Kushi : समंथा आणि विजय देवरकोंडाच्या 'खुशी' चा पोस्टर रिलीज; 'या' दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित
'खुशी' (Kushi) या चित्रपटाचा पोस्टर नुकताच रिलीज झाला आहे.
Kushi : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि अभिनेत्री समंथा (Samantha) यांचा चाहता वर्ग मोठा आहे. दोघांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते. या दोघांच्या 'खुशी' (Kushi) या चित्रपटाचा पोस्टर नुकताच रिलीज झाला आहे. हा पोस्टर पाहून प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहात आहेत.
खुशी चित्रपटाच्या पोस्टमध्ये समंथा ही पिंक कलरची साडी आणि गोल्डन कलरची ज्वेलरी अशा लूकमध्ये दिसत आहे. तर विजय हा देखील हटके लूकमध्ये दिसत आहे. समंथानं या चित्रपटाचा पोस्टर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'या ख्रिसमसला आणि नव्या वर्षाला घेऊन येत आहोत आनंदाचा स्फोट. तेलगू, तमिळ,कन्नड, मल्याळम भाषांमध्ये 23 डिसेंबर रोजी जगभरामध्ये रिलीज होत आहे खुशी '
View this post on Instagram
विजय देवरकोंडानं या चित्रपटाचा मोशन पोस्टर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. हा चित्रपट तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी आहे. ' या चित्रपटामध्ये जयराम, सचिन खेडेकर, मुरली शर्मा लक्ष्मी, अली, रोहिणी, वेनेला किशोर, राहुल रामकृष्ण आणि श्रीकांत अय्यंगार या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. चित्रपटाच्या टेक्निकल टीममध्ये जी मुरली, संगीतकार हेशम अब्दुल वहाब आणि प्रवीण पुडी यांनी भाग घेतला आहे. शिव निर्वाण यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे.
View this post on Instagram
खुशी या चित्रपटाचे शूटिंग कश्मिरमध्ये झाले आहे. 23 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात आहेत. खुशी आधी समंथा पुष्पा या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस आली. या चित्रपटामधील तिच्या आयटम साँगला प्रेक्षकांची पसंती मिळाली. तसेच विजय देवरकोंडाचा लायगर हा आगामी चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. लायगर चित्रपटामध्ये विजयसोबत अनन्या पांडे, माइक टायसन, रोनित रॉय आणि रम्या कृष्णा देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटामधून विजय हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्यामुळे लायगर चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात आहेत.
हेही वाचा :