजारांमुळे सलमान खान शारीरिकदृष्ट्या खूप त्रास सहन करत आहे, तरीही त्याच्या कामावर याचा परिणाम झालेला दिसत नाही.
"हे सगळं माझ्या आयुष्यात सुरु आहे. आणि जिथे मूड सटकतो, तिथे तो अर्धवट काहीतरी करत जातो. हे सगळं जर तरुण वयात झालं असतं, तर ठीक होतं – पुन्हा कमावलं असतं. पण आता अवघड जात आहे", असंही सलमान खानने सांगितलं.
ब्रेन एन्युरिझम म्हणजे काय?
ब्रेन एन्युरिझम म्हणजे मेंदूमधील रक्तवाहिनीत एखाद्या ठिकाणी कमकुवतपणा येऊन तिथे फुगवटा तयार होतो (जणू फुगा फुगल्यासारखा). हा फुगवटा जर खूप मोठा झाला आणि फुटला, तर मेंदूत रक्तस्राव होऊन जीवघेणी परिस्थिती निर्माण होऊ शकते.
आर्टेरियोव्हेनस मालफॉर्मेशन (AVM) म्हणजे काय?
AVM म्हणजे रक्तवाहिन्यांच्या संरचनेतील एक दोष. यात धमन्या (arteries) थेट शिरांशी (veins) जोडलेल्या असतात आणि मध्ये असणाऱ्या लहान रक्तवाहिन्यांचे (capillaries) जाळं नसतं. त्यामुळे रक्तप्रवाह बिघडतो आणि आजूबाजूच्या पेशींना नुकसान होऊ शकतं.
View this post on Instagram
इतर महत्त्वाच्या बातम्या























