एक्स्प्लोर

Prabha Atre : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

प्रभा अत्रे (Prabha Atre) यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Prabha Atre :  ज्येष्ठ शास्त्रीय गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे (Prabha Atre) यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्य शासनाच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी प्र. सह पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पाटील, पोलिस उपायुक्त संदीप गिल, स्वरमयी गुरुकुलचे प्रसाद भडसावळे व संजीव महाजन यांनीही पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

प्रभा अत्रे यांच्या पार्थिवास पोलीस दलातर्फे शोकप्रसंगीचे बिगूल वाजवून आणि बंदूकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. पार्थिवावर लपेटण्यात आलेला राष्ट्रध्वज स्व. प्रभा अत्रे यांची भाची मनीषा रवी प्रकाश यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी स्नेहा किसवे- देवकाते, तहसिलदार राधिका बारटक्के, स्वरमयी गुरुकुलचे सदस्य यांच्यासह गायन क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


Prabha Atre : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

प्रभा अत्रे यांच्या निधनानंतर संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली. अनेक राजकीय नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रभा अत्रे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ट्वीट शेअर करुन प्रभा अत्रे यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं "स्वरयोगिनी, संगीत विचारवंत , लेखिका अशी बहुआयामी ओळख असलेल्या किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनाने एक स्वरतपस्वी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले. पं. सुरेशबाबू माने आणि हिराबाई बडोदेकर यांच्या शिष्या होत्या. केंद्र सरकारने त्यांना संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल १९९० मध्ये पद्मश्री, २००२ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. २०२२ मध्ये पद्मविभूषण देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. शास्त्रीय संगीत परंपरेच्या त्या महत्वाच्या दुवा होत्या. संगीताचा ध्यास घेऊन त्यासाठी जीवन अर्पण करणाऱ्या डॉ. प्रभा अत्रे यांना भावपूर्ण श्रद्धांजली."

 
प्रभा अत्रे यांचा जन्म पुण्यात झाला आहे. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी शास्त्रीय गायनाकडे वळल्या. संगीत शिकत असतानाच त्यांनी विज्ञान व कायदा विषयांत पदवी संपादन केली. नंतर त्यांनी संगीतात डॉक्टरेटही केली.  ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांनी 11 पुस्तके प्रकाशित करण्याचा जागतिक विक्रम केला आहे. नवी दिल्लीत त्यांनी हिंदी आणि इंग्रजी भाषेत संगीतावरील 11 पुस्तकांचे प्रकाशन केले. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Prabha Atre : भारतीय संगीत क्षेत्राचे क्षितीज उजळवून टाकणारी प्रभा निमाली; प्रभा अत्रे यांच्या निधनानंतर राजकीय क्षेत्रातही शोककळा

महत्त्वाच्या बातम्या

लग्नाआधीच आई व्हायचं होतं स्वरा भास्करला! अनोळखी डोनरसह 2 वेळा IVF केलं; CAA आंदोलनानं बदललं आयुष्य
लग्नाआधीच आई व्हायचं होतं स्वरा भास्करला! अनोळखी डोनरसह 2 वेळा IVF केलं; CAA आंदोलनानं बदललं आयुष्य
Drishyam 3 Advance Booking: दृश्यम 3’च्या तिकिटांसाठी चढाओढ! 48 तासांत तिकिटांची तुफान विक्री, कमाईचा आकडा पाहून व्हाल थक्क  
दृश्यम 3’च्या तिकिटांसाठी चढाओढ! 48 तासांत तिकिटांची तुफान विक्री, कमाईचा आकडा पाहून व्हाल थक्क  
Sushant Singh Rajputs Sister: सुशांत सिंह राजपूतच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय आढळलं? 6 वर्षानंतर बहीण श्वेताने सगळंच सांगितलं, 'पाय मोडला, डोळ्यात जखमा..'
सुशांत सिंह राजपूतच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय आढळलं? 6 वर्षानंतर बहीण श्वेताने सगळंच सांगितलं, 'पाय मोडला, डोळ्यात जखमा..'
सत्या-मंजूच्या लग्नासाठी चाहत्यांनी दिला अनोखा आशीर्वाद; अंतरपाटावर उमटले हातांचे ठसे, पाहा लग्नसोहळ्याची खास झलक
सत्या-मंजूच्या लग्नासाठी चाहत्यांनी दिला अनोखा आशीर्वाद; अंतरपाटावर उमटले हातांचे ठसे, पाहा लग्नसोहळ्याची खास झलक

व्हिडीओ

Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ
Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
Tukaram Mundhe : 'आईचे दूध सर्वोत्तम' शिशु आहार उत्पादनांवर लिहिणं बंधनकारक, तुकाराम मुंढेंनी आकडेवारी सादर करत गंभीर वास्तव मांडलं... 
शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात स्तनपानाचं प्रमाण जास्त, शहरी महाराष्ट्रातील स्थिती अत्यंत भयावह : तुकाराम मुंढे
'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल
'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल
नाशिकच्या गोदाघाटावर अघोरी स्नान, महिलेच्या डोळ्यात लिंबाचा रस पिळला; लाखो रुपयांची फसवणूक, गुन्हा दाखल
नाशिकच्या गोदाघाटावर अघोरी स्नान, महिलेच्या डोळ्यात लिंबाचा रस पिळला; लाखो रुपयांची फसवणूक, गुन्हा दाखल
Gold : दुबईत सोनं भारतापेक्षा महाग की स्वस्त, दुबईतून किती ग्रॅम सोनं कोणताही कर न देता आणता येतं? 
दुबईत सोनं भारतापेक्षा महाग की स्वस्त, दुबईतून किती ग्रॅम सोनं कोणताही कर न देता आणता येतं? 
Ketan Agrawal and Siya Goyal : वाढदिवसाला सरप्राइज द्यायला पाठीवर SIYA नावाचा टॅटू काढला; साखरपुड्याला 28 ड्रेस अन् दागिन्यांचे सेट, केतनने सियासाठी काय-काय केलं?
वाढदिवसाला सरप्राइज द्यायला पाठीवर SIYA नावाचा टॅटू काढला; साखरपुड्याला 28 ड्रेस अन् दागिन्यांचे सेट, केतनने सियासाठी काय-काय केलं?
Embed widget